स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित दशाक्षरी काव्य स्पर्धा
चित्राधारित दशाक्षरी काव्य
मदतीचे बोट
धरुनिया मातेचेच बोट
टाकियले पहिले पाऊल
सुखमय जीवनाची सदा
लावण्यास जीवास चाहुल
करण्या जगी ज्ञान संपन्न
जगी गुरुजींचे बोट हवे
शिल्पकार धडवितो शिल्प
तैसे ज्ञान देण्या नव नवे
बोट हवेच मायबापांचे
संसारात ते मार्गदर्शक
कसा हवा संसार नेटका
तेची असतात प्रबोधक
जन्मतो वाढतो समाजात
तयाचेही जाणावे महत्त्व
लागतो देणे ऋण तयाचे
त्याचेही जीवनात श्रेष्ठत्व
कर्ता करविता असे तोची
जगाचा असे तोची पालक
विनवणी ती बोट धरण्या
करीतात विश्वाची बालक
वैशाली वर्तक
अहमदाबाद