शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

माझे मन तुझे झाले

उपक्रम
अष्टाक्षरी
विषय - "माझे मन तुझे झाले"

झाली नजरा नजर
थेट भरली मनात
सावरली बट तिने
अदा भावली क्षणात

वेड लागले जीवास
नित्य तुजला पहाणे
होता तू नजरे आड
शोधी भेटण्या बहाणे

काय योग माझा पहा
भेट झाली अवचित
निरुत्तर तूही उभी
 पाही मज प्रश्नांकित

मुक संवाद साधिला
कटाक्षाने तो क्षणिक
माझे मलाच कळेना
कसा झालो भावनिक

होता देवाण घेवाण
अमुच्यात शब्द चार
माझे मन तुझे झाले
करि भेटीचा विचार

भेट सहज घडली
पण स्मरते ती मनीं
मन माझे तुझे झाले
मज कळले त्याक्षणी.

 




 


गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

अबोल प्रीत

सहाक्षरी पुरुष

स्पर्धेसाठी---
सहाक्षरी
विषय - पुरूष

संस्कृती  आपली
पुरुष प्रधान
सर्वत्र  ठिकाणी
पुरुषांना मान

कुटुंबाचा असे
 खरोखरी कणा
येताची संकटे
तो साहे वेदना

कुटुंबाचा कर्ता
घराचा आधार
प्रत्येक  जणांचा
साहे तोचि भार

सर्वत्र  पुजते
 जरी  जगीं नारी
कर्तृत्वात असे
सदा तोच भारी

संसाराचा रथ
धावे भर धाव
कष्ट किती साहे
त्याचे त्याला ठाव

संसार रथाचा
बनून सारथी
सुखी कुटुंबाचा
तोचि महारथी

कष्ट तोचि करे
मातेला पुजती
दिसे ना कोणास
त्याची ती महती

वैशाली वर्तक 20/11/2019

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

स्मृतिगंध चाराक्षरी

उपक्रम
स्मृती गंध

बसले मी
निवांतात
मन रमे
विचारात

आयुष्याचा
गत काळ
आता वाटे
तो सुकाळ

रम्य होते
बालपण
येता त्याची
आठवण

रोज मित्र
जमायचे
नित्य सारे
खेळायाचे

नको वाटे
शाळा तेव्हा
अभ्यासाची
भिती जेव्हा

विद्या  केली
संपादन
नोकरीचे
मोठेपण

केली मौज
कधी दुःख
मुले देती
आता सुख

अशी असे
आठवण
त्या काळाचे
ते स्मरण

वैशाली वर्तक 12/11/2019

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...