गुरुवार, १८ जुलै, २०२४
मर्मबंध
बुधवार, १७ जुलै, २०२४
विठूराया.(.6).. विठू तव चरणाशी |पांडुरंग|||. विठ्ठलाचा नाद|, दर्शन घेता तुझे पांडुरंगा.
5 कुठे शोधु विठुराया* अष्टाक्षरी
कोठे शोधू विठूराया
तुझ्या नाम स्मरणाचा
मना लागलासे छंद
भासे भक्तीतच शक्ती
लाभे आगळा आनंद
सदा तव नाम ओठी
तूची श्वास अंतरीचा
कुठे शोधू विठू राया
ध्यास तुझ्याची भेटीचा
ध्यानी मनी स्वप्नी मज
तूच दिसे सदाकाळ
विठू तुझ्या स्वरुपाने
झाली सुखद सकाळ.
.मुखी घेता तव नाम
विसरते देहभान
कुठे शोधु विठूराया
गाते तव गुणगान
नाम स्मरणात असे
अनामिक दृढ शक्ती
नका शोधू विठुराया
करा मनोभावे भक्ती
रूप वसले लोचनी
भासे कृपेची साऊली
युगे अठ्ठावीस ऊभा
माझी विठ्ठल माऊली
येता वारी पंढरीला..
झाली घाई दर्शनाची
पाहियली हरी मूर्ती.
काढा दृष्ट विठ्ठलाची
वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद
शब्दरजनी साहित्य समूह
आयोजित
अष्टाक्षरी काव्यलेखन
6विषय ...मनी विठ्ठलाचा नाद
शीर्षक...भेटीसाठी आतुर
येता जवळ आषाढ
ध्यानी मनी विठुराया
जाऊ चला पंढरीला
देई तो प्रेमाची छाया
मनी रंगविले स्वप्न
माऊलींच्या भेटीसाठी
नाही तमा पावसाची
विठु आहे सदापाठी
गजरात सदा दंग
जयघोष विठ्ठलाचा
मिळे परम आनंद
श्रीहरीच्या भजनाचा
एक पाही दुसऱ्यात
दिसे विठ्ठलाची मूर्ती
असा समतेचा भाव
अशी वारीची ही किर्ती
लागे भक्तांनाही ध्यास
*मनी विठ्ठलाचा नाद*
मन भक्तीत रंगता
मिळे तसा प्रतिसाद
नाचू गाऊ होऊ दंग
दुम दुमेल पंढरी
डोळाभर दर्शनाने
झाले संतृप्त अंतरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मंगळवार, १६ जुलै, २०२४
आता असेच जगायचे
काव्य निनाद साहित्य मंच पुणे
आयोजित उपक्रम
दि 15/7/24
विषय. आता असेच जगायचे
आता असेच जगायचे
मिळालाय मानव जन्म
करू सार्थक जीवनाचे
नको कधीच विचार मनी
*आता असेच जगायचे*
आहे सुंदर हे आयुष्य
कशाला होता निरूत्साही
झटका मरगळ मनीची
निशे नंतर ऊषा येते सदाही
बाल्य तारुण्य वार्धक्य
असती टप्पे जीवनी तीन
बागडण्यात, कर्तृत्वात ,
अन् नामस्मरणात होऊ लीन
आता असेच जगायचे
नको कदा सूर निराशाचे
रोज सकाळ येते घेऊन
किरण नव्या -दिशा आशाचे
व्हायचे तेच होणार
नको चिंता कदा मनी
जायचे ते अचूक जाणार
मंत्र हाची ठेवासदा ध्यानी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सरत्या वर्षाने काय दिले
स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित झटपट काव्यलेखन स्पर्धा विषय सरत्या वर्षाने काय दिले विचार करता मनी काय मिळाले गत वर्षात दिले सुख आनं...
-
काव्य स्पंदन राज्य स्तरीय समूह 02 काव्य प्रकार -- अष्टाक्षरी 1 विषय -- उंच भरारी आकाशी आहे तुझ्यात कर्तृत्व घेण्या नभात भरारी दाव सामर...
-
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम 348 विषय. नारळ कल्पवृक्ष स्थान फळांत मानाचे असे सदा नारळाला श्री उपपद लावून वदती ...
-
इथं इध बस ग चिऊ दाणा खा पाणी पी अन् बाळाच्या डोक्यावरून भुर्रsssकन उडून जा. असे म्हणत विभावरी बाळाला खेळवत होती. ...