भिती/भय
लहान ३/४ वर्षाची तनु उगीचच कटकट करत होती . व रडत बसली होती . समोर ठेवलेले दुध पीत नव्हती.
तिची आई तिला समजवत होती. बरेचदा समजवून झाले. गुण्या गोविंदाने , प्रेमाने, लाडाने, पण ती काही रडणे थांबवित नव्हती. शेवटी कंटाळून दमदाटी देण्यास सुरुवात केली. व मग शेवटी रागावून म्हणाली,आता पोलीसांना बोलवेन हं !कोण उगीचच रडतय. केव्हाचे! "पोलिस" शब्द ऐकून छोटी तनु म्हणाली ,"नको नको .पोलीस नको म्हणत तिने पुढ्यातील दुध हळूहळू संपविले. व रडणे पण बंद केले . एकूण काय तनूच्या आईला तिचा हट्ट ,रडण संपविण्यास पोलीसांची भिती वा भय दाखवावे लागले. भय तयार करावे लागले.
भिती ही माणसाच्या मनाची एक संवेदना आहे. मनुष्य लहान म्हणजे अगदी तान्हा असतो तेव्हा त्यास कसलीच भिती नसते. ना अग्नी ,ना कुठला प्राणी . जस जसा त्याच्या मेंदूचा विकास होतो. तस तसे त्याच्या मानसिक भावनांचा संवेदनांचा विकास होतो. त्याच्या राग लोभ मोह भय भिती वगैरे भावना जागृत होतात.
त्यातील भिती या भावनेचे पण अनेक प्रकार असतात. भय जात्याच असते भिती ही तयार केलेली वा तयार झालेली असते भय ब-याच गोष्टींचे असते .जसे अंधाराचे भय . अंधारातून जावयास बालवयात भिती वाटते.अंधारात असुरक्षितता भासते. त्यामुळे असुरक्षिततेचे भय असते. मुलींंना वा स्त्री जातीला वा सर्वाना अंधारातून जातांना असुरक्षितता भासते. व त्यामुळे अंधाराचे भय वाटते. असुरक्षिततेचे भय स्त्रीयांच्यात नेहमी असते. वेळ प्रसंगी तोंडावर न दिसू देता वरून शूरपणाचा, धारिष्टतेचा आव आणून प्रसंगावधानाने वेळ निभावून नेतात. पण मनात असुरक्षिततेची भिती असतेच.
तशीच असुरक्षितता वस्तूंच्या बाबतीत असते . त्यामुळे चोरीचे भय तर सर्वाना असतेच.किंमती वस्तू ,दाग दागिने महत्वाचे पेपरस् वगैरे हरवू नयेत .त्यांना जपण्याचे, गहाण तर होणार नाहीत ना असे भयाचे दडपण मनात असतेच.
त्याच प्रमाणे भिती अपयशाची वाटत असते. आपण नक्की केल्या प्रमाणे मार्कस् मिळतील ना? पुढे मना सारखे जॉब वा सर्वीस मिळेल ना? मनासारखे यश प्राप्त होईला ना? अशा प्रकारच्या मानसिक दडपणाची भिती मनात असतेच.
पण काही भिती अशा असतात ज्या मनात ठाम मांडून असतात .काही अशा गोष्टींचे भय मनात सतत असतेज्याला फोबिआ (अकारण भिती)म्हणतात .अति उंची चे भय ,अति उंचावरून खाली पहाणे भितीदायक वाटते. वा लिफ्टमधे बसण्याचे भय , ईलेक्ट्रीसीटीचे भय ,पाण्याचे भय, वगैरे. तसेच काही भय वाढत्या वयानुसार कमी पण होतात.
काही भय वा भिती अशा असतात की भिती वाटत असून मनोरंजन म्हणून भिती वाटत असून त्या भयाचा अनुभव घेण्यास आवडतात. जसे मेरी गो राउंड वा रोलर कोसटर ची राईड वा झुरासिक पार्क मधील राईड . Bounty jumping या राईड मधे मनोरंजन म्हणून बसतात मोठ्याने ओरडून भय दूर करतात . व मजा व साहस अनुभवतात.
तसेच प्राण्यांचे भय असते. अगदी कुत्रा सारख्या प्राण्याचे वा बायकांना तर पाल झुरण सारख्याचे भिती /भय असते . कुठे गेले की आधी भिंती कडे नजर टाकून पाल नाही ना ?ची खात्री करुन घेतात. आणि त्यांना कुठून तरी दिसतातच .म्हणतात ना "भित्या पाठी ब्रह्मराक्षस"
सभाधारिष्टतेचे भय पण असते. वक्ते होण्या अगोदर चार लोकांच्यात बोलणे सभेला उद्देशून बोलणे.नटांना वा कलाकारांना अगोदर भिती असते पण मग सरावाने त्यांना अंगवळी पडून भिती रहात नाही. पुढे सहजतेने सभा धारिष्ट्यता येउन भिती दूर होते.
अशी अनेक प्रकारची भिती माणसास असते. पण ह्या सर्वाहून भय असते,ते आपल्या हातून कधीच वाईट गोष्टी ,कर्म घडू नये. खोटे बोलणे ,चोरी ,लबाडी ह्या पासून दूर रहाणे. व हे भय सकारात्मक भय आहे. त्या भयाने आपले मन सदा पापभीरू रहाते. व मन वाईट कृत्यापासून परावृत्त ठेवते. एवढेच नव्हे तर आपले मनोबळ वाढविते. सकारत्मकता अंगी आणते. तेव्हा प्रत्येक कर्म करतांना चांगलेच काम करण्याची वृत्ती बाळगण्याचे भय सतत बाळगावे, म्हणजे ख-या अर्थाने "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." असा देवाचा संदेश कानात घुमत रहातो. व आपण भय मुक्त होतो.
कमल विश्व राज्यस्तर स्पर्धा साहित्य समूह
आयोजित, मार्च २०२३ ,मासिक भव्य राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा
*स्पर्धेसाठी*
विषय ...भय
शीर्षक..*भय कुकर्माचे*
भय ही मानसिक भावना
करी मनास विचलित
वाढे चिंता, काळजी मनाची
मन होई भयभीत.
भयाचे असती प्रकार अनेक
अपयशाचे , चोरी वा अपघाताचे
सुरक्षितेचे भय,नारी जगताला
मनी सदैव लज्जा रक्षणाचे.
पाणी, वीज ,अग्नीचे पण भय
भासते जनांना जीवनी.
आयुष्य सुख दुःखाचा खेळ
भय बाळगू नये क्षणोक्षणी .
नैसर्गिक आपत्तीचे भय ,सर्वांनाच
तया समोर न चाले कोणाचे काही
नामस्मरण, धावा देवाचा हाच उपाय
तोची कर्ता करविता सदा राही.
पण असावे सदा मनी *भय*
पापकर्मे टाळण्याचे जीवनी
*'भिऊ नको मी आहे पाठीशी*
स्वामींचा संदेश मिळतो मनी.
वैशाली वर्तक
अहमदाबाद