बुधवार, १० जुलै, २०२४

लोक काय म्हणतील


काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक ४८३
विषय. लोक काय म्हणतील?
 शीर्षक. .. मनाचेच करतो म्हणतील 
. लोक काय म्हणतील?
 

नको मनात विचार 
करा,  'मनी जे उचित' 
लोक काय म्हणतील ?
नको विचार खचित 

सदा ऐकावे जनांचे
अशी म्हण ऐकीवात
पण करावे मनाचे
हेही आहे कथनात .

मत विचार  ऐकणे
होते कामाला सुलभ
मिळे कल्पनेची माळ
नुरे शंकेचे मळभ.

खरा ठरे तोची जगी
ऐकूनिया जगताचे.  
*लोक बोलेनात काही* 
 स्वतः ठरवी , स्वतःचे 

व्यक्ती तितक्या प्रकृती 
विचारात मतभेद 
हवे तेवढे ऐकावे
नको मनी कदा खेद.

ठाम दृढनिश्चयाने
करा , स्वतःच्या मनाचे
होता यशस्वी कामात 
मन हर्षे -मोदे नाचे.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ९ जुलै, २०२४

ओल्या मातीचा सुगंध



साहित्य दर्पण कला मंच नागपूर 
आयोजित उपक्रम क्रमांक २२२
विषय..ओल्या मातीचा सुगंध 
  शीर्षक..आसमंती दरवळ

काळ्या मेघांचे आभाळ 
  सोसाट्याचा  वारा वाहे 
लागे चाहुल पक्षांना
  बळीराजा नभी पाहे

शिवारात काळी माती
 होती तप्त भेगाळली
बरसता मृग सरी
तृप्त माती संतोषली.

भेटताच तिचा सखा
 आनंदली वसुंधरा
ओल्या मातीचा सुगंध 
 पसरवी मंद वारा

ओल्या मातीचा सुगंध 
करे प्रसन्न मनाला 
कसा ओला ओला वास
हवा हवासा वाटेजनाला

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

वृध्दापकाळ

साहित्य दर्पण कला मंच नागपूर 
आयोजित 
काव्य लेखन 

विषय..वृध्दापकाळ

ऊषा दुपार व निशा
विभागला सदा दिन
बाल्य तारुण्य वार्धक्य 
आयु अवस्थाही तीन 

सरे मजेत बालपण 
जवाबदारी  पेलता तारुण्य
पण कठीणता भासते
वार्धक्य असे कारूण्य

शरीर असते थकलेले 
मन मानायला नसे तयार
 सतत  उजळणी भुतकाळाची
मग वाद विवाद अपार 

 न करावे   सल्ला सूचन
आपण आपल्यात रहावे
चिंतन वाचन छंद कला
याला मात्र जोपासावे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बटवा पाकिट

सर्वधर्मसमभाव लोकशाही साहित्य मंच 
आयोजित काव्यलेखन उपक्रम 
विषय ..बटवा \पर्स

बटवा हा गरजेचा
हवा सदा हाता जवळ
पैशा शिवाय  कसे होणार 
तोच संभाळणे काम केवळ

असती त्यांची नावे अनेक 
मनी बँग ,पर्स ,बटवा, पाकिट
काम एकच असे तयाचे
पैसाअडका ठेवणं सुरक्षित 

 नजरेत येतो ,बटवा म्हणता,
 घरची डॉक्टर वाटणारी आजी,
जरा बरं नाही समजता
सोडून येई चिरत असलेली भाजी

 भरपूर जडी बुकीटींनी भरलेला
 होता पोट दुखी , डोकेदुखी 
लगेच काढून देई बटव्यातूनी
आजार दूर सारून, करी सुखी 

आत काळ बदलला 
पर्स मधे नसतो पैसा सहज
प्लास्टिक पैसा झाल्याने
 विविध कार्डे पुरवितो  गरज 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अष्टाक्षरी. जीव शिणला शिणला

सिध्द साहित्यिक समूह 
उपक्रम क्रमांक ५६१
विषय ... जीव शिणला शिणला 
 शीर्षक ...धडपड जगण्याची 

जीव  येताची जन्मास
 धडपड  जगण्याची 
सुरू  प्राणी मात्रातून
दिसे  ती  निरंतराची

 मेंदू केलाय बहाल
 ईश्वराने मानवाला 
देतो नवीन कल्पना 
प्रतिदिनी जगण्याला 

आयुष्यात धडपड
चालते जीवन भर
म्हणून दिसे प्रगती
जीवनात निरंतर

रोज नवे आविष्कार 
नाही निवांतेचा क्षण
*.जीव शिणला शिणला* 
म्हणतसे सदा मन


सुख, शांति मिळविता
क्षणभर न उसंत 
नाही मिळाला निवांत   
मनी राही सदा खंत

आहे  जीवात जीव
हेच  वदे सदाकाळ 
जीव शिणला म्हणत 
होते उद्याची सकाळ
 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, ८ जुलै, २०२४

आज पाऊस थोडा

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

उपक्रम 

विषय ..आज पाऊस थोडा 




आले आदित्य गगनी.

पहा शलाकांचा साज

आज आभाळ निरभ्र 

रजेवर पाऊस आज


कमी भासे तीव्रता

धरा झालीय हिरवी

जलधारा वर्षावानी

 दिसे अवनी  बरवी


आज पाऊस थोडा

असे भासले क्षणिक

पण सुटलाय वारा 

भरवसा नसावा अधिक


घेऊ आटपून कामे

लागेल पुन्हा पाऊस 

आता सुरू आषाढ

संपली  भिजण्याची हौस 




वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...