स्वप्न गंध आयोजित
दिवाळी फराळ अष्टाक्षरी
**फराळ दिवाळीचे**
शुभारंभ करंजीने
कशी दिसली भरीव
मस्त टम्म फुगलेली
दिसे फारच रेखीव
घाट घालू लाडवाचा
छान बेसन शेकले
काजु बेदाणे लावून
गोल गोल ते वळले.
घेऊ शंकरपाळ्याला
मैदा साखरेचे पाणी
मस्त भिजवून लाटू
मुले गाती गोड गाणी
आज घेवू चकलीला
तिची ती शान आगळी
तीळ हिंग स्वादिष्टाने
रुपे काटेरी वेगळी
जरा चिवडा चिडला
झाला थोडा तो अधीर
होते सारे फोडणीत
नको होउस तू गंभीर
लक्ष्मी पूजनाला शोभे
अनरसा रुपवान
दिसे तो रुबाबदार
दावी स्वतःचीच शान
वैशाली वर्तक
20/11/20
काव्य स्पंदन 02 राज्य स्तर
काव्य स्पंदनी दीपोत्सव
काव्य प्रकार चारोळी
1
घेतले करावया **शंकरपाळे**
मैदा मोहन साखर पाणी
मस्त भिजवून लाटून तळले
खमंग पाहताच मुले गाती गाणी
2
**करंजीचा* आज केला बेत
मस्त सारण भरुनी प्रेमाने
पाळीला केल नीट बंद अन्
बेसन लाडू वळले नियमाने
3
चिवडा जरा रुसला आज
त्याच्या नंबरला झाला उशीर
चिवड्याला काय माहित बाकीचा
माल तयार आहे, होउ नकोस गंभीर
4
*चकलीच्या* भाजणीची औरच त-हा
फराळात तिला मान आगळा
मोहन, तीळ ,हिंग घालून मळता
रंग खुले छान काटेरी वेगळा.
5
लक्ष्मी पूजनाचा *अनारसा*
त्याचा त्या दिवशीचा मान
कसा दिसतो रुबाबदार
वर खसखस ची दिसे शान
वैशाली वर्तक
अष्टाक्षरी फराळाचे संमेलन
दैनंदिन उपक्रम
अष्टाक्षरी रचना
विषय -- **फराळाचे संमेलन**
सारे फराळी पदार्थ
भरलेले डब्यातुनी
कधी बाहेर येणार
वाट पाही मनातुनी
एका ताटात सजले
वाटे जमलीय सभा
लाडु होते मधोमध
जणु सभापती उभा
शेव, चकली,करंजी
म्हणे आम्ही चवदार
छोटी ती शंकरपाळी
बालुशाही शानदार
बोले चिवडा चविष्ट
काजु वाढवे ती शान
चिरोट्याची चुळबूळ
पहा माझे रुप छान
लाजूनिया मुरडूनी
बोले पहा अनारसा
किती मीच रुपवान
रुप पहात ते बसा
भेटू पुन्हा दिवाळीला
येऊ दरवर्षी सारे
झाली शुभ दिपावली
लेवुनीया रुप न्यारे
वैशाली वर्तक.