शनिवार, ३ एप्रिल, २०२१

गजरा

गजरा


फुले धाग्यात ओवता
होतो  सुगंधी सुंदर
मन मोहक गजरा
दिसे पहा मनोहर

जातो सहजच हात
माळण्यास कुंतलात
फुले देतात आनंद
भर भरुन जीवनात

असे गजरा मोहक
वाढवीतो सौंदर्याला
आकर्षक दिसे रूप
उपयोगी  शृंगाराला

नारी नेमाने माळीती
येता जाता प्रसंगात
मानी सौभाग्याचे वाण
देण्या हळदी कुंकुवात

मोग-याचा सुगंधित
हवा सदैव गजरा
मन राहते प्रसन्न 
पहा वळती नजरा

एक गजरा देवा-ही
सुगंधित आसमंत
वाटे बसावे पहात
रूप देवाचे मूर्तीमंत

वैशाली वर्तक

अष्टाक्षरी प्रेमरंगी रंगताना (रंग प्रेमाचे)


उपक्रम 135
शब्दसेतू साहित्य  मंच
विषय -- प्रेमरंगी रंगताना
अष्टाक्षरी रचना
शीर्षक-- *रंग प्रेमाचे*

प्रेम उत्कट भावना
कसे करु गुणगान
सुखदायी असे भाव
मिळे मना समाधान

आई लेकराचे प्रेम
भावा बहिणीची माया
वडिलांची सर्वांवर
कर्तृत्वाची प्रेम छाया

मित्रत्वाचे  प्रेम रंग
जैसा कृष्ण सुदाम्याचे
सख्या सोबतीचे प्रेम
आपुलकी विश्वासाचे

देश भक्तांनी अर्पिले
प्राण पणाला लावूनी
देश प्रेम भाव होता
मनी भरला ठासूनी

निसर्गाचे धरेवर 
प्रेम वसे सदाकाळ
दावी तो बहु रंगात
घडे आशेची सकाळ

प्रेम दिसे देवाचेही
त्याच्या भक्तांवर असे 
गाथा तारुनिया दिल्या
भक्तीरंगी प्रेम दिसे

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
३/४/२०२१

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

आता बस झाले

अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित  षडाक्षरी काव्य लेखन
स्पर्धा  
क्रमांक 6
विषय -- *आता बस झाले*


*नको गुणगान*

नको  एक दिन  
कौतुकाचे गान
रोज लिहा बोला
वाढवण्या शान

माय-बोलीनेच
जपली संस्कृती 
ठेवा  तिची जाण
वाढवुया किर्ती


तिच्या अस्तित्वाची
ठेवा भ्रांत मनी
 *आता बस झाले*
विचारु या क्षणी

 ती समृद्धतेत
आहेचिया खाण
साहित्यात  नसे 
कुठलीच वाण

तिच्या बळावर
मिळविता मान
जगतात करु
तिचाच सन्मान

सुवर्णाचा दिन
रोजची  आणुया
*बस झाले आता*
शिखरी नेऊया


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २८ मार्च, २०२१

चित्र काव्य मानवाचा लोभ

सप्ताहिक रविवारीय  साहित्य 
लेखन स्पर्धा क्रमांक 38
साहित्य  प्रकार -- चित्र  काव्य    
      *मानवाचा लोभ*
मानवाचा लोभ
झळा ऊन्हाच्या साहूनी
धरा दिसते भकास 
दिसे   कोठेच न हिरवे
मन होतसे उदास 

 -हास करतो वनांचा
झाडे तोडून   कापून
प्राणी मात्र कोठे जाणार
पक्षी गण गेले त्रासून

नाही राहिला निवारा
वृक्षांची ती छत्र छाया
कुठे मिळणार तयांना
सावलीची प्रेमळ माया

पर्ण घेऊनी चोचीत
कष्टी पक्षीण दीनवाणी
देते सावली पिलांना 
वाहे डोळ्यातून पाणी.

स्वतःच आरंभिलास घात
तोडून सृष्टीचा प्रेम पाश
 उपयोग  काय आता
केला सृष्टी चा सर्व नाश

प्रगतीच्या गोड नावे
मानवाचा अती लोभ
ओढाविला निसर्ग  कोप
थांबव  मानवा हा क्षोभ


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
28/3/21

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...