गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

चित्र ...मिठाई चारोळी

मिठाई चारोळी

1 माहिम चा हलवा

हलवा तो माहिमचा
दिसे रुपाने गोजीरा
सर्व  मिठाईत शोभे
रुपाने तो साजीरा

2   लाडू
सर्व मिठाईत  गोंडस
भासे लाडवाचे रुप
पहाताच तोंड माझे
बसू देत नाही चूप

3  पेढा
   आनंदाची ऐकताच बातमी
    ध्यानात येतो तो पेढा
     सर्वांच्याच आवडीचा
      खाण्यासाठी जीव होतो वेडा

4     खोब-याची वडी

     साधी सरळ सोपी
     असे खोब-याची वडी
     येता जाता आई बनविते
     नका करु खाण्या पडा पडी

5 सुका मेवा बर्फी

  दिन आले थंडीचे
   शरीरास हवा सुका मेवा
   मिठाई सुक्या मेव्याची
   खावी भरपूर न करता हेवा

वैशाली वर्तक

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

तुझा स्पर्श

शब्द निशुका
 विषय - तुझा स्पर्श
स्पर्धे साठी

पहिलाच तो स्पर्श
असे मातेचा
जिव्हाळा देतो
जीवास  जो मायेचा

तव स्पर्श  देतो ग
मज उभारी
सदा जीवनी
घेण्या उंच भरारी

अजूनही स्मरतो
सख्याचा स्पर्श
केले बेधुंद
मनी जाहला हर्ष

स्पर्शण्या मृग धारा
भुमी   अतृप्त
मेघ वर्षता
होई वसुधा तृप्त

मनी ओढ लाटेला
भेट तीराशी
लाजूनी चूर
स्पर्शता किना-याशी

विठूच्या दर्शनाची
चोख्याची आस
चरण स्पर्श
करण्या मनी ध्यास

वैशाली वर्तक

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

चाराक्षरी

उपक्रम
सहा ऋतु

वसंत हा
ऋतू  राजा
आनंदित
होई प्रजा

ग्रीष्म देई
त्रास सदा
नको वाटे
येणे कदा

वर्षा येता
अंकुरली
धरा पहा
नटलेली

शरदाच्या
चांदण्यात
मजा येते
फिरण्यात

हेमंत हा
ऋतू  खास
आवडतो
हमखास

शिशीरात
पानगळ
वृक्षानाही
मरगळ

सृष्टी  दावी
अनुरुप
ऋतूतून
तिचे रुप

वैशाली वर्तक


सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...