शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५
सरत्या वर्षाने काय दिले
बुधवार, १५ जानेवारी, २०२५
आठवणीच्या गावामध्ये
सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक ५७०
मुक्तछंद काव्य प्रकार
विषय. आठवणीच्या गावामध्ये
शीर्षक.. ताज्या झाल्या आठवणी
जुनी जुनी छायाचित्रे
पहात होतो बसलेलो
गेले आठवांच्या गावी
भान वेळेचे नुरले
आठवणीच्या गावात
गेले क्षणात रमून
कसे होतो ना आपण!
हसू आले आता स्मरून
रम्य जुन्या दिवसांची
झाली मज आठवण
जेथे प्रथम भेटलो आपण
केली मनी साठवण
किती केलेस नखरे
कधी नसे तू वेळेवर
मात्र मी असे उभाची
तुझ्या भावा बरोबर.
हात तुझा माझ्या हाती
दिली घेतली वचने जोडीने
भासली हसलेली सुमने
पाहुनीया त्या प्रीतीने
छाया चित्र सांगे कानी
कसे होईल विस्मरण
तुझ्या माझ्या मनातली
राहील सदा आठवण
बाहेर आलो आठवणीतून
तृप्त समाधानी मनाने
उन्हात पण चांदणे हसले
देवाजीच्या कृपाप्रसादाने
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मंगळवार, १४ जानेवारी, २०२५
चित्र काव्य
पहा कसा वाजवितो
गोकुळीचा तो मुरारी
कानी येताच स्वर ते
राधा होतसे बावरी
काय जादु होती जाणे
पावा वाजविता कान्हा
पक्षी प्राणी विसरती
गाईंनाही येई पान्हा
जल यमुनेचे पण
क्षणभर वाही मंद
सारा आसमंत वाटे
भरलेला जणु आनंद
मंत्र मुग्ध आसमंत
करितसे नंदलाला
काय महिमा मुरलीचा
वेड लावी गोकुळाला
मकर संक्रांत
परिचारिका
जगाचा पोशिंदा समूह आयोजित उपक्रम दि ७\५\२६ विषय परिचारिका सेवा रूग्णांची करणे गुणाने असे मायाळु नसे ठाऊक आराम स्वभावाने ती दयाळु परिचारिका...
-
अनुराधा पिंपळे किती शोधक नजरेने उभी रम्य निसर्गात प्रसन्नता दिसे मुखावरी कलेची छटा गवसली मनात निसर्ग रंग भरून नयनी मनी तयारी कला कृती...
-
अ भा म सा प स्वप्नगंध समूह उपक्रम 32 उपक्रम--- ओळ काव्य विषय -- शोधू आनंदाच्या वाटा शीर्षक -- **सुखाची सकाळ** येवो कठीण प्रसंग धीर राखू स...
-
गागालगा लगागा विषय ...पाऊस केला सहन उन्हाळा कोमेजली शिवारे केव्हा पडेल पाणी वाहील थंड वारे आले भरून अंबर आनंदले मनाने येतील थेंब आता पाऊ...



