बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

बालगीत.... चिव चिव चिमणी

अ भा ठाणे जिल्हा समूह १
आयोजित 
उपक्रम
विषय -चिव चिव चिमणी

चिव चिव चिमणी
करते चिवचिवाट
येते नाचत अंगणी
होता रोज पहाट

नाचतच चालतेस
उचलते दाणे पटकन
घेते स्वतः भोवती गिरकी
उडून जाते झटकन

दाणे घेउन जाते घरटी
पिल्लांना खाऊ घालण्या
घेते काळजी पिलाची
शिकवते तया उडण्या

रूप तुझे पिटूकले
परि आहे ते मोहक
नाच तुझा विलीक्षण
 नेहमी चित्त वेधक

कुठे दूरवर गेली पळून 
बाळांना प्रिय रूप न्यारे
हवय आम्हा तव अस्तित्व 
घेऊ काळजी आता सारे 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

मोती

अ भा म सा प ठाणे समूह  आयोजित उपक्रम
विषय नवरत्न

*मोती*

रत्ने असती नऊ
मोती तयातील एक
काही म्हणा शान अनोखी
 मोत्याची जरी रत्ने अनेक

तन्मणीत रुबाब मोत्याचा  
दिसे  ललना  भारदस्त 
शोभे कंठ चार जणीत
अलंकार जबरदस्त 


पहा नथीतील मोती
वाढवी रुप शृंगाराचे
नाक चाफेकणी शोभे
लक्ष वेधते जनमनाचे


गुण असे मोत्याचा
राखी स्वभावास शांत
मोती रत्न आणती झळाळी
शृंगाराची नसे भ्रांत

आग्रहे सांगती ज्योतिषी
मोत्याला तेही  देती  मान
रत्नाकर उधळतो मोती
मोती अलंकाराची  सदा शान

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

गर्वाचे घर खाली

 

गर्वाचे घर खाली

लोभ, मोह मद दूर सारा
दिली संतानी शिकवण
गर्वाने, मदाने न,.. फुलता
जगता  ह्याची, ठेवावी आठवण.

बालपणात ऐकलेल्या गोष्टीचे
ध्यानी ठेवावे जीवनी  सार
न करिता गर्व जीवनात
ह्या ज्ञानाचा घ्यावा आधार

दुर्योधनाच्या मनीचा अती  गर्व
ठरला त्याच्या विनाशास कारण
असूनी शूर महा योध्दा ज्याने
अंगीकारले नाही, सुनीतीचे धोरण

गर्व  कशाचाच नसावा मनी
सदा राखावा माणुसकीचा धर्म
आज असे, उद्या  नसे रुप पैसा
हेच जाणून घ्यावे जीवनाचे मर्म

बलिदान

अ भा म सा प समूह2
उपक्रम 360
विषय - बलिदान


स्वातंत्र्याच्या लढ्यात 
झाले शहीद जवान
 बलिदानाचे  जाणा मोल
भारत मातेचे  ते वीर महान

केली नाही पर्वा घरदाराची
ओतियले   वीरांनी पंचप्राण
  पारतंत्र्य  घालविण्यासाठी
 केले  सर्वस्वाचे बलिदान 

  
  इतिहास सांगतो त्यांची ख्याति
  स्वातंत्र्य  वीर आहेत  अगणिक
  समजावून सांगु त्यांची कीर्ती 
  कळेल  महती  ऐतिहासिक 
 
   नुसते वंदन करुनी दोनदिस
होत नसे उपकार फेड सहज
जाणा महत्त्व  स्वातंत्र्याचे
 आहे आज तीच गरज

वैशाली वर्तक
अहमदाबाद

प्रयत्न

सावली प्रकाशन समूह
विषय - प्रयत्न 

करिता प्रयत्न  अतोनात
यश संपादन  हे खचित
करणे परीश्रम सफळतेसाठी 
प्रयत्नांती परमेश्वर हेच उचित

प्रयत्नांची पराकाष्ठा
सदा करावीच लागते
येते तेव्हाची यश हाती
यश च महती सांगते

पूर्ण  करितो जाळे स्वतःचे 
कामात व्यस्त राही सतत
पडून खाली अनेकदा
करितो कोळी प्रयत्न अविरत


मात करीता अडचणींना
प्रयत्नांना मिळाली चाहुल
तेनसिंगने केली पूर्ण मनीच्छा
एवरेस्ट वर टाकून  यशाचे पाऊल.

अशी महती प्रयत्नांची 
म्हण आहेच ती खरी
प्रयत्ने रगडीता तेल गळे
यत्न  देती उज्वल यश भरजरी.
यत्न देती उज्वल यश खरोखरी


सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...