--चाहूल दिपावलीची
संपताच सण दसरा
दिवाळीची लागे चाहूल
मन रंगे त्या विचारात
पडू लागे तयारीचे पाऊल
घरदारे सारी सजतील
दारी लावुनिया तोरण
येता समीप दिपावली
येते उत्साहाचे स्फुरण
होता स्वच्छता घरांची
सुरु होई फराळाची घाई
लाडू चिवडा चकली करण्या
दंग होतील ताई -माई
खरेदी ला येईल उत
दुकाने सजून तयार
नवी वस्तू आणण्याची
गृहीणींना हौस फार
पोरांची खाण्याची चंगळ
दिवाळीची मजाच आगळी
किल्ले , दीपमाळा, रांगोळ्या
दिपावलीची शानच वेगळी.
काही करिती मनीं विचार
बाहेरच जाउ दिवाळीत
पण खरी मजा तर असे
घरीच साजरी करण्यात
एक गोष्ट नक्कीच करुया
नको फटाक्यांचे प्रदुषण
ध्वनीचे, हवेचे रोकण्या दुषण
लक्षात घेऊया पर्यावरण.
वैशाली वर्तक (अहमदाबाद) 9/10/2019