मोहरली लेखणी साहित्य समूह
आनंद कंद वृत्तात
1 विषय दु:ख
सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे.
नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे
संतोषिला मनाने,वाटे न खेद त्याला
दु:खात मोद शोधी, भासे सुखी जगाला.
मिळताच मोद जीवा, येतेच. सूख घराला
राही सदा खुषीने , आनंदिला क्षणाला.
दाटून कंठ येतो, वाटे नकोच जगणे
डोळ्यात अश्रु धारा,नित्याच झाल मरणे.
ठेवून शांत जीवा, जाईल दु:ख सारे
शमतील दु:ख आता, वाहेल सुखद वारे
वाचून संत वाणी, माझे मला कळाले
नाही जगी सुखी तो ,भय दु:ख ते पळाले.
आनंद कंद वृत्तात
मोहरली लेखणी साहित्य समूह
आनंद कंद वृत्तात
2 दुनिया
दुनिया
आहेच हे खरे की, दुनियेत रीत न्यारी
जावे कुठे तरी ती, सोपी नसेच सारी
दुनियेत लोक नाना, सारे कसे शहाणे
वेडेपणाच दावी , होऊन ते दिवाणे
कोणास वेड भारी,कोणात ती धडाडी
काही उगाच भित्रे, काही करी लबाडी
होते असे कधी ते, सोडून चोरट्याला
शिक्षेस योग्य मानी , निष्कारणी जनाला
चाले असा निरंतर, दुनियेत खेळ सारा
वाटे मनी कधी हा , होईल नीट न्यारा.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
दुनिया
आहेच हे खरे की, दुनियेत रीत न्यारी
जावे कुठे तरी ती, सोपी नसेच सारी
दुनियेत लोक नाना, सारे कसे शहाणे
वेडेपणाच दावी , होऊन ते दिवाणे
कोणास वेड भारी,कोणात ती धडाडी
काही उगाच भित्रे, काही करी लबाडी
होते असे कधी ते, सोडून चोरट्याला
शिक्षेस योग्य मानी , निष्कारणी जनाला
चाले असा निरंतर, दुनियेत खेळ सारा
वाटे मनी कधी हा , होईल नीट न्यारा.
वैशाली वर्तक
आनंद कंद
3)शीर्षक...मी देव पाहिला
गागाल गालगागा
देवास पाहण्याची ,होती मनात इच्छा
बाल्यास हासताना , पाहून पूर्ण मनीच्छा
देता भुखी जनाला, खाण्यास अन्न पाणी
हासून पाहिलेला होताच चक्रपाणी .
येता नभी दिवाकर , होते नवीच ऊषा
घडते दर्शन त्याचे, देतो नव्याच आशा
फुलती कळी पहाता, गंधाळली क्षणाते.
भरिला सुगंध पुष्पें, किमया दिसे मनाते
तोची असे सुरेश, सृष्टीत भेट घडते
सारीच जादु त्याची, दिनरात नित्य करते.
आनंद कंद
लगावली गागाल गालगागा गागाल गालगागा
विषय ...कविता
4) शीर्षक. प्रेम कवितेशी
दैनंदिनी पहाता,आले विचार ओठी.
ओवीत शब्द माळा, कविता तयार मोठी.
झरतात शब्द जेव्हा,वाहे अखंड सरिता.
माझ्या कवी मनाची, भावे जनास कविता.
बेधुंद होत मन हे, येताच शब्द हाती
सुचता विचार धारा, ओंजळ भरुन जाती.
पाहून डोलणारी ,वा-या सवे फुले ती,
रेखाटता सहजची , आनंदली मुले ती.
देते कधी सुवचने, सारून ती निराशा.
संबोधते./ जनांना , उजळेल आज आशा
दावीतसे अबोला ,का तू कधी रुसूनी
यमके न साथ देती ,बसतेस तू फुगूनी,
माझे मला कळाले, करिताच नित्य वाचन
स्फूरेल काव्य मजला, नियमित करीन लेखन
वैशाली वर्तक
अहमदाबाद
वृत्त आनंद कंद
लगावली गागालगा लगागा
5. आई
आईच शब्द कानी, ऐकून मोद दाटे
पाहून तव मुखाला, भेटीस वाट पाही
मिळवून सर्व काही, हर्षीत मी मनाने
स्वर्गीय तोष लाभे ,आईस भेटण्याने
चिंतेत जीव तीचा , हाची विचारी राही.
पाहून तव मुखाला भेटीस वाट पाही
नजरेत तीच येता , मन हर्षते खुशीने
सुखस्वर्गची पहाते ,माझेच मी मजेने
शब्दात सांगण्याते, अपुरेच शब्द राही
पाहून तव मुखाला , भेटीस वाट पाही