माझा साहित्य प्रवास
तशी मी तरणपटु व सर्वीसच्या दृष्टीने पहाता बँकर ..पण सर्वीसमधे असताना. कधी कधी भगीनी समाजात जेव्हा स्पर्धा असत तेव्हा स्पर्धेसाठी जायचे स्पर्धेत भाग घ्यायची खुमखुमी आली.
म्हणी लेखन स्पर्धा.. एकदा निबंध स्पर्धा सहजीवन विषयावर. तर अजून काही विषय लिहीता व बक्षीस मिळता गोडी वाढली. मग चिठ्ठी उचलून वक्तृत्व करणे, असे करता करता लिखाण हातून घडू लागले. पण तितकेच.
पुढे निवृत्त काळात मोबाईल आले. सकाळी स्वतः च्या घरातील फुलांचे फोटो मैत्रीणी शुभ सकाळ नावाने टाकू लागल्या. तर त्या फुलांना पाहून माझी लेखणी सरसावली. त्या फुलांना समर्पक चारोळी लिखाण माझे सुरू झाले. फुलांना पाहून मला सहजच विचार कल्पना सुचायच्या .खरं त्या चारोळयांत तेव्हा, दुसऱ्या व चौथ्या
ओळी अंती यमक पण नसायचे. पण नंतर मी फेसबुक वर आले.
व रोज उद्या च्या सकाळची चारोळी रात्रीच तयार करून ठेवून , सकाळी उठता "शुभ सकाळ " म्हणून चारोळी टाकू लागले .मग त्यात भर म्हणजे मी ती चारोळी चित्रावर टाकू लागले .
Photo aapp च्या साहाय्याने माझे सचित्र चारोळी लेखन वाचकांना आवडू लागले लाईक वाढले... प्रतिसाद वाढले. आणि मग यमक साधणे. योग्य शब्द वापरणे यात लेखणीस धार येत गेली. यमक सहजच ओठी आपसुकच येऊ लागले.
त्यात सिंगापूरच्या शब्दगंधने दर महिन्याला २\३ विषय देऊन मला लिहीते केले.
त्यांच्या मासिकात पण लेख प्रकाशित होऊ लागले.
त्यात *शब्द अंतरीचे* या समूहावर मला भास्तेने केले .प्रथमच तेथे अष्टाक्षरी
लेखनाचे नियम समजविले. आणि स्पर्धेसाठी रचना पाठविली. आणि काय सांगू !
अरूषी दाते परिक्षक होत्या. मला लक्षवेधी प्रमाणपत्र मिळाले. जीवनातले पहिले साहित्यिक लेखनाचे पारितोषिक.
तसै भगिनी समाजात सहजीवन विषयास मिळाले होते.पण हे *शब्द अंतरीचे* फेस बूक राज्यस्त्तरियचे पहिले प्रमाणपत्र .. मग काव्यांजली, व पुढे तर अभंग दशाक्षरी, सहाक्षरी , गीत लेखन शिकता शिकता लेखणीला धार आली. प्रणाली ताई म्हात्रे यांची चाराक्षरी चे online कार्यक्रमात ,मी नियमित लिहीणारी मला अध्यक्ष म्हणुन मान दिला होता.
पुढे तर *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या* कवी कट्टा वर बडौदा ,यवतमाळ वर्धा ब-याच ठिकाणी संमेलनात काव्य सादरीकरणात हजेरी लावली. मुलांनी माझ्या नकळत अंतर्मन "चारोळी व कविता" संग्रह प्रकाशित केला.
फेस बुक वर ,WhatsApp च्या अनेक समूहावर स्पर्धेत भाग घेत अनेक पारितोषिके मिळवली. मायबोली वर, प्रतिलिपी वर पण लिखाण करते.बेंगलोर कवि कट्ट्यावर पण लेखन केले आहे.
माझ्या स्वरचित गीतांचे कवितांची गाणी utube. वर अनेक आहेत. योगायोग असा की एका मुलाने. स्वरबध्द व त्यानेच पेटीची साथ,तर दुस-या मुलाने तबलासंगत केली तर सूनेने गायली आहेत. अशी १०\१५ गीते utube वर झळकत आहेत.
आता लेखन तर छंद जडलाय. सिंगापूर च्या शब्दगंधात तर गेल्या वर्षी मी कविता लेखनची कार्य शाळा पण घेतली.असो.
तरी अजून मी विद्यार्थीनीच आहे. अजून रोज लेखन व्हावे अशी इच्छा आहे.
पण एक सांगायचे तशा २\५ गझल लिहील्यात पण गझल काही जमत नाही. आणि वृत्त बध्द कविता लिहीण्याचा प्रयत्न करत आहे ते जमेल वाटते .
असो मायबोलीचे प्रेम मला सतत खुणावते.लेखनघडविते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा