गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

चंद्रयान पोहचले चंद्रावर 5कविता

[14/09, 8:42 am] Vaishali Vartak: DBAसाहित्यिक  नाशिक
आयोजित उपक्रम
विषय. चंद्रयान  पोहचले चंद्रावर

वेळेला पक्के होते चंद्रयान
वेध लागले प्रत्येक नागरिकास
त्याच्याच कडे नजर लावून
प्रतिक्षेत बसले तया पाहण्यास

सांजवेळी चांद्रयान चंद्रावरी
 निहाळती  तया जन  आनंदूनी
गौरवाने अभिमानाने गजर
भारत मातेचा करी आवर्जूनी

भुवरी टाळ्यांचा कडकडाट 
दिवा देवाजवळ यशाचा
तेजळती नारी आनंदाने
  विक्रम चंद्रयानच्या विजयाचा

उतरले चंद्रयान चंद्रावर
दिन ठरला सोनियाचा
विश्वात शोभून दिसला भारत
आत्म विश्वासाने काम केल्याचा

फडकला तिरंगा चंद्रावरं
वेळेवर टाकिले अचूक पाऊल
विजय पताका झळके जगावर
विक्रम घेतोय दक्षिण ध्रुवावर चाहुल 

वैशाली वर्तक
अहमदाबाद
[14/09, 8:43 am] Vaishali Vartak: स्वप्न गंध साहित्य समूह
आवली यमक

विषय..भारताचा तिरंगा चंद्रावर

उतरणार चंद्रयान चंद्रावर
दिन ठरणार सोनियाचा
विश्वात शोभून दिसणार भारत
आत्म विश्वासाने काम केल्याचा

फडकला तिरंगा चंद्रावर
वेळेवर टाकिले अचूक पाऊल
विजय पताका झळके जगावर
विक्रम घेतो दक्षिण ध्रुवावर चाहुल 

वैशाली वर्तक
अहमदाबाद
[14/09, 11:12 am] Vaishali Vartak: भारताचा तिरंगा चंद्रावर*

भारताच्या तिरंग्याने चंद्रावर
अधिराज्य गाजवले जगात
ध्रुवावर दक्षिण दिशेला
चांद्रयान   उतरले अवकाशात 

शास्त्रज्ञांच्या  बूध्दीचा अभिमान
भारतमातेचा मान राखलाच
बहूमान मिळवूनी साक्षीदार जाहले
भारताची शान, तिरंगा फडकलाच...!

भेटे चंदामामा  चांद्रयनाला
विसरून  असफलतेला वारंवार
आकाशाला  घालूनी गवसणी
विलक्षण मोहरला चंद्र एकवार...!

 उभे  रोमांच अंगावरती
जयजयकार  अवनीवरती  रंगला
चंद्रावरती विसावूच गौरवाने सारे
नव्या शोधावरती शास्त्रज्ञ दंगला...!

वैशाली वर्तक








काव्य निनाद साहित्य मच
*विषय - चंद्रावर तिरंगा.

चंद्र मोहीम केली यशस्वी 
मानकरी आहेत इस्रो वैज्ञानिक 
चांद्रयान-3 च्या साहाय्याने
जगी नाव झाले भारत आधुनिक

 प्रथम मान पटकविला
भारताचा ठरला अभिमान
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 
पोहचणारा रोव्हर 'प्रज्ञान'..

 स्वप्न  होते फार दिवसांचे
उतरले  प्रत्यक्षात इसरोनी 
भारताची ध्वजा फडकली
चंद्रावर आज तिरंग्यानी

 शास्त्रज्ञांनी दाविले तंत्रज्ञान 
नाही अशक्य काहीच जगात 
राहू स्पर्धेत  सदैव महासत्तेच्या 
 दाखविण्या पराक्रम नव्या युगात



DBAसाहित्यिक  मंच मुंबई आयोजित उपक्रम क्रमांक 85
विषय...चांद्रयान 3ने घडविला इतिहास

अगदी बरोबर आहे कथन
सांजवेळी चांद्रयान चंद्रावरी 
चांद्रयान 3ने घडविला इतिहास
गौरवशाली अभिमानाचा जगतावरी

 झाले सारे शास्त्रज्ञ सावध
चंद्रयान २ च्या अपयशाने
चार वर्षांच्या महेनतीने 
चमकले धव़धवीत यशाने

केले  प्रयत्न भगीरथ
इसरोच्या संपूर्ण पथकाने
जिद्दीने चिकाटीने टाकिता पावले
इतिहास घडविला नव्या जोशाने 

चंद्रभूमीवर  उमटविली 
प्रतिमा भारतमातेची 
अवघ्या जगात वाढविली शान 
देशाच्या आत्मनिर्भरतेची

प्रथम नंबर लागला  जगात
  दक्षिण ध्रुवावर आजवर
अभिमान भारत मातेचा
सांजवेळी चांद्रयान चंद्रावर

वैशाली वर्तक
अहमदाबाद




बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

करू शुभेच्छांचा वर्षाव


प्रथम वर्धापन दिनानिमित्त
विषय ...आज फुलला सोहळा
शीर्षक,....  *करु शुभेच्छांचा वर्षाव*


रोजच असे जीवनी सोहळा
तयात आज दिन  वर्धापन 
वर्ल्ड व्हिजन समूहाचे
झाले आनंदाने पुलकित  मन

न भेटता कोणी प्रत्यक्षात
लेखणीच्या साहाय्याने सारे
सहज सांगती, विचार मनीचे. 
जुळले नाते साहित्याचे न्यारे 

नवनवीन विषय मिळता
देवी सरस्वतीला स्मरती 
घेत तिचे आशीर्वाद सदा
माय मराठीची सेवा करती

गद्य ,पद्य, ललित लेखन
साहित्याची  उघडतात  दालन
स्फुर्ती मिळते सारस्वतांना
*वर्ल्ड व्हिजन समूह*  ठरे कारण

लेखणी सखी व शब्द सख्याने
आज समूहात फुलला सोहळा
शुभेच्छांचा करण्या वर्षाव
सारस्वत होणारच  ना गोळा?


वैशाली वर्तक
अहमदाबाद 
३०\८\२३

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...