सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४
दिलेल्या शब्दांवरून.कविता आल्या मृगधारा
नव्या युगाची जननी
नव्या युगाची जननी
आदि काळापासूनची
काय वर्णावी महती
कधी नव्हती अबला
सर्व जग ची जाणती
नाव चमकले जगी
जेथे टाकीते पाऊल
सर्व क्षेत्रात यशाची
तुज लागते चाहुल
आहे सशक्त महिला
अशा अनेक सबला
झाशी मर्दानी होतीच
नका संबोधु अबला
पहा देवीच्या रुपात
मन होते सदा दंग
*नव्या युगाची जननी*
आगळाच तुझा रंग
आहे तुझ्यात कर्तृत्व
घेण्या नभात भरारी
नव्या युगाची जननी
राहो मनात उभारी
प्रगतीच्या पथावर
सदा ठेव तू पाऊल
पहा ती झळकतील
देण्या यशाची चाहुल
सर्व क्षेत्रात दिपावी
तुझ्या उन्नतीची किर्ती
मिळो तव प्रयत्नांना
पूर्णपणे स्वप्नपूर्ती
नवी स्वप्ने नवी दिशा
कर विश्व पादाक्रांत
जगज्जेता तू होशील
हरण्याची नको भ्रांत
आहे मोकळे आकाश
करुनिया ती हिंमत
घेता नभात भरारी
जगा कळेल किंमत
आहे तुझी नवरूपे
पुजताती सदा काळ
दुर्गा कुष्मांडा
देते सुखाची सकाळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मनाची श्रीमंती
ज्योत लावू मना मनात
स्पर्धा स्पर्धा स्वप्नगंध साहित्य समूह दिवाळी निमित्त ओळ काव्यलेखन स्पर्धा ओळ. ज्योत लावू मना मनात विषय..ज्योत लावू मनामनात शीर्षक. *आ...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
जरी तू वसशी दूर वसे सख्यांच्या अंतरी तुझी प्रेमळ ती वाणी साद घालिते अधरी विविधा अध्यक्ष पद भुषविले कर्तृत्वाने सदा तयार मदतीस मित्र मं...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...