गुरुवार, १३ जुलै, २०२३

उन्हाचे चांदणे व्हावे.. कष्टाचे मोल


 स्वराज्य लेखणी मंच

आयोजित उपक्रम

विषय.. उन्हाचे चांदणे व्हावे


        **कष्टाचे मोल*


काळ्या मातीला कसून

घाम गाळीतो शिवारी

परिश्रम घेतो सदा

पहाण्यास राशी दारी


वाट पाहतो जलाची

बरसण्या मृग धारा

करण्यास पेरणीला

सोसतो गर्म वारा


येता वेळेवर वर्षां 

पहा  माती अंकुरली

पाहुनीया  बीजांकुरे

बळी मने संतोषली


जसा पडता पाऊस

रोपे वाढली जोमाने

झाले उन्हाचे चांदणे

मन डोले आनंदाने


येता दिन ते सुगीचे

भासे उन्हाचे चांदणे

कष्ट आलेत फळाला

हेची देवास सांगणे


वैशाली वर्तक

अहमदाबाद

बुधवार, १२ जुलै, २०२३

म्हणीवरून. खाण तशी माती

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच
धुळे जिल्हा
आयोजित उपक्रम क्रमांक १६७
चारोळी लेखन
विषय. ...खाण तशी माती

खाण तशी माती
कथन असे उचित 
जे पेराल तेच उगवेल
त्यात बदल नसे खचित

चांगले संस्कार देता
 घडे उज्वल भाग्य पाल्याचे
होई. मोठा कर्तबगार 
नशीब उजळे माता पित्याचे

तसेच असे कर्माचे
जैसे करु कर्म जीवनी
मिळे फळ आपणासी
मर्म जाणा मनोमनी

लाविता रोप मधूर फळांचे
वृक्ष वाढिता देई फळ
कधीच न मिळती काटे
कितीही येता. संकट रुपी  वादळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, १० जुलै, २०२३

नाते युगायुगाचे

 



नाते युगायुगांचे


धुंद  एकांत या क्षणी

नको दावुस बहाणे

तुला समजण्या मीही

आता झालीय शहाणे


बघ सांजवेळ झाली

घेते हाती तव हात

तुझी माझी राहो सदा

नित्य प्रेमळ  ती साथ


स्मृती अजुनी आहेत

ताज्या  समुद्र  तटीच्या

गाज तयाची सांगते

आठवणी अंतरीच्या



     नाते हे युगायुगांचे

      ऋणानुबंधाच्या गाठी.  

   ओढ राहील सदैव

   स्नेह भाव सदासाठी.


हेच मागणे देवास

अशा एकांत क्षणाला

मार्ग सुखाचा चालूया

मिळो स्वर्ग सुख तुला


वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...