अ भा म सा प समूह 02
आयोजित उपक्रम
पिकले पान
पिवळे पान ,पांढरे केस
असती दोन्हीही समान
ऊन पावसाळे साहिलेले
जयांना द्यावा सदा मान
जैसे पर्णांचे पिकणे
नियमच असे सृष्टीचा
बाल्य ,तारुण्य , वृध्दत्व
हाची क्रम आयुष्याचा
किती सहजतेने पर्ण
येते गिरक्या घेत भूवरी
घेते विसावा खत म्हणूनी
पुन्हा फुलवण्या धरेवरी
वृध्दांच्या जीवनातील
मिळालेले अनुभवाचे बोल
नव पीढिला ठरे मार्गदर्शक
जाणावे सदा त्याचे मोल
पिकल्या पानांनी पण
गाऊ नये सदा इतिहास
सद्य काळ तितकाच कौतुकाचा
पहातआनंदे वाढवा त्यांचा उल्हास
वैशाली वर्तक
अहमदाबाद