बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

ओढ / ओढ तुझ्या दर्शनाची ... ओळकाव्य मज रहावले नाही




शब्दरजनी साहित्य समूह 

आयोजित  भव्य राज्यस्तरिय  काव्य लेखन  उपक्रम

विषय - ओढ


- ओढ लेखणीची

ओढ

रोज लिखाण करिता

ओढ लागली सदाची

माया सहज जडली

लेखणीची कागदाची


ओढ खुणावी मनाला

काही तरी लिखाणास

सेवा करुया भाषेची

हीच मनी सदा आस


काव्य करितांना रोज

चाले शब्दांचाच खेळ

शब्द शब्द विचाराने

जमविते काव्य मेळ


मना मनातील गुज

सांगावया सोपी रीत

सहजची होते  व्यक्त

यात जडली ही प्रीत


हीच मागणी  शारदे

चित्ती राहो तव मूर्ती

ओढ लागली जीवाला

तूच दे मजला स्फूर्ती .

    ......वैशाली वर्तक  





विषय - ओढ तुझ्या  दर्शनाची

अष्टाक्षरी


         *अधीर मन*


ध्यानी मनी स्मरे तुज

तुझ्या  नामाचे रटण

 राहो तुझे रुप चित्ती 

सदा करिते स्मरण


मुखी घेता तव नाम

विसरते देहभान

तुझ्या  दर्शनाची ओढ

गाते तव गुणगान


तुझ्या नामाचा गजर

चाले सदा   क्षणो क्षणी

  आस तुझ्या दर्शनाची  

 लागे सदा मनोमनी


माते तव दर्शनाला

मन माझे आतुरले 

कधी पाहीन तुजला

मन माझे अधीरले


 तव रूप पाहुनिया  

मन माझे आनंदले

प्रसन्नता लाभे जीवा

हर्षे मन विसावले


 आस लागली अंतरी

आले आता मी शरण

द्यावे माते तू दर्शन

दाखवावे तव चरण

वैशाली वर्तक 

अहमदाबाद



फेरी क्र  .1

  ओळ काव्य -मज राहवले नाही

   शीर्षक - *ओढ*

भेट आपुली  पहिली
 *मज  नाही राहवले*
माझ्या  विचलित मना   
तूची   मज सावरले           1


पहिल्याच भेटीतला
वाटे अश्वासक   स्पर्श 
 दिले अनामिक सुख
देतो मना सदा हर्ष            2

छंद तुला  बघण्याचा
कसे आवरु मनाला
तुझाओझरता स्पर्श 
वेड लावितो जीवाला        3 

गंध तुझ्याच  प्रीतीचा
सदा   रहातो अंतरी 
रोज वसंत फुलेल       
 विश्वासाने ऊर भरी           4

सख्या येता सांजवेळ
उजळती आठवणी
मज नाही रहावले
प्रीत गंध स्मरे  मनी          5                             


LMD 37



तुमच्यासाठी काय पण

काव्य ज्योती साहित्य  मंच
शहापूर जिल्हा ठाणे आयोजित 
राज्यस्तरीय  काव्य लेखन स्पर्धा
विषय - तुमच्या साठी काय पण


आहे हेच  अगदी खरे
*तुमच्या साठी काय पण*
केव्हाही  कधीही  मागावे
मदतीसाठी तयार मन

नारी चे असतेच असे
असते  उभी देण्या सत्वर
सेवा दया प्रेम ममतेसाठी
राहते जीवनभर तत्पर

तसेच असते मैत्रीचे    
काळ वेळ  नाही  पाहत
मैत्र भाव सदा जागृत
तुमच्या साठी सदा हासत

गुरु शिष्य  नात्यातही पहा
असेच दिसे  सदा सर्व काळ
देण्या ज्ञान शिष्याला गुरु वदे
तुमच्यासाठी  सदाची सकाळ

 जवान तर सदैव तयार
  असो दिवाळी वा दसरा
देशासाठी काय पण
जाता सेवेला चेहरा हसरा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...