गुरुवार, ४ जून, २०२०

मानव झाला दानव

चित्र काव्य


***मानव झाला दानव**

असा कसा तू रे मानव
माणुसकी ला कसा विसरला
काय दोष त्या मुक जीवाचा
का त्याचा प्राण घातक ठरला

किती आनंदाने केले सेवन
झाला तयास मनोमनी संतोष
पण मग जळता मुख
सैरावेरा धावे होऊन बेहोष

नाही केला आक्रोश तयाने
लाही लाही झाली सर्वांगाची
दिसता पाणी भरले मुखात
धाव घेतली जलाशयाची


जीव वाचविण्या बाळाचा
शेवटी मातृत्व जपण्यास
पण मानव ठरला दानव
मुक जनावराचा जीव घेण्यास

मानवाने सोडला धर्म माणुसकीचा
काय मिळाले तयास मारुन
का खेळ खेळलास जनावराशी
मुक प्राण्याचा जीव घेऊन


वैशाली वर्तक

सोमवार, १ जून, २०२०

नव्या युगाच्या उंबरठ्यावर

नव्या युगाच्या उंबरठ्यावर


नव्या युगाच्या उंबरठ्यावर
टाकुया दृढ निश्चयाचे पाऊल
पळून जातील सारी संकटे
सर्वत्र भासेल यशाची चाहुल

जरी कितीही अंधारल्या रात्री
ग्रासती आहेत सा-या जगताला
 नक्कीच मार्ग मिळेल यातूनी
हिंमतीने पार करु संकटाला

मानवता हाची खरा धर्म
घासातील घास करुनी अर्पण
जाणूनी जीवनाचे खरे मर्म
नव्या युगात करु पदार्पण

विज्ञानाची धरूनीया कास
 नावे प्रगतीच्या नको निसर्ग -हास
लक्षात घेऊ पर्यावरण विकास
मनी राखूया सदा उत्कर्षाचा ध्यास


उत्तम संस्कार देऊनी बाळांना
पावले उचलण्या स्व-हिंमतीवर
उद्याचे पहातील उज्वल भाग्य
नव्या युगाच्या उंबरठ्यावर

वैशाली वर्तक

गणित जीवनाचे


स्पर्धे साठी

गणित जीवनाचे

गणित विषय म्हटला की
उठतो पोटात  भयाचा गोळा
मग "गणित जीवनाचे "म्हणत
का  करिता आयुष्याचा चोळा- मोळा.

जीवन गाणे , हसत खेळत रमणे
अशा नावाने संबोधा की तयाला
मग, कसे आनंदी होईल आयुष्य
सदा मिळेल विरंगुळा मनाला.

आशा आकांक्षाची नकोच बेरीज
वाढविते उगाचच  दुःखाची घागर
शोधा सुख  समाधानी राहून
जीवनी अंती मिळे सुखाचा  सागर


ठेविले अनंते तसेची  रहावे
न  रचिता पर्वत मनोरथांचे
कर्मात सदा देवाला पहाता
सहज उकलेल गणित जीवनाचे

वैशाली वर्तक.
अहमदाबाद (गुजरात  स्टेट)

खुराडे

खुराडे

सुरुवातीला नाही वाटले वावगे
रहा घरात म्हणण्याचे
पण जसे दिन गेले वाढत
कठीण झाले की जगण्याचे

नाही घरातून निघणे
सदा बसणेची घरात
खिडकीतून बाहेर पाहता
वर्दळ गर्दी नाही रस्त्यात

कसे रहात असतील
गर्दी गर्दीत एका खुराड्यात
नाही जागा मोकळ्याने   श्वासघेण्यास
तसेच काहीसे झाले घरा घरात

काय वेळ आणलीस रे देवा
सारेची बंद खुराड्यात
जसे कोंबड्यांना ठेवतात
एका बंदिस्त खोपट्यात

कधी संपेल हा कोरोना
पूर्ण दिवस घरात बसून
रहायचे घरकाम करत
जीव गेला आता ऊबून


 गेली नजर पाळलेल्या पोपटा कडे
  भासले मीच आहे पिंज-यात
पाहे तो केविलवाण्या नजरेने
पाडले मला विचारात

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...