१
पावसा कधी रे कळेल तुला
तुजवरी च पावसा
सारी अवलंबून सृष्टी
तरी का तू न ठेविशी
तीजवरी कृपादृष्टी
सुधा भ्रमण करिते
सदा नियमीत नेमाने
म्हणूनच येती जगी
ऋतू चक्र ते क्रमाने
पण पावसा तूच का
करी तो चुकार पणा
राही आडूनी दावितो
सदा तुझाची मी पणाञ
येता न कधी वेळेवर येत नाही कधी वेळेत
करितोस तू उशीर
पाण्या विना ती शिवारे
सदा दिसती अधीर पाण्या साठी अधीर
विना पाणी जीव सृष्टी
कशी सांग बहरेल
प्राणी मात्र तुजविण
कसे बरे जगतील
येता न तू वेळेवर
कधी अवचित येऊनी
उभ्या पिकाचे करितो
नुकसान तू करुनी
अती वृष्टी करुनी
नेतो वाहूनी घरदार
करी सर्व जना मना
सर्व परीने बेजार
उभे पीक दाण्या सवे
पाहूनिया मोद वाटे
तुझ्या नको तेव्हा येण्याने
मनी मात्र दुःखची दाटे.
वैशाली वर्तक
2 प्रतिक्षा बळीराजाची
झळा उन्हाच्या साहूनी
धरा पहा भेगाळली
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसली
वाट पाही बळीराजा
काळ्या मेघांना पाहूनी
नजरेत दिसे प्रतिक्षा
वरुणाला विनवूनी
कष्ट करुनी उन्हात
काळ्या मातीला कसीन
नांगरुन काळी माय
घाम तयात गाळीन
पाणी पडावे मृगाचे
बीज अंकुरे फुटावी
कोंब डोकवेल वर
मने आनंदे भरावी
चारा मिळावा गुरांना
मोल मिळावे कष्टाचे
दिसो दारी धान्यराशी
नको दिन प्रतिक्षेचे
करितोय विनवणी
मान द्यावा प्रतिक्षेला
बरसून शिवारात
पूरी करा मनीच्छेला
वैशाली वर्तक ओळ काव्य
3 ?
काठ हिरव्या शालूच्या
वैशाली वर्तक
करितोय विनवणी
मान द्यावा प्रतिक्षेला
बरसून शिवारात
पूरी करा मनीच्छेला
वैशाली वर्तक ओळ काव्य
3 ?
काठ हिरव्या शालूच्या
वैशाली वर्तक
ओळ काव्य लेखन स्पर्धा
गीत लेखन
३ सर सर पाऊस पडतोय रे
सर सर पाऊस पडतोय रे
झर झर ओहळ वाहताती रे
नभातून बरसल्या जलधारा
मृदगंध पसरवे थंड वारा
ओधळल्या मोतियांच्या सरी रे
खळखळ ओहळ वाहताती रे 1
दाटले अंबर काळ्या मेघांनी
दामिनी चमके रुपेरी रेघांनी
झाकोळलेल्या नभी दडे सुर्य रे
खळखळ ओहळ वाहताती रे 2
जागोजागी भरे खाच्यातून पाणी
नाचत खेळू गात पाऊस गाणी
ओंजळ भरुन धारा फेकुया रे
खळखळ ओहळ वाहताती रे 3
रान माळ हिरवे गार चहुकडे
नृत्य वनी मयुराचे पाहु गडे
इंद्रधनुची कमान नभात रे
खळखळ ओहळ वाहताती रे 4
सर सर पाऊस पडतोय रे
झर झर ओहळ वाहताती रे
आज पाऊस थोडा
आले आदित्य गगनी.
पहा शलाकांचा साज
आज आभाळ निरभ्र
रजेवर पाऊस आज
कमी भासे तीव्रता
धरा झालीय हिरवी
जलधारा वर्षावानी
दिसे अवनी बरवी
आज पाऊस थोडा
असे भासले क्षणिक
पण सुटलाय वारा
भरवसा नसावा अधिक
घेऊ आटपून कामे
लागेल पुन्हा पाऊस
आता सुरू आषाढ
संपली भिजण्याची हौस
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अ भा म सा प स्वप्नगंध समूह
उपक्रम अष्टाक्षरी
४ विषय - *आल्या पावसाच्या धारा*
शीर्षक- *वर्षा धारा*
तप्त झाली वसुंधरा
मेघ गर्दी नभांगणी
आला सोसाट्याचा वारा
पाणी बरसे अंगणी
वाजवित ढोल ताशे
मेघ राजा बरसला
नृत्य दावी सौदामिनी
मोर आनंदे नाचला
चिंब झाली वसुंधरा
आल्या पावसाच्या धारा
ओल्या झाल्या वृक्षवेली
गाणी गात फिरे वारा
मुले नाचती आनंदे
गात गाणी पावसाची
टपटप झेली धारा
माळ दारी पागोळ्याची
पावसाची सर येता
मृदगंध पसरला
तृप्त जाहली अवनी
मोद भरूनी उरला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
५ मेघ मल्हार
ढगांनी भरलेअंबर
उडे पाचोळा दाही दिशात
वारा वाहे सोसायट्याने
चाले खेळ मेघांचा अंबरात
काळे मेघ गाती मल्हार
मेघ नभी गडगडती
सौदामिनी नृत्य दावी
सरी वर सरी बरसती
हर्षे मुले नाचताती
टप टप धारा बरसती
मोर दावी नृत्य मनोहर
पंख पसरुनी पक्षी उडती
वर्षावाने अवनी भिजली
तृप्त झाली पाणी पिऊनी
पागोळ्या पडती दारी
मृदगंध दरवळे दिशातूनी
..................................
६
ऋतुगंध साहित्य समूह प्रथम वर्धापन निमित्त आयोजित भव्य काव्य स्पर्धा
अष्टाक्षरी काव्य रचना
विषय - पाऊस आणि कविता पाऊस आणि कविता
8 *ऋतु बरवा*
येता मृगाची ती सर
खुश होई बळी मन
मनी आतूर चातक
आनंदती सारे जन
काय नाते उमजेना
पावसाचे कवितेशी
भावनांचा पूर पडे
नाते जडते शब्दांशी
पाहताच कृष्ण मेघ
कशी सुचते कविता
चिंब मन पावसात
थेंबे ओंजळी भरिता
होई सुरू वर्षा ऋतू
कोणी म्हणती बरवा
धरा भासे नव वधू
शालू नेसून हिरवा
पावसाची सर येता
मृदगंध पसरला
तृप्त जाहली अवनी
मोद भरूनी उरला
राहे स्मरणी पाऊस
आठवांना येई पूर
घडो जरी गतकाळी
येतो भरुनिया ऊर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
!
७ प्रीतीत पावसाच्या
तप्त ऊन्हाच्या झळा साहूनी
कोमेजली धरेची काया
दिसे मरगळलेली सृष्टी
वृक्षाची कमी भासे छाया
ओती आग रवीराज
होई लाही लाही अंगाची
कृष्ण मेघांची नभी गर्दी
धरा वाट पाहे मृग जलाची
आल्या आल्या मृग धारा
भिजूनीया तृप्त वसुंधरा
ओली चिंब चिंब जाहली
चिंब प्रीतीच्या पावसात धरा
देता आलिंगन धरेस
कण कण जाहले तृप्त
मृद गंध दरवळे आसमंती
जल पिऊन वसुधा संतृप्त
बरसता जलधारा भुवरी
भासे हिरवाईने नटली
जणु प्रीतीच्या पावसात
नव वधू सजली धजली
*प्रीत पावसाने* अंकुरली
बीजांकुरे फुटे अलवार
नेसविला हिरवा शालू
लाजून मुरडली हळुवार
वैशाली वर्तक
**वरचीच कविता फेर बदल करून*
* *स्पर्धेसाठी*
सिद्ध साहित्यिक समूह
प्रशासक प्रितीताई गोगटे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित काव्य लेखन स्पर्धा
प्रकार पारंपारिक कविता
विषय.. मातीला लागले डोहाळे
*प्रीतीत पावसाच्या*
आल्या आल्या मृग धारा
भिजूनीया तृप्त वसुंधरा
ओली चिंब चिंब जाहली
चिंब प्रीतीच्या पावसात धरा. १
देता सख्याने आलिंगन धरेस
कण कण जाहले तृप्त
मातीला लागलेले डोहाळे
जल पिऊन वसुधा संतृप्त २
बरसता जलधारा भुवरी
भासे हिरवाईने नटली
जणु प्रीतीच्या पावसात
नव वधू सजली धजली. ३
प्रीत पावसात अंकुरली
बीजांकुरे फुटे अलवार
*मातीला लागले डोहाळे*
पुरविले सख्याने हळुवार ४
वैशाली वर्तक
अहमदाबाद
८ अ भा म सा प स्वप्नगंध समूह
विषय - बरस रे मेघाबरस रे मेघा
*आर्त विनवणी*
येणार तू नक्की
केली बी पेरणी
बरस ना आता
किती विनवणी 1
कष्ट करुनिया
घाम तो गाळून
केली मेहनत
शिवारी कसून 2
ऐनवेळी आता
का रे तू रूसला
कुठे गेले मेघ
लपून बसला 3
मृगाच्या पाण्याने
जीवा लागे आस
फुटतील बीजे
धरिला तो ध्यास 4
बरस रे मेघा
नको पाहू अंत
बळीची वाढवू
नकोस तू खंत 5
नेहमीच तुझे
दाखवितो खेळ
वेळेत न येणे
जमव तू मेळ 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
माझी लेखणी अष्टाक्षरी मंच
उपक्रमासाठी
९ विषय - श्रावणसरी
*लोभस रुप धरेचे*
मृग धारा बरसल्या
धरा पहा अंकुरली
वृक्षवेली तरारता
वसुंधरा बहरली
येता श्रावण बरसे
रिमझिम जलधारा
सरी वर सरी येती
थंड गार झोंबे वारा
श्रावणात आदित्याचा
खेळ ऊन पावसाचा
सर क्षणी बरसूनी
पुन्हा दिवस ऊन्हाचा
झाली भर सौंदयात
दिसे इंद्रधनु मागे
दावी अवनी नभीचे
जणु प्रीतीचे ते धागे
कड्यातून वाही झरे
भासे शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस निसर्ग
गीत गाई मंद वारा
रुप पहा वसुधेचे
कसे दिसे मनोहर
जणू हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अ भा म सा प स्वप्नगंध समूहआयोजित उपक्रम
विषय - १० कोसळले आभाळ
*धुवादार पाऊस* धुंवादार पाउस
सुरु झाला ऋतु वर्षा
नभ दाटले मेघांनी
दाहकता कमी भासे
आदित्याची नभांगणी
गर्दी जलदांची नभी
गर्जताती कृष्ण मेघ
झाली घाई बरसण्या
मधे चमके वीज रेघ
ढोल ताशांच्या गर्जना
धुवादार बरसात
भासे फाटले आभाळ
घन आले ओथंबूनी
लपंडाव चाले खेळ
मेघ गातात मल्हार
जमे पावसाचा मेळ
कड्यातून वाहे झरे
जणू शुभ्र दुग्ध धारा
खाच खळगे भरले
शीळ घाली मंद वारा
जणु सरी मोतीयांच्या
भासताती जल धारा
वाहे ओहोळ सर्वत्र
ओली चिंब झाली धरा
वैशाली वर्तक
माझी लेखणी अष्टाक्षरी मंच
उपक्रम
११विषय -- आला आला पावसाळा
*वर्षा ऋतू*
कृष्ण मेघांना पाहूनी
वाटे हायसे मनाला
*आला आला पावसाळा*
हर्ष दाटतो बळीला. 1
उडे पाचोळा सर्वत्र
वाहे सोसायट्याचा वारा
मेघ गर्जती अंबरी
सुरु झाल्या वर्षाधारा 2
कधी पडे रिमझिम
पहा झिम्माड पाऊस
नद्या वाहे खळखळ
भिजण्याची संपे हौस 3
कड्यातून वाही झरे
भासे शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस निसर्ग
गीत गाई मंद वारा 4
येता श्रावण बरसे
रिमझिम जलधारा
सरी वर सरी येती
थंड गार झोंबे वारा 5
रुप पहा वसुधेचे
कसे दिसे मनोहर
जणू हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सावली प्रकाशन समूह
आयोजित
उपक्रमासाठी
षडाक्षरी
१२ विषय - झाली तृप्त धरा
*मृगाचा पाऊस*
मेघांचे अंबर
पाचोळा दिशात
वारा सोसाट्याचा
दामिनी नभात १
पहाता पहाता
थेंब बरसले
माती झाली ओली
मन प्रसन्नले २
मृग जल पीता
*झाली तृप्त धरा*
भेगाळली होती
किती वसुंधरा ३
अवनी भिजली
जल ते पिऊनी
सुगंध मातीचा
दाही दिशातूनी ४
थंड वारा देई
गारवा तनाला
बरसता धारा
आनंद मनाला ५
मोर दावी नृत्य
थेंब झेली पक्षी
पागोळ्यांची दारी
मनोहर नक्षी ६
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अ भा म सा प समूह 2
8/6/22
उपक्रमासाठी
विषय -. १३ *ये रे घना ये रे घना*
आले मेघ दाटुनिया
झाली गर्दी अंबरात
उडे पाचाळो वा-याने
बरतील ते क्षणात
किती पहावी रे वाट
*ये रे घना ये रे घना*
व्याकुळली सारी सृष्टी
देना हर्ष तना मना
लागे चाहुल पक्षांना
बघ उडती नभात
पंख पसरी मजेत
घाव घेती घरट्यात
थंड झुळुक वा-याची
करी मना प्रफुल्लित
मोर दावी नृत्य त्याचे
आसमंत आनंदित
ये रे घना ये रे घना
न्हाऊ घाल वसुधेला
तप्त भेगाळली काया
कर शांत तू धरेला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
१४ गरजत बरसत या मेघांनो
सिद्ध साहित्यिक समूह
उपक्रम 443
विषय - गरजत बरसत या मेघांनो
*ऋतू हिरवा*
झाली मृगाची बरसात
दरवळला मृद्गंध आसमंती
वृक्ष लता फोफावली
गरजत बरसत या मेघांनो
नको नुसती गर्दी गगनात
गडगड करित बरसा रे
पेरणीची झाली वेळ शिवारात
वाहतील झरे खळखळ
भासतील शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस ते निसर्गाचे
गीत गाईल थंड मंद वारा
बळीराजा खुश होईल
काम करेल शिवारी
स्वप्न रंगवेल मनी
गोड लागेल भाकरी
वाहता जल कडे कपारीतून
होईल रंग धरेचा हिरवा
रानमाळ डोंगर सजतील
करु साजरा ऋतू बरवा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
बालविश्व साहित्य मंच
आयोजित
बाल काव्य लेखन
१५ विषय - जा रे जा पावसा
किती रे बरसणार पावसा
परतीची झाली ना वेळ
बस कर तुझे पडणे
बंद कर बेभवशाचा खेळ.
बळीराजा होईल नाखुष
अती वर्षावाने आता
मेहनत जाईल वाया
नको करू कष्टी जाता जाता
सुरू झाले नवरात्र
खेळायचाय गरबा रास
तुझ्या पडण्याने पहा
मजा येत नाही खास
वेळवर न येता सदा
पळवितो तोंडचे पाणी
आता जायची वेळ झाली
जाण्यासाठी गाऊ का गाणी ?
जा रे जा पावसा आता
आवर मेघांचा पसारा
पुढल्या वर्षी भेटू तेव्हा
दाखव तुझा रंग न्यारा
झालय सर्वत्र हिरवे गार
नको अती तुझा वर्षाव
रोग राई पसरण्या आधी
बस्तान गुंडाळण्याचा कर प्रस्ताव
वैशाली वर्तक
अहमदाबाद
बरसा आता मृग सरींनो
लाभेल तृप्तता मनाला
दरवळेल मृद्गंध आसमंती.
तरालेल सृष्टी क्षणाला.
गरजत बरसत या मेघांनो
नको नुसती गर्दी गगनात
गडगड करित बरसा रे
पेरणी वेळ होता शिवारात
वाहतील झरे खळखळ
भासतील शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस रूप निसर्गाचे
गीत गाईल थंड मंद वारा
बळीराजा खुश होईल
काम करेल शिवारी
स्वप्न रंगवेल मनी
वरुणा ,तूच त्याचा कैवारी
कृपा सदैव राहता तुझी
होईल रंग धरेचा हिरवा
रानमाळ डोंगर सजतील
करु साजरा, ऋतू बरवा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
आज पाऊस थोडा
आले आदित्य गगनी.
पहा शलाकांचा साज
आज आभाळ निरभ्र
रजेवर पाऊस आज
कमी भासे तीव्रता
धरा झालीय हिरवी
जलधारा वर्षावानी
दिसे अवनी बरवी
आज पाऊस थोडा
असे भासले क्षणिक
पण सुटलाय वारा
भरवसा नसावा अधिक
घेऊ आटपून कामे
लागेल पुन्हा पाऊस
आता सुरू आषाढ
संपली भिजण्याची हौस
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा