शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

मरगळ

विषय - मरगळ

 एक मनाची स्थिती 
 असते  ही  मरगळ
येता कंटाळा जीवाला
भासे नाही जीवात बळ
 
संगीत असे उत्तम 
कुठला तरी हवा छंद
येई अशा  वेळी कामा
 दूर  मरगळ, मिळे आनंद

 बदल पण हवा जीवनी
येतो उबग तेच काम करुन
वाढते जीवाची मरगळ
अर्थच  न वाटे मनातून

दूर करण्या मरगळ
जावे समुद्र  किनारी
  पहाता लाटा उचंबळलेल्या
 देती मनास उभारी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

म्हणीवरुन... काखेत कळसा \संकल्प

अ भा म सा प मुंबई  प्रदेश 
उपक्रम
विषय -काखेत कळसा गावाला वळसा
सहाक्षरी


वस्तू  पिशवीत 
शोधे जगभर
स्वतःच ठेवली
हसे क्षणभर 


सहज लावली
काखेलाच  झोळी
कुठे न  दिसता
देतोय  आरोळी

 कामे भरपूर 
विस्मरण घडे
समजेना क्षणी 
काय करु गडे

 हातात कंकण
शोधते खणात
मिळेना कुठेही 
घाबरे   क्षणात



निघाली पाण्याला
काखेत कळसा
कुठेशी राहिला  
गावाला वळसा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




अ भा म भा प मध्य मुंबई समूह क्र २
आयोजित
उपक्रम
३०१
विषय..संकल्प
सहाक्षरी रचना
संकल्प संकल्प

करावा संकल्प 
निश्चय सहज
  वर्षारंभाचीच
नसते गरज

संकल्प करणे
 नाही सोपे काम
पूर्तता करणे
यात मिळे नाम

दृढ निश्चयाने
टाकता पाऊल
संकल्प पूर्तीची
लागते चाहुल

मनाचा संकल्प
वृक्षा रोपणाचा 
हरित वसुधा 
सदा पाहण्याचा

निश्चयाने राखू
  स्वच्छ भारताला
होईल पूर्तता
ती अभियानाला

चांगल्या कामाची
करा संकल्पना
निश्चित होईल
सफळ कल्पना

वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

माझा आनंद

माझा आनंद

माझी  लेखणी
आयोजित 
उपक्रम 
विषय - माझा आनंद

मिळतो मला आनंद 
लहान लहान गोष्टीत
उमलते फूल पाहता
मोद मिळतो  सृष्टीत

रोजचाच सूर्योदय 
देतो मनाला आनंद
मिळते स्फूर्ती मजला
रमणे निसर्गात  हाच छंद.

लेखणी आहे माझी सखी
भाव करी काव्यात साकार
दिसता तीअत्यंत देखणी
मनी देते आनंद अपार.

नातवंडात  रमताना
आठवे मज बालपण
विसरून वय माझे
आनंद करुन देते आठवण  


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...