शनिवार, २६ एप्रिल, २०२५
चित्रावर काव्य सिंगापूर शब्दगंध
शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५
शिकावं
मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम.काव्य लेखन
विषय. शिकावं
शिकावं शिकावं खरच
कथन उचित सहज
स्वतः ला घडविण्यास
शिकण आहे गरज
जीवन संपेल तरीही
शिकण चालूच राही
शिक्षण शब्दास कधी
समाप्त शब्द येत नाही
दिलाय मेंदू देवाने
करा सारासार विचार
पहा निसर्ग पण देतो
शिकवण सहज अपार
पहा अथांग समुद्र
लाटा उसळत किनारी
उचंबळूनी येता देती
मनास देती उभारी
ऐकून नियमित संतवाणी
मिळे मनाला शिकवण
चांगल्या विचारांची
होते मनी साठवण
वैशाली वर्तक
अहमदाबाद
लेख....मी कोण कविता मी कोण
साकव्य लेख स्पर्धा
दि 24 ते 30 एप्रिल 2025
विषय ... मी कोण
समोर दैनंदिन पडली होती. व तिच्या समीप लेखणी, तिच्या कुशीत विसावली होती. माझे लक्ष सहज त्या दोघींकडे गेले . कशा ऐटीत मेजवर बसल्या होत्या. दैनंदिनी जणु लेखणीस प्रेमाने कुरवाळत होती. सहजपणे मी दैनंदिनी जवळ घेतली , व लेखणीस हातात घेतले. शारदेला मनोमन वंदन करुन, मनीचे घोळत असलेले विचार लेखणीच्या द्वारे दैनंदिनीत शब्द रुपाने झरले,... आणि ते शब्द.. शब्द गुंफीत गेले व मनाचे गुज मांडीत गेले. मनीच्या भावनांना रिक्त करता.. करता, शब्द माळ गुंफत जाता , पाहिले तर मला काव्य , कविता प्रसवली. मी त्या शब्द माळेस पुन्हा पुन्हा वाचून योग्य तेथे सुधारणा केली. मनातून आनंदले.जनात पण वाचून, बोलून दाखवली. जन मनाला पण तितकीच भावली.
पुढे पुढे मज छंदच जडला. मनातील भावना कागदावर उतरविण्याचा.... सतत लेखनाने विचारांना प्रेरणा मिळत गेली . माझी लेखणी जास्त जास्त स्फुरत गेली . व ती दिवसेंदिवस जास्त देखणी बनत गेली. आता विषय मिळता , वा सहज बसले असता, हलती डौलती पाने फुले.,.. मस्त हवेत स्वच्छंदाने उडणारी पाखरे,.. वा वा-याच्या झुळुकेवर डोलणारी शेते, ..काबाडकष्ट करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी पाहून निसर्गातून मला भावना उचंबळून येता , माझ्या भावनांना वाट करण्यात, लेखणी पुढे सरसावत गेली.
आणि निसर्ग तर आहेच गुरू तो तर नवनवीन विचारांना प्रेरणा देतोच . जसे चित्र कार त्याच्या कुंचल्यातून दृश्य जसेच्या तसे रेखाटतो तसे मी शब्दांतून गुज मनीचे लेखणीतून सांगु लागले . सतत़ लेखन सरावाने लेखनास धार येऊ लागली.
आता एक वेगळीची बॅंककर , नेशनल तरणपटू , निवृत्त काळात कवयित्री होऊन अनेकदा अ. भा .मराठी साहित्य संमेलनात मी काव्य सादरीकरणात आमंत्रित होऊ लागले .
माझे मलाच कळले ना! मी शब्दकार कधी बनले.
वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद
8141427430
मोहरली लेखणी साहित्य समूह
विषय...*मी कोण*
मी कोण असे पुसता
प्रश्न ..अस्तित्व,वा स्व ओळखीचा
मी,आहे तुमच्यातील सारस्वत
छंद जडलाय लेखणीचा
आहेत साहित्य समूह अनेक
जतन करण्या मायबोली
देत-घेत विचारांना चालना
रचिते रोज चार ओळी
होते खरी तरणपटू, बेंकर
निवृत्तीत छंद जडला लेखणीचा
अन् अविभाज्य स्थान तिज लाभता
मान मिळाला कवियित्रीचा
अ.भा साहित्य संमेलनी आमंत्रित
कवि कट्टयावर सादरीकरणासाठी
भेटूया साता-यास आपण
सारस्वत भेटीचा आनंद घेण्यासाठी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मंगळवार, २२ एप्रिल, २०२५
या सुखांनो या. सुख मिळाले
सोमवार, २१ एप्रिल, २०२५
चित्र काव्य पादाकुनक वृत्त बध्द लिखाणाचा प्रयत्न
रविवार, २० एप्रिल, २०२५
अभंग....थोरवी भिमाची
महा स्पर्धा
स्पर्धा फेरी क्रमांक ३
पंचकाव्य रत्न महास्पर्धा
२०\४\२५
काव्य प्रकार अभंग वृत्त
विषय ...भीमाची थोरवी
शीर्षक ..*दीन दलितांचा वाली*
थोरवी भीमाची | कर्तृत्वाची गाथा. |
नमवती माथा. | तूज पायी. ||. १
बुध्दीने तेजस्वी | भाषा पारंगत. |
तूची यशवंत | भीमराव ||. २
बंड पुकारून | दिले सर्वां पाणी |
तव गुण गाणी | गाती लोक. ||. ३
दलित जनांच्या | कल्याण्याचा यत्न. |
तू भारत रत्न | भूषविला. ||. ४
बहुजनांचा तू | होताची कैवारी |
भिमा सुविचारी | हमखास ||. ५
समतेचा भाव | दया सर्वांवरी |
मान घरोघरी | मिळविला || ६
देशाची घटना | संविधानकार. |
देश शिल्पकार | मान तुला ||. ७
वैशाली वर्तक.
अहमदाबाद
नाते हळुवार जपताना
पिवळे पान / पिकले पान
पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान जैसे पर्णांचे पिकणे नियमच असे सृष्ट...
-
अनुराधा पिंपळे किती शोधक नजरेने उभी रम्य निसर्गात प्रसन्नता दिसे मुखावरी कलेची छटा गवसली मनात निसर्ग रंग भरून नयनी मनी तयारी कला कृती...
-
अ भा म सा प स्वप्नगंध समूह उपक्रम 32 उपक्रम--- ओळ काव्य विषय -- शोधू आनंदाच्या वाटा शीर्षक -- **सुखाची सकाळ** येवो कठीण प्रसंग धीर राखू स...
-
कल्पतरू जागतिक साहित्य मंच आयोजित दशपदी काव्य विषय - असाच यावा पहाट वारा सोनसळी किरणांची उषा देते मनास नवीन आशा थंड वा-याची मंद ...
