काय केला गुन्हा
लागता चाहुल मुलीची
होऊ नकोस ग कष्टी
येऊ द्या मला जन्मास
बघायला ही जीवन सृष्टी
मुलगी म्हणून येणे जन्मा
हा काय गुन्हा होतो खास
झाशी सिंधूताई जिजाऊंनी
घडविलाच ना इतिहास
*काय माझा गुन्हा*
असता आपण कलिका
जाण ठेवा अस्तित्वाची
कशी चालेल समाज मालिका
विविध रूपात वसे नारी
आई,ताई,वहिनी ,भार्या, मावशी
सदा वाहे ममता हृदयातूनी
सर्वच रुपातील *ती*हवी हवीशी
जरी नसली मी वंश दिवा
शिकून दाखवीन मम कर्तृत्व
तुझ्या प्रेमाची ठेवून जाण
सदा पटवीन स्त्री चे महत्त्व
नको घाबरु या जगाला.
कर विचार पक्का मनी.
येउ दे मला जन्माला .
राहीन मी सदा ऋणी.
नाही हो अपराध
जन्मा येणे मुलगी
बदला दृष्टी कोन
करा मनाची सलगी