शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

चित्र काव्य. मिळाला निवांत

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

उपक्रम क्रमांक 1156

दि 22/11/24

विषय .. चित्र काव्य 


   मिळाला निवांत


हवासा वाटतो एकांत 

 म्हणूनच येऊन बसला

पहात निश्चल शांत जल

गहन विचारात गुंगला


नको तो आवाज गोंगाट

हवा आहे तया एकांत 

रम्य सायंकाळी आला

एकटाच बसला निवांत


मिळविण्या ज्ञान , सिध्दी

 चित्ताला  एकांत  हवा

होता एकचित्त , सारे विसरता

एकाग्रता देते विचार  नवा    


जलात उठणारे तरंग 

करीती प्रेरित विचारांना 

प्रश्न मनीचे सोडविण्या

सहज ची शोधी उत्तरांना


वर सुंदर निळे नभ

मधे तुरळक आकाशी मेघ

प्रतिबिंबाने झाले जलनिळे 

दुरवर दिसते क्षितीज रेघ


सारे सारे कसे शांत

मिळेल मनास शांती

आला होता विचारात 

जातांना नसेल मना भ्रांती


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४

गाव जत्रा

 मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र आयोजित 

साप्ताहिक स्पर्धात्मक उपक्रम क्रमांक 20

विषय..गाव जत्रा

 शीर्षक ..सोहळा आनंदाचा


गाव जत्रेचे ऐकलंय

नसतो भपका शहरी

नाही पाहिलीय कधीच

जाण्याची मनीषा अंतरी.   1


गावकरी बैलगाडीने

जातात जत्रेच्या ठिकाणी 

आनंदाने भेटती जन

गाती मिळूनी  ग्रामीण गाणी.   2


 खूप दुकाने सजलेली

 वस्तू खेळणी कपड्यांची 

न दिसे पीझा, चायनीज ,

असे  कांदेभजी ,भाकरी झुणक्याची.  3



खेळ डोंबाऱ्याचा चाले

पताका , दिवे दिसती न्यारे.   

मोठे उंच  चक्करडयात

बसण्या आतुर जन सारे       4


विरंगुळा मिळे जत्रेत 

 वाट  जत्रेची जन पाहती ,

रोजच्या रहाटगाड्यतून

क्षण सुखाचे अनुभवती.        5


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

एक मी ही विद्यार्थीनी


स्पर्धेसाठी 
मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र आयोजित 
भव्य दिव्य राज्यस्तरीय मासिक काव्य स्पर्धा क्रमांक ७
विषय . एक.मी ही विद्यार्थीनी 


अंत नसे शिक्षणाला
ओघाने आले शिष्य -पद
ज्ञान शिक्षण हवे  अंतापर्यंत  
जीवन होते निरापद.            १

घेते मी ज्ञान समूहातून 
कसे करावे उत्कृष्ट लिखाण 
तर , झालेच  ना  विद्यार्थीनी 
मानते स्वतःला लहान             २

जन्मापासून सुरू नाते
गुरू शिष्य परंपरेचे 
लहान असो, मोठेपणीपण
घ्यावे  लागती पाठ विद्येचे         ३

शिकणे हे गरजेचे 
वाढविण्या आपले ज्ञान 
विद्यार्थी अवस्था महत्त्वाची 
ठेवा सदा त्याची जाण.             ४

 जाणूनी महिमा गुरूचा
मिळण्या जीवनात आकार 
विद्यार्थीनी मी रहाते सदैव 
आयुला भक्कम आधार 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४

शाबासकी

सारस्वताची मांदियाळी( R)
आयोजित काव्यलेखन उपक्रम 
विषय ... शाबासकी 


कानी येता शब्द शाबास
कष्ट विसरुन, पुन्हा कामाची तयारी
आनंदाने ,उत्साहाने ,नव्या जोमाने ,
शाबासकी देते मनास उभारी.

मन कसे भरून पावते ना !
मिळता थाप , कौतुकाची पाठीवर,
केलेल्या प्रयत्नांच्या  यशाला 
शाबासकी देते स्फूर्ती मणभर.

साधा शब्द असे शाबासकी 
पण असते तयाची गरज 
प्रगती घडविण्यात महत्वाचा 
मोठ्या मनाने ,वापरावा सहज.

 शाबासकी असे प्रमाणपत्र 
 यश मिळविलेल्या  कामाचे 
  तेच वाढविते मनोबळ
सदा प्रगतीशील रहाण्याचे

पण सध्याच्या काळात 
 पदोपदी चाले उच्चारण
ऐकण्या कौतुकाचे बोल 
शब्दांचे करीती पारायण 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

रंग (विविध फुले)

 अभा म प सा ठाणे जिल्ला 2

आयोजित 

उपक्रम 

विषय - रंग

                                                                   


     किमया  निसर्गाची


निसर्गाची पहा किमया

फुले फुलली विविध रंगात

लाल पिवळी श्वेत निळी

 तितकीच   असे नाना गंधात



फुलांचा राजा गुलाब

रंगे, रुपे, गंधे, रुबाबदार

फुलतो विविध  मोहक  रंगात

 पहा त्याची ऐट शानदार



फुलला   मोगरा  श्वेतरंगी

माळिता तयाचा  गजरा

 गंधे चित्ताला वेधक

  सहजची  वळती नजरा


 चाफा  शेवंती  कह्णेरी

असती  विविध रंगात


असे मान तयांचा खास

खुलून दिसती गंध रूपात



  रंगात बकुळी रातराणी 

 जरी पडती   जरा मागे

सुगंधात आसती वरचढ

 आठवणींचे विणती धागे



सारी किमया विश्वंभराची

केवढी केली सृष्टी  तयार

आहे का तया निर्मीतीची भ्रांत

 पण सुख दिधले आपणा अपार



वैशाली वर्तक 


अहमदाबाद




सारस्वतांची मांदियाळी (R)

आयोजित उपक्रम क्रमांक 4

विषय... रंग 

      निसर्गाचे रंग 

सूर्य किरणांचे पृथ्थकरण

करिता मिळती सप्तरंग 

सारे रंग पहा कसे मोहक

पाहून मन प्रमोदाने दंग 


सोनसळी किरणांची ऊषा

नभात उधळण केशराची

सूर्य जस जसा चढे नभी 

लाली वाढे नभात किरणांची 


येता वर्षा काळी अवनी

सखा तियेचा सजले नटवे 

रुप तियेचे पार बदलते

नव वधुसम नेसे वस्त्र हिरवे.


जलाशय घेई रंग  नभीचा

सुंदर नभ सु -नील रंग 

रूप  प्रतिबिंबित किती सुंदर 

जन मनात भरे उमंग 



दाखवी  रंग नवे नवे

निसर्गच चित्रकार खरा

ऋतु चक्रा प्रमाणे  दावी

निसर्गाच्या विविध त-हा.


वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

8141427430



सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...