बुधवार, ३ जानेवारी, २०२४

चित्र काव्य. कृतार्थ भाव

चित्र काव्य 
कृतार्थ भाव


झाली तयार नृत्यासाठी
केला लओभनईय शृंगार
हास्य विलसते मुखी
सुंदर केला  आविष्कार

जीव प्रण ओतुनीया
केले सुंदर नृत्य सादर
झाले हावभाव परिपूर्ण
दिला प्रेक्षकांनी आदर

मन लावूनी नाचता
धुंगरु तुटून विखुरले
एकरूप होऊन नाचता
पाय जर न डगमगले

संपता नृत्याविष्कार
वेचले धुंगरु प्रेमाने
पहातेय  तयां कडे
कृतार्थतेच्या भावाने 

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...