महाराष्ट्र साहित्य सुगंध
. (१) कवितेचे गाव
येता सहज विचार
कवितेचे वसे गाव
असे ते सदा वेगळे
कवी मनी घेता ठाव
झरतात शब्द जेव्हा
कवी हृदयाचे भाव
नांदी नवरस येथे
दावी अंतरीचा ठाव
वाहे भावनांची नदी
कवितेच्या गावातूनी
जसे भाव उमटती
वाहे त्या रसा तूनी
भाव दाविते शौर्याचे
स्फूर्ती देण्या सैनिकास
तर भक्ती रस भाव
दिसे भोळ्या त्या भक्तास
कवितेचा गाव पहा
देतो आनंद मनास
मनी न राखता खंत
करी उत्साहीजनास
वैशाली वर्तक
काव्य पुष्प साहित्य मंच समूह
स्पर्धा क्रमांक ३६
विषय - कवितेच्या जगात
*मनास उभारी*
आला सहज विचार
घ्यावा आनंद वेगळा
जावे जगी कवितेच्या
रस चाखण्या आगळा
शब्द झरता दिसती
कवी हृदयीचे भाव
दिसे नवरस त्यात
दावी अंतरीचा ठाव
वाहे भावनांची नदी
कवितेच्या जगातूनी
जसे भाव उमटती
वाहे त्या त्या रसातूनी
भाव दाविते शौर्याचे
स्फूर्ती देण्या सैनिकास
तर भक्ती रस-भाव
भाव भोळ्या त्या भक्तास
कवितेचे जग पहा
देते आनंद मनास
मनी न राखता खंत
करी उत्साही जनास
मिळे कवितेच्या जगी
मानसिक सुख भारी
सहजची विहरता
येई मनास उभारी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
माझी लेखणी सप्तरंगी=3
विषय- (२) कवितेच्या प्रेमात
येता विचारांचे वादळ
गूज मनीचे सांगू कसे
मम भावनांना दावण्या
हाती लेखणी घेत असे
झरे लेखणी झरझर
देत शब्दांना आकार
खेळ चालतो शब्दांचा
होते कविता साकार
छंद जीवाला जडला
सखी झाली लेखणी
नित्य नेमाने करी मदत
झाली सखी ती देखणी
नकळत कवितेच्या प्रेमात
विचार येती मनात
डौलते सुमन पाहूनी
ओळी झरती क्षणात
रोजचेच झाले आता
लेखणी स्फुरते सहज
देता शब्दही कुठला
विचाराची नुरते गरज
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कल्याण डोंबिवली महानगर 2
जागतिक कविता दिन निमित्त
विषय - (३)काव्य म्हणजे जीवन
शब्द झरती काव्यातूनी
सुख दुःख भावनांचे
वाहती जीवनी ओघळ
जीवन असे कविता
शब्दांनी भरते ओंजळ
नवरसाने परिपूर्ण
असे जीवनाचे काव्य
कधी खंत तर मोद
तरी करावे सदा सुश्राव्य
जीवन असते गाणे
नसे निरंतर रडणे
निशे नंतर उषःकाल
नकोच मनी ते कुढणे
वीर भक्ती शांत विरह
नवरस युक्त जीवन
रमावे आनंदाने सदैव
घेत धडे मनोमन
काव्य मय जीवन जगता
येता भाव मनी दाटूनी
जशी लाट विरते किनारी
शब्द झरती काव्यातूनी
वैशाली वर्तक
सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित
जागतिक कविता दिना निमित्त
विषय -- ४ mच्या
तिचे गुण गाण्याची नुरली गरज
वैशाली वर्तक
अहमदाबाद
(६) *माझे लेखन
करिते लिखाण मी नेमाने
मज मिळे आत्म समाधान
माझ्या मनीचे भाव उमटे
मानते मी शारदेचे वरदान
सहज घडते लिखाण
जसा मिळता विषय
करुनिया विचार मंथन
घेते ध्यानी आधीच आशय
कधी लेखणी रंगवी शब्द
प्रबोधन वा जपण्या संस्कृती
तर कधी महत्त्व आरोग्याचे
पण लिखाण ही झालीय प्रवृत्ती
माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
सुंदर कसे ठेवावे पर्यावरण
मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे
देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना
सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित
जागतिक कविता दिना निमित्त
विषय -- बयो कविते.....
कविते तव प्रेमात
तूची माझी खरी सखी
बयो कविते तू देतसे साथ
गुज मनीचे सांगण्या
धरी लेखणीचा हात
तूच केले मज बोलते
तुझ्या मुळे मी झाले व्यक्त
तुझ्या विणा शब्द अधरीचे
राहिले होते ते अव्यक्त
जशी आलीस मम जीवनी
निसर्ग मज खुणावे
संगतीत तुझ्या मी ही
तयासवे हर्षे रमावे
दाविलेस तू सौंदर्य
संध्या समयी नभाचे
खगांची सुंदर नक्षी अन्
जलातील रवी किरणाचे
कवितेच्या प्रेमात नकळत
विचार येती मनात
डौलते सुमन पाहूनी
ओळी झरती क्षणात
रोजचेच झाले आता
तव साकारणे सहज
देता शब्द कुठलाही
विचाराची नुरते गरज
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंंबई प्रदेश वनवी मुंबई जिल्हा
आयोजित
उपक्रम क्र ७२८
काव्य लेखन
विषय - कविता सुंदरी
आहेसच ग खरच
तू कविता सुंदरी
किती नटविती तुज
अलंकारे खरोखरी
कवी मनी गर्दी जमे
अर्पण्या तुज शब्दालंकार
मन धावे शोधण्या सदैव
नवनवीन कल्पना अविष्कार
कधी लाडिक लडिवाळे
तर कधी प्रबोधक वचने
देऊन साज मौलिक
सजवूनी तूजकरवी कथने
बसतेस कधी कधी का ?
रुसूनी अल्लड होऊनी
साथ न देता यमकाची
गंमत पहाते अडूनी
होता साकार तू सुंदरी
लाभे मना समाधान
सादरी करणास तू तयार
शारदेचे लाभो वरदान
वैशाली वर्तक
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक
आयोजित उपक्रम क्रमांक ४३
२१\३\२३
*जागतिक कविता दिना निमित्त*
विषय...जेव्हा ती मनात पिंगा घालते
शीर्षक,,, आणि ती येते शब्द रूपात
होते बसले बागेत
झुळूकेच्या तालावर
पुष्पे होती सुंदर डौलत
भान मी हरपले क्षणभर
पुष्पे कानात सांगती
बघ ती पिंगा घालते मनी
रेखाट ना आमचे रुप
तव विचार काव्यातूनी
मज राहवेना त्या क्षणी
माळ शब्दांची गुंफली
भाव मनीचे झरता
कविता पहा साकारली
एक एक सुमनांचे
दाविले रूप मनोहर
ओविता शब्दांचा गजरा
कविता शोभे खरोखर.
घालता ती पिंगा मनात
बसवेना स्वस्थ पळभर
तिला शब्दभावात सजवता
ती संतोषते हेच खर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच 🇧🇴
आयोजित उपक्रम
जागतिक कविता दिना निमित्त
विषय ..माझी पहिली कविता
शीर्षक... गर्विता
जपलीय मनात मी
*माझी पहिली कविता*
अगणिक जरी रचल्या
तीच ठरली *गर्विता*
केले होते वर्णन तयात
माझ्या बागेतील फुलांचे
एका एका फुलांनी वर्णिले
महत्त्व आपापले स्वतःचे
लिहीली होती कन्येसाठी
भावली तिला अतिशय
सहज केली तिने तोंडपाठ
समजून घेऊन आशय
साध्या सोप्या शब्दात
केली शब्दांची मांडणी
बालभारती पुस्तकासाठी
आली की, तिजला मागणी
खुष झाले मी मनातून
पहिली रचिलेली, कविता सहज
रंगवूनी भावना मनीच्या
गुण गाण्याची नुरली गरज
पहिल्या कवितेची ही कहाणी
रचल्या अनेक कविता नंतर
झाला आनंद उत्सव मनात
पहिल्या रचनेचा आनंद मनी निरंतर
वैशाली वर्तक
अहमदाबाद