बुधवार, ५ ऑगस्ट, २०२६

गीत. तुझी वाट पहाते रे

तुझी वाट  पहाते रे


कधी येशील.     गगनी अधीरता मनी दाटे.   
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते         


 आशा रुपी  कळ्यांची फुले  फुलती सकाळी.  
किलबील  ती खगांची  गोड भासते भुपाळी         
होता तुझेची आगमन  आनंद मनास वाटे 
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते   

तुझ्या येण्याने वहाती,नव चैतन्याचे वारे
सडे केशराचे नभी,   मंदावती नभी तारे        
मंद झुळुक वा-याची  मनास सुखावते                            
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पाहते       


तुज अर्ध्य देण्या उभे  जन सारेची कधीचे
तुझ्या येण्याने जाईल  सारे  नैराश्य मनीचे         
फाकलेल्या शलाकात प्रसन्नता लाभते
 तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते   


स्वर्ण रंगात  येताची मिळे जीवन जनांना
 प्रफुल्लित मने जन वदे "प्रभात "त्या क्षणांना      
झाली उष:काल नव आशांची मनी भासते
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पाहते       

वैशालीवर्तक

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

पक्ष्यांची भरली शाळा

शीर्षक...पक्ष्यांची भरली शाळा


होता झुंजुमुंज पहा
सुरु होतो किलबिलाट 
कोण सांगते तयांना
उठा झालीय  पहाट

होते बसले अंगणी
 लक्ष गेले झाडाकडे
चिवचिवाट करती पक्षी 
कोणाचे ऐकावे गडे

चिवचिव चिमण्यांची
चालू होती अविरत
त्यात पोपट मैनाची
साद आली दबकत

कावळा ओरडे कर्कश्श
गेला उडून क्षणात
म्हणणे त्याचे न कोणी ऐकी
राग आला त्याच्या मनात


करत होते किलबिलाट
रंगी बेरंगी लहान पक्षी
मधेच उडून जाती तेव्हा
नभात दिसे छान नक्षी

पक्ष्यांना एकच होता प्रश्न
थांबव ना. मानवा वृक्ष तोड
 पक्ष्यांनी  कुठे रहावे ?
करा काही तडजोड

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गीत. तुझी वाट पहाते रे

तुझी वाट  पहाते रे कधी येशील.     गगनी अधीरता मनी दाटे.    तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते           आशा रुपी  कळ्यांची फुले  फुलती स...