माझी लेखणी - काव्य नगरी मंच
चित्र काव्य
शीर्षक *वृक्षारोपण*
नको -हास वनांचा
करुया वृक्षा रोपण
करा जतन सृष्टी चे
सुधारण्या पर्यावरण
निगा राखा तरु लतांची
वृक्ष असती सखे सोयरी
जिणे होईल नाहीतर कठीण
प्राणवायु देती वृक्ष वल्लरी
थांबवा प्रगतीच्या नावाने
जंगल वने तोडण्याचा क्षोभ
होत आहे निसर्गाचा -हास
मानवाचा वाढलाय लोभ
पक्षी जलचर कुठे जातील
नका ओढावू वरुणाचा रोष
कसे कसेल शेत बळीराजा
पावसाला नका देऊ दोष
वृक्ष ची देती आपणा सावली
थकलेल्या पथिकास छाया
अन्नवस्त्र देती निवारा
वृक्ष च करती सदैव माया
वैशाली वर्तक
अहमदाबाद