रविवार, २३ जून, २०१९

कचरा

कचरा 23/6/2019
सकाळ पासून दिवस भरात
तयार होत असतो , तो कचरा
वस्तूंचे जे निरुपयोगी रुप
करावा तयाचा नित्य निचरा

कशाला करिता उगाच गवगवा
सतत कचरा कचरा वदूनी
असता उभी कोप-यात केरसूणी
करेल क्षणात तयासी, दूर सारूनी

झाडूनी काढिता स्वच्छ सदन
म्हणती वसे, लक्ष्मी सदाकाळ
नसता कचरा ,लाभे निरोगी जीवन
दिसे न व्याधीची बाधा , कदाकाळ

हा तर झाला भौतिक कचरा
खरा कचरा वसे, मना मनात
तयास, दूर सारण्यास मात्र
सद् विचार येती , कामास क्षणात

करा दूर मनातील षडरिपूंना
मोह माया मद मत्सर न् लोभ
तोचि असे वैचारिक कचरा
थांबवावा तयांचा आधी क्षोभ

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...