शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

जीवनाच्या वाटेवर (लेख)

जीननाच्या वाटेवर
         खरच , जीवन हा एक प्रवास आहे . प्रत्येकाने ती वाट हसत , रमत गमत चालली पाहिजे. कारण या वाटेवर सदा काही फूलेच पसरलेली नसतात. कधी  काटे रूपी संकटे , दुःखे  तर कधी खळखळ मंजुळ आवाजात वहाणारे, दोन्हीही बाजूस सुंगधी
फूलांचे ताटवे , हसत खुणावणारी मृदु तृणांकरे रूपी  मखमली  सुखांची पाय वाट असते. तर जीवन ही सुख दुःखाची पाउल वाट आहे.
        तेव्हा जीवनात येणा-या या सुख दुःखाचा ज्याला तालमेळ जमतो. तोच यशस्वी  जीवन जगू शकतो.  म्हणूनच तर
        व्यथा असो आनंद असू दे
        प्रकाश असो वा तिमीर असू दे
          वाट दिसो  वा न दिसू दे
           रुणु झुणती तराने
           माझे जीवन गाणे
असे  आनंदाने येणा- या संकटांना मात करत , सामोरे जावे लागते .
      पृथ्वी  पहा ना ऊन वारा पाऊस सहन करत  परिभ्रमण करत असते.
अहो  , राम कृष्ण यांना पण कुठे जीवनात सरळ सोट अशी जीवन वाट लाभली. त्यांना पण जीवन वाटेवर फूले व कांटे आलेच ना. म्हणजे सुख दुःखे  आलीच ना .कृष्णा चा जन्म कारावासात झाला .जन्मल्या जन्मला पावसात , दुथडी भरलेल्या यमुनेतून  त्यांना
जावे लागले . तर रामास वनवास भोगावा लागला.
      एकूण काय जीवन ही खडतर वाट असते. नदी नाही का कांटेरी ,खडकाळ मार्ग  आक्रमित येत असते. तसेच आपली जीवन वाट. त्यात कधी कधी प्रलोभने येतात त्या प्रलोभनांना बळी न पडता धोपट मार्ग  आपनवत जावे लागते . नाहीतर जीवन वाट विकट बनते.
         जीवन वाटेवर  अंत पण नक्कीच  असतो. तो कोणालाच चुकत  सुटत नाही. तेव्हा जीवन वाटेवर चालतांना कर्म ह्यालाच देव मानत चालले पाहिजे. सत्कर्म ची कास धरून जीवन वाट चाललो की ती नक्कीच  सुखद होते.

वैशाली वर्तक

रविवार, २६ जानेवारी, २०२०

सांताक्लाॕज (ललित)

 सांताक्लाॕज  (ललित)
 सांताक्लाॕज म्हणजे देवदुत ...बालपणी मुलांना त्याच्या आवडीच्या विविध
गोष्टी आणून देणारा.   त्यांच्या इच्छा पु-या करणारा.  रात्री  सांता येईल व तो  बर्फाने अच्छादलेल्या  ख्रिसमस  ट्री वर  त्या वस्तू ठेऊन जाईल  अशी गोड कल्पना पालकांनी दिलेली असते.
     तसे प्रत्येक  पाल्याचे बाबा....  आताच्या काळात आई पण....हो आई पण आॕफीसला जाते .त्यामुळे मुलांसाठी त्या पण  सांताक्लाॕज झाल्या  आहेत.
     हो ..मला तर लहानपणी माझे बाबा सांता च वाटायचे ..काही वस्तू मागा दुस-या दिवशी  येतांना अथवा बाहेरून आले की ती हजर असायची.
     मला आठवतय मी माझ्या  मुलांना विविध स्पर्धेत भाग घ्यावयास लावायची व स्पर्धेला घेउन जातांना वा ते निघाले की म्हणायची ,"नीट भाग घ्या,  यशस्वी  व्हा. घरी आल्यावर देवबाप्पा पहा तुम्हाला बक्षीस देणार आहे " ..व मग ती मुले गेल्यावर काही तरी वस्तू ,  मुले घरी येण्या अगोदर  देवा जवळ ठेवून द्यायची .पोर  त्यांचे ते  ,
 तर विजेता होऊन यायचेच व घरी आल्यावर बाप्पाने पण गीफ्ट दिलय पाहून मुले खुश व्हायची. घरी बक्षीस मिळाल्याने जर कधी यश नाही मिळाले......    तर ती  नाखुष होऊ नये म्हणून या बक्षीसाने खूश व्हायची. की देवाने तर बक्षीस दिले.
       तोच पुढे देवावरचा विश्वास म्हणून कामास आला. देवाने महेनत केली तर नक्कीच  यश देतो.तेच विचार आज पण रुजले आहेत. की देवाने सुदृढ  शरीर दिलेले आहे त्यात सुंदर  मन ..जे सकारात्मक भावनांनी ठेवले पाहिजे .व यशासाठी प्रयत्न
केले पाहिजेत.. म्हणजे देवदुत म्हणजेच सांताक्लाॕज तुमच्या इच्छा पूर्ण  करतो. कधी वेळ लागतो ...कधी  नाही पण मिळत ,...पण हार न मानायची ही इश्वरी गीफ्ट ..इच्छा शक्ती तो सांता देतच असतो. 
   अशी सांताक्लाॕजची..  देवदूताचे  सांताक्लाॕजचे बालपणातील रुप.... आई बाबा चे बदलत जाऊन ...देवा पर्यंत  येउन पोहचले आहे . असा सांताक्लाॕज तुमच्या पण मनातील इच्छा पूर्ण  करो व बक्षीस रुपी यश सदैव देत राहो. हीच नाताळ बाबाला प्रार्थना .

वैशाली वर्तक

निखील ( संस्कार शिकवण )


*निखील ..*

       


निखील ..*

      ..  निखील गोड मुलगा. दिसायचाही गोड. बोलायचा पण  गोड.एकदा सहज आईबरोबर तिच्या मैत्रीणीकडे गेला होता. तिचाही त्याच्याच वयाचा मुलगा होता.ते दोघे  एकत्र खेळले.खेळता खेळता त्या मुलाने त्याची खेळणी काढली. त्यात एक सुंदर  रंगीत रबर होते. सहज निखीलचे लक्ष त्या रबराकडे गेले. त्याने ते हातात घेताच तो मित्र म्हणाला ,
   " अरे, बघ त्या रबरास किती सुरेख सुगंध आहे ." निखीलने ते रबर हाती घेतले.त्याने त्याचा सुगंध घेतला.निखील म्हणाला ,
        "खरच की रे! छान सुगंध येत  आहे. "
मग दोघे खेळली आणि शेवटी त्या दोघांनी खेळता खेळता खेळणी भरली.दुसरा खेळ खेळायला लागले.पण निखीलच्या मनास त्या सुगंधी रबराने भुरळ पाडली होती.त्याने ते रबर हळूच आपल्या हातात ठेवले.त्याच्या मित्राला नकळत त्याने खिशात ठेवले.त्याची आई व मैत्रीणीच्या गप्पा झाल्या. थोड्या वेळाने मग आई व तो आपल्या घरी आले.निखीलने रबर हळूच स्वतःच्या  दप्तरात ठेवले.
        .. दोन तीन दिवसांनी आई निखीलचा अभ्यास घेत असता सहज तिचे लक्ष त्या रबराकडे गेले.आई म्हणाली,
           " अरे, निखील, हे रबर कुठून आणलेस ? आपल्याकडे तर असे नव्हते. "
तो गप्प राहिला.आईने पुन्हा विचारले,
          " सांग ना .. "
खोटे बोलणे पाप असते म्हणून खोटे कधी बोलू नये,ही आईची शिकवण त्याला आठवली. म्हणून याने खरे सांगून दिले .
आई म्हणाली ,
           " अरे , दुस-यांची वस्तू न विचारता घेणे , याला चोरी म्हणतात.तुला त्या रबराचा मोह झाला व तू ते रबर घेतलेस ? आणि त्यालाच मोह म्हणतात.मोह होऊन तुला ते रबर घेण्याची , जे आपले नाही तरी ते घेणे, यालाच तर ती चोरी म्हणतात.तू त्याला विचारुन घेतले असते तरी चालले असते पण न विचारता घेणे,हे पाप आहे ."
निखील घाबरा घुबरा झाला.रडू लागला .
आई म्हणाली,
          " घाबरु नको बेटा.देवाजवळ जा,देवाला नमस्कार कर व त्याला सांग, की देवा माझे चुकले.मी त्याचे रबर न विचारता घेतले.मला क्षमा कर .आता मी कधी अशी चुक करणार नाही. उद्या माझ्याबरोबर  चल व ते रबर त्याला परत कर. "
निखीलने मान हलवली.
        दुसऱ्या दिवशी त्याने आई बरोबर जाऊन रबर परत केले.
          ..  काही दिवसांनी तो बाजारात असताना त्याला कोणातरी माणसाचे पैसे खिशात टाकत असता खाली पडलेले दिसले. ते पैसे एक माणूस उचलत होता. निखीलने जाउन त्या माणसास आडविले व म्हणाला ,
           " थांबा , हे पैसे या काकांचे आहेत.तुम्ही त्यांचे पैसे पडतांना पाहिले म्हणून त्यांना द्यावेत. "
तो दुसरा इसम थांबला आणि  शरमला .त्याने ते पैसे ज्याचे होते त्याला दिले.ते दोघे इसम एकमेकांकडे पहात राहिले.
निखील म्हणाला ,
          " जी वस्तू आपली नाही, ती घेणे हीदेखील एक चोरीच असते. "तो बोलतच राहिला आणि त्याचे शहाणपणाचे बोलणे ऐकून ते दोघे त्याच्याकडे अवाक् होऊन पाहतच राहिले .....

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...