शेतकरी साहित्य मंच
आयोजित उपक्रम
दि १४\४\२३
विषय.. श्वास
*श्वास माझ्या अंतरीचा*
मनी सदा एक ध्यास
तुझ्या नाम स्मरणाचा
सदाकाळ विठुराया
*श्वास* माझ्या अंतरीचा
ध्यानी मनी स्वप्नी मज
तूच दिसे सदाकाळ
कधी नाही चुकविली
वारीतील ती सकाळ
तूच असे पांडुरंगा
श्वास भक्त मंडळींचा
सांग आता तू उपाय
पंढरीच्या दर्शनाचा
स्मरु तुज चिंतनात
नाचू गाऊ भजनात
श्वास माझ्या अंतरीचा
पूजू तुजला मनात
वैशाली वर्तक
अहमदाबाद