रविवार, ५ जुलै, २०२६

पाटाचे पाणी

काव्य स्पंदन राज्यस्तरीय 2
आयोजित झटपट काव्य लेखन स्पर्धा 2

विषय   पाटाचे पाणी
शीर्षक  शिवारी स्थान निवांताचे


देश आपला कृषी प्रधान 
करावी लागते सोय  जलाची
कृषिवलाच्या जीवनात गरज
सदैव पाटाच्या पाण्याची .

शिवारातून वहात असते 
झुळूझुळू पाटाचे पाणी
त्याचा आवाज भासे
जणु गोड मंजुळ गाणी 


  वहात्या  पाण्याचा बांध 
जणु ठिकाण निवांताचे
घास भरवी  प्रेमभावे
घरच्या भाकर तुकड्याचे

 पाटावर विसावला बळी 
तृप्त मने खाता भाकर
होई मनी समाधानी 
 नाही आपण कुणाचे चाकर
 
 थंड मंद वाहे पाणी
 पक्षी पण घेती आनंद 
सकाळी  पाण्यासाठी येता
खेळ त्याचा पहाण्याचा लागे छंद.

पाटाच्या पाण्यावर पहा
किती मन रमते
पाणी देते मना ऊर्जा 
 वहाते  पाणी पहाणे गमते


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

आशेचा किरण

सिद्ध साहित्य‌‌‌क समूह आयोजित  उपक्रम  विषय ..आशेचा किरण   कधी मनी नकोची  खंत संभ्रम मनात अपयशाचा असावे सदैव आशावादी   किरण आशेचा दावी पथ यश...