तुझी माझी मैत्री
ध्यानी मनी नाही
नजरेत आली
तुझी माझी मैत्री
कधी कशी झाली 1
प्रथम दर्शनी
पहिलीच भेट
भावली मनात
हृदयात थेट 2
सावरणे बट
आवडली अदा
पाहून अदेला
झालो मीच फिदा 3
मधुर बोलणे
दावणे विनय
लागली मनाला
नित्याची सवय 4
तुझी माझी मैत्री
ती जिवाभावाची
भेटण्या शिवाय
दिन न जाण्याची 5
आहोत आपण
खरे मित्र छान
सदाची जीवनी
ठेवू मैत्र मान
वैशाली वर्तक
अहमदाबाद