शनिवार, १३ जुलै, २०१९

विठ्ठल माऊली चाराक्षरी

विठ्ठल माऊली

आली आली
वारी व्दारी
आनंदली
ती पंढरी

काढा दृष्ट
माऊलीची
घाई झाली
दर्शनाची

भक्त गण
तृप्त भावे
पाही तुज
एक ठावे

लागे मज
एक आस
दर्शनाला
आले खास


पाहून ते
रुप तुझे
आनंदिले
मन माझे

आले तव
मी शरण
दाखवावे
तू चरण
 
वैशाली वर्तक

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

दिंडी माऊलीची अभंग

स्पर्धेसाठी
दिंडी माऊलीची

विठ्ठल  सावळा ।
उभा विटेवरी    ।
चंद्रभागे तीरी    ।
पांडुरंग    ॥
गोजीरे  ते रुप ।
बघते मी डोळा  ।
येतसे  उमाळा ।
अंतरात  ॥
राहो सदा मुखी  ।
विठ्ठल ची नाम  ।
हेची कर्म काम  ।
सदाकाळ ॥
उठता बसता  ।
स्मरते तुजला  ।
तारण्या मजला  ।
तुच देवा ॥
कसे वर्णू गुण 
माझी अल्पमती 
तव नाम चित्ती  ।
ठेवीतसे॥
सावळ्या विठ्ठला  ।
दाटे मनी  खंत  ।
पाहू नको अंत  ।
विनवीते ॥
दिंडीत भासतो ।
मी तू चा अभाव ।
समतेचा भाव ।
चोहीकडे । ।
हेची दान दे गा ।
आले मी शरण  ।
दाखवा चरण ।
मजलागी. ॥
मनी एक आस  ।
दिंडीत जाण्याची ।
दर्शन घेण्याची।
वैशालीची॥

                                        वैशाली वर्तक

बुधवार, १० जुलै, २०१९

चाराक्षरी विषय दुःख

दुःख

दोन बाजू
कधी सुख
तर दुजे
असे दुःख

नसे सदा
निशा नित्य
चाले चक्र
हेच सत्य

नका दावू
दुःख कदा
मोद मात्र
वाटा सदा

नसे कोणी
या जगती
दुःख नसे
त्या संगती

म्हणूनच
वदे संत
करु नका
कधी खंत

जाता दुःख
येई सुख
हा नियम
बोले मुख

वैशाली वर्तक

मंगळवार, ९ जुलै, २०१९

चित्र कविता अष्टाक्षरीसहाक्षरी !बळीची विनवणी! पाऊस व मी!नभ उतरून आलं !अवकळी

1   स्पर्धे साठी - चित्र  काव्य  अष्टाक्षरी

पावसाच्या येता धारा
आवेगाने साचे पाणी
कशा जातील घराला
प्रश्न  पडे आणिबाणी

नाही भरवसा याचा
येत नाही वेळेवर
बरसतो अवखळ
जलाशय रस्त्यावर

शाळकरी मुली सा-या
पाठी लावूनी दप्तर
घाई घाईनी चालती
घरी जाण्यास तत्पर

रस्ता न दिसे पाण्याने
पाय टाकती जपूनी
ओळखूनी खळग्यांना
हात हातात धरुनी

होऊ आपण  साक्षर
सोडवुया प्रश्न यक्ष
येवो कितीही संकट
अभ्यासात  राहू  दक्ष

मग कसली काळजी
पावसाच्या येता धारा
असे विचार जयांचे
निर्धाराने जाती घरा

वैशाली वर्तक.




अ भा म सा प धुळे जिल्हा
।चित्र  काव्य

2. *बळीची विनवणी*

उन्हाच्या झळांनी
धरा भेगाळली
कधी बरसेल
अती आसुसली

बळी पाही वाट
मेघांना पाहूनी
क्षीण  नजरेने
विनंती करूनी

करूनिया कष्ट
मातीला कसीन
नांगरुन माय
घाम मी गाळीन

  जल बरसावे
अंकुरे फुटावी
कोंब डोकवेल 
 आनंदे भरावी 

मिळेल तो चारा
येई अंगी बळ
दारी धान्य रास
मिळे कष्ट  फळ

पड रे पावसा
मागतो मागणे
नको होऊ ऐसा
ऐक   ते सांगणे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

Ka कवियोंका आध्यात्म आणि मराठी प्रेरणा, काव्य समूह 
आयोजित  सातवी भव्य राज्यास्तरीय काव्य  स्पर्धा
*स्पर्धेसाठी*
3    विषय - पाऊस  आणि मी

         शीर्षक- *कल्पना पूर्ती*

आतुरलेली तप्त अवनी
येता पावसाच्या सरी
तृप्त होऊनी प्याली  जल 
 मृदगंध दरवळे क्षणभरी

आला आला पाऊस आला
अथांग चोहीकडे पाणी 
वर्षा धारेची वरून बरसात
आला विचार मनी गाऊया प्रीत गाणी

 वाटे मज झेलू थेंब पावसाचे
करुया नौका विहार मजेत
लुटूया आनंद पहिल्या पावसाचा
किती मजेचे क्षण आलेत


मनात येता विचार  
बोलविले मी   सख्याला
हसत दिला होकार त्याने
निघालो नौका  विहाराला

 लाल नौका  लाल छत्री 
फुले नावेत फुललेली सुंदर 
दोघे बसलो  एटीत नावेत  
जन बघती दृश्य  मनोहर


आला बघ तो  दिसे पैलतीर
थांबेल आता तो पाऊस
कागदाचीच ती होती नौका
*कल्पनेतील* पूर्ण  झाली हौस

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


अभा म सा प मुंबई प्रदेश कल्याण डोंबिवली महानगर विभाग आयोजित व्हिडीओ  सादरीकरण स्पर्धेसाठी मी वैशाली वर्तक 
अहमदाबाद गुजरात मधून सहभागी  होता आहे 
माझी  स्वरचित कृविता 
4    श्रावण सरी व प्रेम

बरसता श्रावण धारा
साज धरेचा हिरवा
भासे पाचूच पसरला
ऋतू  म्हणती बरवा

पहा  रूपवती धरा
शोभे हरित कंकण
लाल पीत सुमनांचे
केले खड्यांनी गुंफण

कधी पडे रिमझिम
कधी झिम्माड पाऊस
नद्या  वाहती खळबळ 
भिजण्याची संपे  हौस

श्रावणात आदित्याचा
खेळ ऊन पावसाचा
सर क्षणी बरसूनी
पुन्हा  दिवस उन्हाचा

करी भर सौंदर्यात
दिसे इंद्रधनु मागे
दावी अवनी नभीचे
जणू प्रीतीचे धागे

श्रावण धारांनी धरा
हिरवाईने ती नटली
जणू प्रीतीच्या पावसात
नव वधू सजली धजली
वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
8141427430







अ भा ठाणे जिल्हा समूह1

आयोजित 
उपक्रमासाठी

5.    *नभ उतरू आलं....

कृष्ण  मेघांची दाटली गर्दी 
थंड वारा  भावे जीवाला
पक्षी उडती इकडे तिकडे
हाश वाटे पाऊस आला

 मेघ  आकाशी घावती 
गडगड करीती नभात
 झाली घाई  बरसण्याची 
जना वाटे आनंद मनात


दाटलेले मेघ पाहूनी
वाटे *नभ ऊतरु आलं*
तप्त वातावरण शमल
क्षणात आसमंत थंड झाल


उतरु आल्या नभातून
तप्त धरेला शांत करण्या
पडतील  अमृत जल धारा
अधीर वसुधेला  भेटण्या.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद :

कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम क्रमांक ५०६
6    विषय ...अवकाळी पाऊस 

देश आहे कृषी प्रधान
राबतो बळी जरी अपार
धान्य पिकणे अवलंबून
वरूणाच्या कृपेवर फार


कसा आला अचानक
अवेळीचा  हा पाऊस
 वेळ नाही बरसण्याची
आता नाही कोणा हौस

नको तेव्हा बरसतो
जीवाची होते धावपळ
 कसे करावे आता 
लोकांचे नुरे बळ

पीक डौलते शिवारी
बळी मना आनंद वाटे
पण असा पाऊस येता
खंत मनी त्याच्या दाटे

बस कर आता पावसा
नको दावू अवेळी  रूप
अवकाळी पावसा. आता
वाजव आता इथले सूप

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


कल्याण डोंबिवली महानगर 2
उपक्रम 341
7    विषय - मृगधारा

झाल्या बरसून मृगधारा
अवनी तृप्त जाहली
पिऊन पाणी मृगाचे
काळी माय अंकुरली

झाला तयार बळीराजा
करण्या शिवारी पेरणी
पाही स्वप्ने  उद्याची मनात
येईल  आता सुख जीवनी

 ठेव अशीच कृपा वरुणा
 भरु दे शिवार मोत्यांनी
मिळेल  चारा गुरांना
घरधणी हसेल सुखानी

मृग जलधारांनी नटलीय
पहा नववधु सम धरा
नेसलीय नवा शालू हिरवा
पहा तिचा थाट न् नखरा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


अ भा म सा परिषद शब्दभाव
आयोजित
काव्यलेखन
विषय..बरसला घननिळा
शीर्षक...ऋतू हिरवा*

झाली मृगाची बरसात
तप्त  अवनी तृप्त जाहली
दरवळला मृद्गंध आसमंती
वृक्ष  लता फोफावली

गरजत बरसत या मेघांनो
नको नुसती गर्दी गगनात
गडगड करित बरसा रे
पेरणीची झाली वेळ शिवारात

वाहतील झरे खळखळ
भासतील शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस ते निसर्गाचे
गीत गाईल थंड मंद वारा

 बळीराजा खुश होईल
 काम करेल  शिवारी
 स्वप्न रंगवेल मनी
 गोड लागेल भाकरी

वाहता जल कडे कपारीतून
होईल रंग धरेचा हिरवा
रानमाळ डोंगर सजतील
करु साजरा ऋतू बरवा

बरसला घन निळा 
 वाटे समाधान मना
दूर केली मरगळ सृष्टीची
सृजनता दिसे क्षणा


वैशाली वर्तक 
अहमदाबाद






*स्पर्धेसाठी*
सावली प्रकाशन समूह आयोजित 
राज्य स्तरीय  पावसाळी अष्टाक्षरी  काव्य लेखन  स्पर्धा
विषय - आतुरता पावसाची
 शीर्षक-  *वाट मृग पाण्याची*

भेगाळल्या वसुधेची
*आतुरता पावसाची*
झळा उन्हाच्या साहूनी
 वाट पहाते मृगाची                1

पाही वाट बळीराजा    
काळ्या मेघांना पाहूनी
 दिसे डोळ्यात प्रतिक्षा
वरुणाला विनवूनी               2

कष्ट करुनी उन्हात
काळ्या मातीला कसीन
नांगरुन काळी माय
घाम तयात गाळीन             3

पाणी पडावे मृगाचे
बीज अंकुरे फुटावी
कोंब डोकवेल वर
मने आनंदे भरावी            4

दिसो दारी धान्य रास
 मोल  मिळावे श्रमाचे
*आतुरता पावसाची*
 दिन येवो आनंदाचे              5


करितोय विनवणी
मान द्यावा प्रतिक्षेला
बरसून शिवारात
पूरी करा मनीच्छेला                6

.....वैशाली वर्तक 

जा रे जाआता पावसा

किती  रे बरसणार
परतीची झाली वेळ
बस कर तुझे पडणे
बंद कर बेभवशाचा खेळ

 
बळीराजा  होईल नाखुष
अती वर्षावाने आता
मेहनत जाईल वाया
नको करू कष्टी जाता
  
 सुरू झाले नवरात्र 
खेळायचा गरबा रास 
तुझ्या  पडण्याने पहा
मजा येत नाही खास

वेळवर न येता सदा
पळवितो तोंडचे पाणी
आता जायची वेळ झाली
तुझ्या  जाण्यासाठी गातो गाणी

जा रे जा  पावसा  आता
आवर  मेघांचा पसारा
पुढल्या वर्षी भेटू  तेव्हा 
दाखव तुझा रंग न्यारा












बालविश्व साहित्य  मंच
आयोजित 
बाल काव्य लेखन 
विषय -  जा रे जा पावसा

        
किती  रे बरसणार पावसा
परतीची झाली ना वेळ
बस कर तुझे पडणे
बंद कर बेभवशाचा खेळ.

बळीराजा  होईल नाखुष
अती वर्षावाने आता
मेहनत जाईल वाया
नको करू कष्टी जाता जाता
  
सुरू झाले नवरात्र 
खेळायचाय गरबा रास 
तुझ्या  पडण्याने पहा
मजा येत नाही खास

वेळवर न येता सदा
पळवितो तोंडचे पाणी
आता जायची वेळ झाली
 जाण्यासाठी गाऊ का गाणी ?

जा रे जा  पावसा  आता
आवर  मेघांचा पसारा
पुढल्या वर्षी भेटू  तेव्हा 
दाखव तुझा रंग न्यारा

झालय सर्वत्र  हिरवे गार
नको अती तुझा वर्षाव
रोग राई पसरण्या आधी
बस्तान  गुंडाळण्याचा कर प्रस्ताव


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बरसा  आता मृग सरींनो
 लाभेल तृप्तता मनाला 
दरवळेल मृद्गंध आसमंती.       
तरालेल  सृष्टी क्षणाला.       

गरजत बरसत या मेघांनो
नको नुसती गर्दी गगनात
गडगड करित बरसा रे
पेरणी वेळ होता शिवारात

वाहतील झरे खळखळ
भासतील शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस रूप निसर्गाचे
गीत गाईल थंड मंद वारा

 बळीराजा खुश होईल
 काम करेल  शिवारी
 स्वप्न रंगवेल मनी
वरुणा ,तूच  त्याचा कैवारी
 

 कृपा सदैव राहता तुझी
होईल रंग धरेचा हिरवा
रानमाळ डोंगर सजतील
करु साजरा, ऋतू बरवा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

चित्र चारोळी

स्पर्धेसाठी - चित्र  चारोळी
कोण म्हणतोय  तो मला टकलू
पहा तर माझे आरशातील रुप
झाडु धरिता पाठीशी माझ्या
   प्रतिबिंबाने  क्षणिक  आला हुरुप
वैशाली वर्तक

सोमवार, ८ जुलै, २०१९

वारी पंढरीची (सुधाकरी)

वारी पंढरीची

चला विठूकडे  ।
दर्शन घेण्यास  ।
जाऊया वारीस  ।
 पंढरीला      । ।

वारीत जाण्याची  ।
मजाच आगळी  ।
जगात वेगळी ।
सर्वाहूनी   । ।

रमतो भजनी  ।
वारकरी  मेळा  ।
दाटतो उमाळा  ।
 अंतरात   । ।

विठ्ठल  सावळा  ।
ऊभा विटेवरी  ।
कर कटावरी  ।
सदाकाळ  । ।

ज्ञानोबा तुकाचा  ।
होतसे गजर  ।
दुःखाचा विसर ।
पडतसे  । ।

गोजीरे ते रुप  ।
भावे अंतरात  ।
दिसे मंदिरात ।
मनोहर । ।

विठ्ठल  नामाचा  ।
करिती गजर  ।
वारीत हजर  ।
आनंदाने । ।

 वारीत दिसतो ।
"मी " " तू "चा अभाव ।
समतेचा  भाव ।
चोहीकडे  । ।

मनी एक आस  ।
दर्शन घेण्याची ।
वारीत जाण्याची  ।
पुरवावी । ।



वैशाली वर्तक







लालित्य  नक्षत्रवेल
आयोजित 
अभंग लेखन
             *माझा विठुराया*

चला विठूकडे  । दर्शन घेण्यास  ।
जाऊया वारीस  । पंढरीला      । ।  १

वारीत जाण्याची  ।मजाच आगळी  ।
जगात वेगळी ।    सर्वाहूनी   । ।    २

रमतो भजनी  । वारकरी  मेळा  ।
दाटतो उमाळा  ।  अंतरात   । ।   ३

विठ्ठल  सावळा  ।ऊभा विटेवरी  ।
कर कटावरी  ।   सदाकाळ  । ।   ४

ज्ञानोबा तुकाचा  ।होतसे गजर  ।
दुःखाचा विसर । पडतसे  । ।   ५

गोजीरे ते रुप  ।भावे अंतरात  ।
दिसे मंदिरात ।  मनोहर । ।   ६

विठ्ठल  नामाचा  ।करिती गजर  ।
वारीत हजर  । आनंदाने । ।   ७

 वारीत दिसतो । सर्व  समभाव ।
  भक्त घेई धाव ।  पंढरीशी  । ।   ८

मनी एक आस  । दर्शन घेण्याची ।
वारीत जाण्याची  । पुरवावी । ।   ९

वैशाली वर्तक
अहमदाबाद



आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

मृग नक्षत्र सरत येता
वर्षा धारा अवनी बरसती
गर्दी दाटे कृष्ण मेघांची
ऋतू हिरवा जन म्हणती

काळ्या ढगांनी भरलेअंबर
उडे पाचोळा  दाही दिशात
वारा वाहे सोसायट्याने
गर्जते दामिनी अंबरात

नाचती हर्षे मुले अंगणी
टप टप धारा बरसती अवनी
अवनी मोर दावी  नृत्य मनोहर
झेलती पक्षी थेंब, पंख पसरुनी

पडता धारा अवनी भिजली
तृप्त झाली पाणी पिऊनी
टप टप पागोळ्या पडती दारी
गंध मातीचा दरवळे दिशातूनी

जो तो जाई क्षणात भारावूनी
वर्षा ऋतुची मजाच वेगळी
वृक्ष लता वेली गेल्या तरारूनी
कांदे भज्यांची  चवच आगळी.

पाऊस  सदा राहे स्मरणात
जून्या आठवणींना आणितो पूर
घडले  असूनी जरी गतकाळात
आठवांनी भरुन  येतो  ऊर

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...