सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

आनंद कंद वृत्तात. कविता ...1दु:ख. 2दुनिया

मोहरली लेखणी साहित्य समूह 
आनंद कंद वृत्तात 
विषय दु:ख

सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे.
नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे

संतोषिला मनाने,वाटे न खेद त्याला
दु:खात मोद शोधी, भासे सुखी जगाला.

मिळताच मोद जीवा, येतेच.   सूख घराला
राही सदा खुषीने ,   आनंदिला क्षणाला.

दाटून कंठ येतो, वाटे नकोच जगणे
डोळ्यात अश्रु धारा,नित्याच झाल मरणे.


ठेवून  शांत जीवा, जाईल दु:ख सारे 
शमतील दु:ख आता, वाहेल सुखद वारे 

वाचून संत वाणी, माझे मला कळाले 
नाही जगी सुखी तो ,भय दु:ख ते पळाले.



आनंद कंद वृत्तात 

दुनिया 
आहेच हे खरे की, दुनियेत रीत न्यारी 
जावे कुठे तरी ती, सोपी नसेच सारी          

दुनियेत लोक नाना,  सारे कसे   शहाणे 
वेडेपणाच दावी , होऊन ते  दिवाणे 

कोणास वेड भारी,कोणात ती धडाडी 
काही उगाच भित्रे, काही करी लबाडी

होते असे कधी ते, सोडून चोरट्याला 
 शिक्षेस योग्य मानी ,  निष्कारणी जनाला

चाले असा निरंतर, दुनियेत खेळ सारा
वाटे मनी कधी हा , होईल नीट न्यारा.    


वैशाली वर्तक 

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...