बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

चटणी

कल्याण डोंबिवली महानगर २
आयोजित उपक्रम
विषय..चटणी
  चवीष्ट


घेता नाव चटणीचे
येते चव जेवणात 
नाना रुप दावतसे
वाढे लज्जत खाद्यात

चटणीचे भोजनात
महत्वाचे असे स्थान
डाव्या बाजूला ताटाच्या
मिळतसे  सदा मान

नाना प्रकार तियेचे
स्वाद वाढविते  सदा
तिच्या शिवाय जेवण
मजा नसतेच कदा

प्रिय असेची सर्वांना
कांदा भाकरी चटणी भाकरी
कष्टकरी लोकं तर
त्या वरच पोटभरी

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

क्षण निसटले काळ चालला पुढे

स्वराज्य लेखणी मंच
आयोजित
सहाक्षरी काव्यलेखन
विषय ..  क्षण निसटले
  *काळ चलला पुढे*

सारखा चालला
पुढे पुढे काळ. 
 नसेल पुनश्च 
 आजची सकाळ

आजचा दिवस 
उपभोगा क्षणी
गेलेल्या क्षणाचे
दुःख नको मनी.


क्षण निसटती
 रंक  असो राजा 
येत नाही पुन्हा
नको गाजावाजा          

जीवनाचा मोद
वेळीच लुटूया
असलेला क्षण
आनंदी करूया

क्षण निसटता
आनंदाची वेळ
न जाणो पुनश्च
जमेल का मेळ

वाळू निसटते
जशी हातातून
काळही सरतो
क्षणा क्षणातून


काल आज उद्या
टप्पे जीवनाचे
पुन्हा परतून
न कधी येण्याचे

आजचा दिवस  
असे सोनियाचा
 कालचा उद्याचा
नको विचारांचा 






वैशाली वर्तक
अहमदाबाद




रविवार, १८ डिसेंबर, २०२२

रोही पंचाक्षरी भास मनाचा


यारिया साहित्य  कला
रोही पंचाक्षरी
स्पर्धेसाठी
*भास मनाचा**

 शीर्षक-  *भास*
काय करावे
मन गुंतावे
या भासाने ते
किती छळावे

दिसे स्वप्नात
वसे मनात
पहावे  तर
नसे सत्यात

सदा चिंतन
मनी मंथन
कसे शमेल
अस्थिर मन

वेड जीवाला
छळे मनाला
काय करावे
अशा वेडाला

सोड हा ध्यास
न उरे भास
उगा विचार 
नको मनास

उभे ठाकले
डोळा देखले
भास मनाचा
आता नुरले

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...