शुक्रवार, १३ मे, २०२२

अनुभव

 अभाम सा प समूह 2

13/5/22

काव्य लेखन

 विषय -अनुभव


        सहज शिकवण

       

अनुभवांचीअसे माळ

तीच शिकवे  शहाणपण

गुंफली जाते काळ जाता

देते आपणास शिकवण


आधीच्या पिढीचे अनुभव

ऐकता मार्ग होतो सुलभ

कळती उणीवा आधीच

रहात नाही शंकेचे मळभ


 हवी अनुभवाची शिदोरी 

  चुक होण्याचा नसे बहाणा

म्हणूनच तर म्हणती जन

पुढच्यास ठेच मागचा शहाणा


लिहून ठेवले पूर्वजांनी

आलेले अनुभव तयांचे

साधे सरळ सोपे झाले

पथ जीवनात  भवाचे



वरिष्ठ  मंडळींची हजेरी

उगा का हवी वाटे घरात

बोल येती सदैव कामी 

रोजच्या व्यवहारात


वैशाली वर्तक

अहमदाबाद

संन्यास

विश्व शारदा साम (मुख्य )
शब्दफुले उपक्रम
विषय - संन्यास
     
        
बोलणे सोपे घेतो संन्यास
मोह पाश  सूटत नाही सहज
काढण्या जीव गुंतलेला संसारी 
अध्यात्माची लागते गरज


  चीकूच्या बी सम हवी वृत्ती 
  येते सहज ची बाहेर
तेच कोय आंब्याची पहा
आणते संगे रसाचा आहेर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, ११ मे, २०२२

तूच माझे काळीज. आई हृदय

*उपक्रमासाठी*
सावली प्रकाशन समूह
काव्य लेखन
 विषय -तूच माझे काळीज
        प्रेमभाव
आई देते जन्म बाळास
स्वतः कडे  करून दुर्लक्षित 
 मनी एकच विचार
कसा राहिल  तो सुरक्षित

जरा होता  दुखापत
उद्गार निघे मुखातून
*तूच माझे काळीज*
अश्रू  निघे डोळ्यातून

 बालक होता जरी मोठा 
जीव  जडे  काळजात
काळजाचा माझ्या  तुकडा
म्हणत प्रेम करे अतोनात

माता असे प्रेमाचा सागर
सदा मनी असे जिव्हाळा 
प्रेम देई  घागर भरुनी
 हृदयी भरला उमाळा

आई असो कोणाचीही
मग असो पशु प्राण्यांची
तूच माझे काळीज
हीच भावना सर्वांची

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




काव्य प्रकार अष्टाक्षरी 
शीर्षक- **तव महिमा**

उच्चारता शब्द आई
फुटे मायेचा पाझर
भरलेला सदा साठी
दया कृपेचा सागर


धरुनीया तीचे बोट
टाकी  पाऊल  जगती 
तिच्या संस्कार पुंजीने
आज साधली प्रगती


होता जीव कष्टी कदा
आई शब्द येई मुखी
स्वामी तिन्हीही जगाचा
 नाही आई,  नाही सुखी


जसे घडविण्या घडा
देती मातीला आकार
करी संस्कारी बाळांना
घेउनीया कष्ट फार

किती वर्णू आई गुण
तव मायेची ती गाथा
तुझी थोरवी महान
नमवितो माझा माथा

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सुधारित रचना👆🏼
 खूप धन्यवाद मार्गदर्शनासाठी

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...