भा सा व सां मंचठाणे
आयोजित
उपक्रम
विषय - पथ मज नेई कुठे
मिळता माय बापांच्या कृपेची
मग कसलीच न मज भिती
ठेव घेऊनी अमुल्य संस्काराची
जीवन मार्गी कसली क्षिती
सहनशिलतेच्या अंगी वृत्तीने
वाटेवर असता काटे जरी
मनी संतोषाने भासली फुलासम
मार्ग असो खडतर तरी
पथ मज नेई सन्मार्गी
न पडे षडरिपुची भुरळ
येता मार्गी मोह लोभ सुसरी
सद्विचारांची जाणीव केवळ
मज पथ नेई कुठे
शंका कुशंकांचे नसे मळभ
दृढ विश्वास असे मनी
पथ चालणे झाले सुलभ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कल्याण डोंबिवली महानगर
आयोजित
काव्य लेखन
विषय - मार्ग
जीवन मार्ग
मिळता माय बापांच्या कृपेची
मग कसलीच न मज भिती
ठेव घेऊनी अमुल्य संस्काराची
जीवन मार्गी कसली क्षिती
सहनशिलतेच्या अंगी वृत्तीने
वाटेवर असता काटे जरी
मनी संतोषाने भासली फुलासम
मार्ग असो खडतर तरी
मार्ग मज नेई सन्मार्गी
न पडे षडरिपुची भुरळ
येता मार्गी मोह लोभ सुसरी
सद्विचारांची जाणीव केवळ
माझा जीवन मार्ग नेई कुठे
शंका कुशंकांचे नसे मळभ
दृढ विश्वास असे मनी
पथ चालणे झाले सुलभ
वैशाली वर्तक
अहमदाबाद