शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

अशी तू. (लेखणी). ...खुल्लता कळी खुले ना लेखणी रुसली

अशी तू

वाटे जवळची मला 
लेखणी सखी तू अशी
किती  आवडे मला ती
सांगू शब्दात  कशी

भाव  माझ्या मनीचे 
तूच जाणिते क्षणात
झरझर शब्द झरती
जरा येताची मनात

तुज विना पळभर
मज सुचत नाही
नजरे समोर न येता
तुजला शोधत राही

किती काव्यात दिधली 
तूच मजलाच साथ
लेखनात मला वाटे
तूच देतसे मला हाथ

तुझ्या बळावर रहाते
मी निवांत लेखनात
किती तू आवडे मलां
सांगु कुठल्या शब्दात

वैशाली वर्तक 
अहमदाबादकल्याण डोंबिवली महानगर २
आयोजित
काव्यलेखन
विषय .. रुसवा सोड ना

 शीर्षक..खुलता कळी खुलेना*

असे काय ग झाले आज
सांग  मजवरी का रुसली
काही न बोलता कधीची
गुमसुम होऊनी बसली               1

न येती आज विचार  मनी
पाही न वळूनी मजकडे
किती मनवावे तुजला
कसे काही न सुचे  गडे              2

विषय पाहिला बदलूनी
नको पद्य तर गद्य पाहू
तुझे झरणे कर ना सुरु
अशी रुसूनी नको राहू                3

दिन एक  पण नसे शक्य
तुला न धरिले मम करी
उदासीन वाटे    दिनभर
काय करु तू सांग तरी                 4

हाश !  हसली तू खुदकन
जणू चमकली नभी चांदणी
 भावना मनी स्फुरल्या बघ
धावत  आली पहा लेखणी.            5. 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

अभंग श्रावण व्रत/ मज अभय दे

विषय - श्रावण व्रत 

व्रत वैकल्याचा  । महिना श्रावण । 
पवित्र पावन      । सदासाठी  ।।

येता सोमवार    । वाहू बिल्व पत्र । 
महादेव मंत्र    ।   चालतसे   ।। 

श्रावणात येती  ।  सणवार खास । 
मोद हमखास ।  मनातूनी       ।। 

 नाग पंचमीला । नागाचे पूजन। 
ऋणांचे स्मरण । करितात  ।। 

अष्टमीच्या रात्री । देवकी नंदन  । 
आनंदे किर्तन   ।  मंदिरात    ।। 

ऋषी पंचमीला  । करी उपवास । 
बैलासाठी खास   ।  श्रावणात

वैशाली वर्तक 

अहमदाबादभाग्योदय  लेखणीचा मंच
आयोजित 
विषय - मज  अभय दे 

देवीचे पूजन  ।  करण्या  हजर । 
करीत गजर  ।   अंबाईचा   ।। 

सुंदर  ते रूप । घरोघरी दीप
देवीच्या समीप । लावियले  ।। 

 देवी तुझ्यासाठी ।   केलीय तयारी । 
  मनास उभारी  । तूची देशी ।। 


देवीच्या  स्वागता  ।  मोद वाटे फार
सहते ती भार      । जगताचा  ।। 

देवी ठेव कृपा   ।  तुजला सांगणे  । 
नुरते मागणे     ।  तुजलागी  ।। 

मज अभय दे  ।  मजला दे शक्ती । 
करीन मी भक्ती । नित्यनेमे  ।। 

सहवासे तुझ्या  ।  जागतो विश्वास । 
लागलाची  ध्यास  । अंतरंगी  ।। 

वैषशाली वर्तक 
अहमदाबाद

गणपती काव्ये /वंदन तुजला श्गणेशा/ विसर्जन वेळ-३काव्यांजली गजर विध्नेश्वराचा विसर्जन

भाग्योदय  लेखणीचा मंच
आयोजित 
प्रथम फेरी ३१/८/२२
मुक्तछंद काव्य रचना
*स्पर्धेसाठी*
विषय - वंदन तुला गणेशा

        *स्मरते तुजला*

होता सकाळ स्मरते तुजला
तूची असशी सुखकर्ता
असशी तूची संकटहर्ता
किती नावे संबोधू रे तुजला
गजानना रे गणराया.
तव दर्शनाने मिळे सौख्य
भय दुःख  सारे  होतेची दूर
तूची असशी दुःख हराया
वंदन म्हणती मोरया मोरया.
विद्यार्थी जन वंदती तुजला
वंदन करूनी करती प्रार्थना 
तव कृपा दृष्टीची करती याचना
शरण आलो भगवंता.
यावे गणराया विद्या  देण्या
प्रथम पुजेचा तुजलाची मान
देश परदेशी तुझेच गुणगान
चौदा विद्या  तुज अवगत
प्रार्थते तुजला एकदंता.
रणांगणावर तुची धुरंदर
नयन उघड  रे क्षणभर
वंदन करिते मी दिन रात्र
तव नामाचा महिमा  अपार
शब्द नसे मजपाशी 
तव  गुण गाया
तूची गजानना गणराया
वैशाली वर्तक
अहमदाबाद
***************--**********************-**
अभा म सा प समूह 2
आयोजित  उपक्रम ५१३
विषय -  पुढच्या वर्षी लवकर या

        *वेळ विसर्जनाची*

गणपती आले म्हणता म्हणता
आले की हो विसर्जन 
किती आनंदाचे होते क्षण
सरले दिन भरकन

रोज एकत्रित  आरती
वाटे आनंदाचा सोहळा
भजन, मंत्र -जागर  स्तवन
करण्या आप्त जन झाले गोळा


मोदक लाडू पेढ्यांची
होती वेगळीच शान
खाणे, गप्पांना आले
खास आनंदाचे उधाण.

पण आता म्हणता आरती
डोळे पहा पाणावले
लहान मुलांना सावरता
मोठे जनपण रडावले

 बाजुला शेदोरी ठेवीता 
बाप्पा ssबाप्पा मोरया
शब्द  ते  आले ओठी  
*पुढल्या वर्षी लवकर या*


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

लालित्य नक्षत्र वेल आयोजित उपक्रम 
विषय .. निरोप तुला देताना 
     *वेळ विसर्जनाची*

गणपती आले म्हणता म्हणता
आले की हो विसर्जन 
किती आनंदाचे होते क्षण
सरले दिन भरकन

रोज एकत्रित  आरती
वाटे आनंदाचा सोहळा
भजन, मंत्र -जागर  स्तवन
करण्या आप्त जन होती गोळा


मोदक लाडू पेढ्यांची
होती वेगळीच शान
खाणे, गप्पांना आले
खास आनंदाचे उधाण.

पण, आता म्हणता आरती
डोळे पहा पाणावले
लहान मुलांना सावरता
मोठे जन पण रडावले

 बाजुला शेदोरी ठेवीता 
बाप्पा ssबाप्पा मोरया
शब्द  ते  आले ओठी  
*पुढल्या वर्षी लवकर या

*निरोप तुला देताना*
मन  होतंय उदास
उत्साहात सजविलेले मखर
उद्या  भासेल भकास



वैशाली वर्तक 
अहमदाबाद
.***************

.******************************-*****************

अ भा म सा परिषद समूह 2
आयोजित  उपक्रम 
काव्य लेखन 
प्रकार काव्यांजली
विषय - गणपती विसर्जन 

गणेशाचे विसर्जन

 पहाता पहाता
 आला दिन विसर्जनचा
 निरोप घेण्याचा
 गणेशाचा.

 विसर्जनाचा दिन
 जीवा लागे हूरहूर
 दाटले काहूर
 मनोमनी

 संपता आरती
 पाणावली जनांची लोचने ,
 गणेशाचे परतणे
 सहवेना.

 गणपती बाप्पा
 निघाले आपुल्या सदनी
 खेद मनोमनी
 प्रत्येकाच्या

 मोरयाचा गजरात
 भक्ती भाव एकवटून
 सांगती परतून
 यावे

 मृत्तिकाची मूर्ती
 सहज विसर्जली पाण्यात 
 पर्यावरण जपण्यात
 सहजपणे .

तुझ्या  कृपेचा
राहो गणपती देवा
निरंतर ठेवा
असावा

       वैशाली वर्तक
 (अहमदाबाद ) ,

*************************************

माझी  लेखणी भक्तीसागर मंच
विषय - *क्षण विरहाचे सारे*      
विसर्जन 
*आले  आले म्हणताच
झाली वेळ परतीची
नको वाटे त्याचे जाणे
 वेळ ती विसर्जनाची

दहा दिवस मोदात
येणे जाणे स्व जनांचे
किती गप्पागोष्टी खेळ
दिन होते आनंदाचे

सजावट वाटे फिकी
धूप दीप मंदावले
  घर झाले सुने सुने
बाप्पा गृही परतले


 बाप्पा बाप्पा म्हणताना
डोळे पाणावले क्षणी
जड मनाने निघालो
विरहाचे दुःख  मनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




देवा श्रीगणेशा 
 निरोप घेतो म्हणता देवा 
शब्द निघेनात मुखातून  
अंतःकरण  झालेआमचे 
अतिशय जड.
आला तेव्हा होती प्रसन्नता 
मनी होता आनंद उल्हास
पण आज निरोप घेता
जनमुखावरी उदासिनता.
केली भक्ती भावे पूजा अर्चना
झाल्या असतील कळत नकळत
अमुच्या  हातूनी चुका
घे तयांना तव उदरी
आम्ही बालक आहोत अजाण.
ऋणी राहू तव कृपेचे सदा
असूदे आशीर्वाद  शिरी
राहू सारे मिळून मिसळूनी
ध्यानी ठेवू शिकवण सदा उरी
तूची गणांचा अधिपती
ठेवू मनी श्रध्दा विश्वास 
द्यावी आज्ञा आम्हा विसर्जनाची


वैशाली वर्तक







स्वराज्य लेखणी मंच
गणपती महोत्सव महा उपक्रम
क्रमांक 2
काव्य रचना सहाक्षरी 20-9-23
विषय ..देवा तुझी ओढ

या s  हो लवकरी
आतुरता मनी
*देवा तुझी ओढ*
लागे क्षणोक्षणी.    1

रेखीव आरास
करूनी विचार
काही नाविन्याचा
खास  तो प्रकार.  2

ओवाळण्या दारी
काढली रांगोळी
तोरणे लावूनी
दिपकांच्या ओळी.  3

श्रीगणेशा मज
सुख अविरत
तुझ्याच चरणी
मिळते खचित.   4

होता आगमन
घराचे मंदिर
पूजा भक्ती भावे
दर्शना अधीर.      5

घेता तव नाम
दु:ख दूर सारी
तुझ्याच चरणी
जादु असे न्यारी.   6

रूप पाहुनिया
मन होते शांत
तुची सुखकर्ता
नुरतेच भ्रांत.       7

वैशाली वर्तक
अहमदाबाद


मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

बाप्पा माझा मार्गदर्शक/ मनातील बाप्पा /परतले श्री सदनी \बालगीअभंग

गणेश चतुर्थी स्पर्धा 
सावली प्रकाशन समूह आयोजित 
गणेश चतुर्थी निमित्त  राज्य स्तरीय  काव्य लेखन स्पर्धा
*स्पर्धेसाठी*
विषय - बाप्पा माझा मार्गदर्शक
शीर्षक -   *कृपावंत व्हावे बाप्पा*


देवा गणराया गजानना  
व्हावे कृपावंत मजवरी
*बाप्पा माझा मार्गदर्शक*
स्मरते तुजला  निरंतरी

तूची पालक  या विश्वाचा
तुझ्या कृपेने  चाले सृष्टी 
हवी माया तुझी जगतावरी
नको करू कोणास कष्टी

चौदा विद्याही तुज अवगत
बुध्दीमान न्  देवांचा देव 
गणराया तूची ज्ञानदाता
प्रसाद रुपे द्यावी ज्ञानाची  ठेव


कार्यारंभी  प्रथम पुजिते
तुलाच स्मरते   गणराया
यावे घावूनी  कष्ट सारण्या
देण्या विश्वा कृपेची छाया

भवतापाने पिडलो आम्ही
तुम्ही व्हावे दिशा  सूचक 
वंदन करोनी मागते तुजला
गजानना तुची अमुचा पालक

   वैशाली वर्तक
   अहमदाबाद












भा सा व सां मंच लातुर जिल्हा 
आयोजित  
पहिला वहिला उपक्रम 
१२  व १३ सप्टे२२
विषया -  मनातील बाप्पा


सर्व  देवांचा देव गणपती
असे तोची संकट हारी
सारे करीती त्याची भक्ती
आहेच गणराया सुखकारी

पाहता मूर्ती  गणेशाची
वाटे प्रसन्नता मनात
मनाचे गा-हाणे सांगण्या
मन होतेची तयार क्षणात

गणराया असेची ऐसा
ऐकतो सा-यांच्या मनीच्छा
म्हणूनच तर वसे मना मनात
परी पूर्ण करिता, देतो शुभेच्छा

 आला होता पाहुणा म्हणूनी
दिधला आनंद जन मनाला
घडवून भेटी आनंदाचा सोहळा
आनंदमय जीवन दिधले जगताला.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


काकडे देशमुख शिक्षण संस्था 
आयोजित गणेश चतुर्थी निमित्त काव्यलेखन स्पर्धा 
विषय ..  आपल्या मनातील बाप्पा 
शीर्षक..   लाडका बाप्पा 

सर्व  देवांचा देव गणपती
असे तोची संकट हारी
सारे करीती त्याची भक्ती
आहेच गणराया सुखकारी.


पाहता मूर्ती  गणेशाची
वाटे प्रसन्नता मनात,
मनाचे गा-हाणे सांगण्या
मन तयार असतेची  क्षणात.


गणराया, असेची ऐसा
ऐकतो सा-यांच्या मनीच्छा.
म्हणूनच तर वसे मना मनात
परी पूर्ण करिता, देतो शुभेच्छा.


बाप्पा येणारच्या खुशीने 
 रंग रंगोटी  होते घरांची
 मना -मनातील बाप्पा साठी
 चंगळ लाडु मोदक पक्वान्नांची.


येतो चार दिवसाचा पाहुणा 
देतो आनंद  सकळ जन-मनाला
घडवून भेटी आप्त जनांच्या 
आनंदमय जीवन देतो जगताला.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 




भारतीय साहित्य  व सां मंच कोल्हापूर 
आयोजित 
चित्र  काव्य उपक्रम

         सदनी परतले श्री

 परतले श्री तयांच्या सदनी
 अगतिक दिसती  दर्शनास
माता पार्वती येतील लगेच
 गणेशच्या स्वागतास

 
सांगतील मातेला आता
कसा झाला उत्सव सोहळा
 पृथ्वीवरील  सर्व  वृत्तांत
 जन  किती सारे होते गोळा

पृथ्वीवर  कशी सुधारणा
 केली आहे विसर्जनात 
पर्यावरणाचे  महत्त्व 
छान कळले आहे समाजात

वाटेल मोद माता पित्यांना
ऐकून  वृत्तांताची कहाणी
 गणेशजींना खुश पाहून 
गातील त्यांची स्तुती गाणी.

वंदन करीतो  गणराया
  भक्तीभाव   मम अंतरी
तव दर्शना जमली 
भक्त मंडळी  मंदीरी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद




सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
बालगीत
विषय .. गणपती बाप्पा 

 बाप्पा  तुम्ही येताच घरी
 आम्हा मुलांची मजाच खरी.  ..धृवपद 

घर दिसे सुंदर न सुशोभित
मखराची झाली पूर्ण तयारी 
माझीच मोठी  मदत ती भारी
आम्हा मुलांची मजाच खरी.  1

कानात सांगतो गंमत खरोखर 
केलेत मोदक लाडू  पूर्ण शंभर
रोज रोज मिळणार तुम्हाला जरी
तुमच्या संगे मुलांची मजाच भारी 

एकदाच का  हो येता घरी
रोज रोज या ना तुम्ही तरी
मिळेल शाळेला सुट्टी हो बरी
आम्हा मुलांची मजाच खरी 


वैशाली वर्तक
अहमदाबाद



काव्य निनाद साहित्य मंच पुणे
आयोजित उपक्रम
क्रमांक 8
विषय .. पार्वती नंदन
  
गणपती बाप्पा | पार्वती नंदन |
करीते वंदन     |    भक्ती भावे || १

तूची तात मात | ठेवी कृपादृष्टी |
न करीशी कष्टी| कदाकाळ|| २

प्रथम पूजेचा | असे तुज मान |
करिती सन्मान| सदा काळ || ३

 तूची गणराया | रणी धुरंधर |
 कृपा निरंतर  | ठेवीतसे || ४

तव नाम  घेता |  मन होई शांत. |
नुरते न भ्रांत |  गणराया ||  ५

पार्वती नंदना | आले मी शरण |
करीते नमन |मनोभावे. ||.   ६

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

मी फक्त तुझी

माझी  लेखणी साहित्य  समूह
विषय - मी फक्त तुझी

       गुंतता हृदय हे
कधी अशी मी गुंतले
माझे मलाची कळेना
काय अशी तुझी जादु
केलीस तू मला उमजेना


आवडे रमणे तुझ्यात
तव विचाराचा ध्यास
होते बावरी तुला बघताच
सदा भेटण्याची  आस

गंध विलसतो फुलात
 मी वसते तव अंतरी
एकरुप होते मनात
राहीन समीप निरंतरी


जैसे शशी येण्याची नभी
वाट पहाते  चांदणी  सदा
तीच ओढ  मनी माझ्या 
मी फक्त तुझीच सर्वदा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

खंत कामगाराची

कामगारांची  खंत
    
करितो काबाड कष्ट
दिवसभर नित्य राबून
पोटाच्या  खळग्या साठी
दिवस रात्र  एक करुन

खरे पहाता जशी दिसे
उभी सुंदर  इमारत
करीती  वर्णन सौंदयाचे
गुणगान  गाण्यात नाही थकत

पण  पाया भरणी विट
दिसत नाही कुणाला
असे ती आधारभूत 
सर्व  वरच्या सौंदर्याला

करणारे कष्टकरी याची
सदा हवी मनी जाणीव
तेची  कामाची घेती दक्षता
ठेवता  न कशाची उणीव 

 एक दिवस  देऊन मान
 फेड होत नाही उपकाराची
मनी ठेवा मान कष्टाचे
जाणा खंत कामगारांची


द्यावा परिश्रमाचा मोबदला
जाणूनी कष्टाची खंत
नको व्हायला हयगय
द्यावी विश्रांतीसाठी उसंत

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...