बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

पंचाक्षरी चित्रावरुन मुग्ध मानसी

स्पर्धे साठी 
रोही पंचाक्षरी  (चित्र आधारित)

गुज मनीचे....

मुग्ध मानसी
स्तब्ध राहसी
गुज मनीचे
मुखी दावसी

हास्य पाहूनी
स्तब्ध राहूनी
भाव कळले
तुला बघुनी

वाट पाहती 
डोळे बोलती
अक्ष तुझे ची
हळु सांगती

मृग नयनी
हसू लोचनी
रुप गर्विता
दिसे वदनी

तुला पाहणे
नित्य रमणे
ओढ तुझीच
सदा स्मरणे

 .....वैशाली वर्तक     20/10/2019
8141427430

शब्द माझे सोबती\शब्द माझा सखा

येता मनात विचार
येती   अस्फूट अधरी
किती घाई ती तयांना
उतरण्या कागदावरी

  शब्द माझेची  सोबती 
बोलणेही ते शब्दांशी
उरातल्या स्पंदनाना
तोलणेते भावनेशी

चाले खेळ हा शब्दांचा
येती धावत सहज
जणु खुणावूनी वदती
आहे माझीच गरज

 प्रेम भाव तयावर
 करी  हसूनी स्वागत
खरोखरी  माझे साथी
पूर्ण  करिती मनोगत

 शब्द फुले गुंफुनीया
होते तयार कविता
देते मजला आनंद 
होते मनाची पूर्तता

वैशाली वर्तकमाझी शब्द सखी

कल्याण डोंबिवली महानगर
विषय - शब्द सखा माझा

  

दिन उजाडता
येते तिची सय
शब्द सखी माझी 
करी हयगय

धावूनी मनात
करीतात गर्दी
घाई लेखणीला
लावण्यास वर्दी

लागताच वर्दी
रूप साहित्याचे
संवाद वा काव्य
दावी  वाङमयाचे

देती साथ मला
राखे विचारात
कसा जातो दिन
कळे न क्षणात


मिळे विचारांना
सहजच वाट
उमटे भावना
साहित्याचा थाट

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सहाक्षरी निसर्ग

सहाक्षरी

निसर्गाचे किती
गावे गुण गान
सदा असे तोचि
ईश्वर समान

तयाच्या कृपेने
सजे सारी सृष्टी 
भरलेली त्यात
आनंदाची दृष्टी 

सदा निसर्गाचा 
राहो सम तोल 
कधीच न व्हावा
तो अ समतोल

अती वृष्टी होता
येतो ओला दुष्काळ
गवसते सुख
न दिसे सुकाळ

अवकाळी धारा 
बरसल्या अशा
सर्स्व बुडाले
झाली अवदशा

नको कधी कोप
तुझा रे ईश्वरा
सदा ठेव सुखी 
तूची विश्वंभरा

नसे सृष्टी  कोप
मिनवाचा लोभ
प्रगती नावाचा 
थांबवावा क्षोभ

भुकंप  प्रलय
निसर्ग  कोपाचे
होतसे घातक
सृष्टी च्या नाशाचे

वैशाली

काव्यांजली जीवन

2..3..2..1 काव्यांजली
जीवन

मानव जन्माचे
करुया सदा सार्थक
नको निरर्थक 
कदापी

जीवनात  असे 
सदा ऊषा निशा
नको निराशा
मनी

सरीता पहा 
करिते कधी खंत
नसे उसंत
तिजला

गुलाबाचे जीवन
जरी असते काट्यात
सुख वाटण्यात
सदाकाळ

जडवावा छंद
जीवनी एखादा मनाला
मोद तनाला
होतअसे

आला पहा 
आनंदाचा उत्साहाचा क्षण
समजा सण
सदासाठी

भरलेला आनंद
आहे सा-या जगती
पहा सभोवती
शोधुनीया

फुलात  पानात
निसर्गाने  भरला मोद
मनाचा शोध
करावा

वैशाली वर्तक

आरोग्य संपदा (अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद )

अ भा म स परिषद  समूह
 विषय - *आरोग्य  संपदा*

बालपणीची शिकवण
निकोप आरोग्य  संपदा
सुदृढ ,निरोगी , आयुष्य 
देवास हेच  मागावे सदा 

आरोग्य असता संपन्न
बाकी सर्व  सुखे सहज
 करिता  प्रयत्ने मिळतात
निकोप शरीर असे गरज

 विधात्याचे  अनंत उपकार 
 दिधले  तयाने शरीर   सुंदर 
बहाल केला तयात मेंदु 
करा त्याचा उपयोग मनोहर

नियामित आहार विहार
राखावे स्वच्छ तनास 
 व्यायाम हवाच  नेमाने
जो देई आनंद मनास

नका आहारी व्यसनाच्या
सेवावे सात्विक अन्नपाणी
वाईट गोष्टी त्यजता शरीरास
येणार नाही आणीबाणी 

बनेल सृदृढ सशक्त भारत
 शिकवण दिली पूर्वजांनी 
संभाळून जतन करावी
हीच धुरा पुढच्या युगानी

वैशाली वर्तक
















मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

गंध तुझ्या प्रीतीचा


नक्षत्र वेल समूह 

गंध  तुझ्या प्रीतीचा 

सहज सख्या सांजवेळी
उजळल्या त्या आठवणी
दिन आले  ते नजरेस 
प्रीत गंधित झाली मनी

भेट आपुली  ती पहिली
मन थोडे बावरलेले
पाहूनी चलबिचल मनाची
तूची हात देऊन सावरलेले

दिधले अनामिक सुख 
अश्वासक प्रेमळ स्पर्शाने
करी धुंद अजूनी जीवास 
मन मोहरते  हर्षाने


गंध तुझ्या  प्रीतीचा
दरवळे  सदा अंतरी
रोज वसंत फुललेला
अनुराग सदाची उरी.


वैशाली वर्तक

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...