गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

अभंग..जीवन संसार

सिध्द साहित्यिक समूह 
आयोजित उपक्रम 
अभंग लेखन 

विषय. ...जीवन

                                                  वर्ल्ड व्हिजन टाईम्स मध्ये 

जन्म अन् मृत्यू.  | यातील काळास|
जीवन प्रवास      | वदताती ||

रम्यची तो काळ |. बालपणी असे. |
चिंता कधी नसे. | बालपणी. ||

पुढचा तो काळ |  येतो प्रौढत्वाचा |. 
दावी कर्तृत्वाचा | याच काळी.  ||

संस्कार मिळाले | कर्म हाची देव |
तीच मोठी ठेव. |. जीवनाची ||


जोडीदार सह | आनंदी जीवन |
लाभे मनोमन | जीवनाते ||

वृत्ती समाधानी. | हवी तडजोड. |
संसार तो  गोड | होत असे.  ||

संसारिक सुख |. लाभे प्रपंचाला |. 
आनंद मनाला.|मिळतसे. ||

जीवन जगणे | असे कला छान |
जीवनाची शान | वाढवावी ||

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


अक्षरछंद उपक्रम २
मोठा अभंग 
विषय. संसार 
दि १६\८\२५


फुलावे संसारी   |सुखाचे चांदणे  |
देवाशी मागणे   |सर्वांसाठी.       || १

संसार  म्हणजे  | सुख दुःख खेळ |
 जमवावा मेळ | आनंदाने        ||    २

मातेचे संस्कार   | रहा समाधानी |
 नको अभिमानी |  संसारात.      ||  ३

करण्या  सुखाचा | प्रेमाचा संसार |
ऐका गीता सार    | नित्य नेमे.    || ४

संसाराची चिंता    |असता नवीन |
संसार कठीण.     |  वाटतसे     ||  ५

विण ती प्रेमाची   | जरी दोन  मने |
 भासते न उणे.     |एकमेका.     ||६

सदा ठेवा ध्यानी   | नको कुरघोडी  |.
टिकवण्या गोडी    |संसारात         ||७

मिळे सुख सदा     | हवी वाणी गोड |
करा तडजोड.       | संध्याकाळ      ||   ८

माझिया संसारी   |सुखाचे चांदण  | 
वंदिते चरण         | ईश्वराचे         || ९

वैशाली वर्तक,
 अहमदाबाद

सोमवार, ३१ मार्च, २०२५

ललित लेख.....तुझे असणे.



वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई 


लालित्य नक्षत्र वेल
उपक्रम ललित लेखन 
विषय.... तुझे असणे 

विविध रंगी फुले उमलेली  , कोणते पाहू कोणते खूडू..असे झाले होते मनात.
सारीच नयनरम्य  जणू  स्मित हास्ये स्वागत करीत होती . तयात वसंताचे आगमन झालेले  मग काय विचारता?.सृष्टीला  जराही  उसंत नव्हता उमलण्यात... बहरण्यात.
     हे सारे विचार मनातले बरं का .....मी बागेत फिरत असता आलेले..
खरच काय विविधता फुलांची.... त्यांच्या रंगाची आणि गंध तर विचारुच नका.
मधुनच झुळुक तर खोडकर वारा. माझ्या बटांना. तसेच पदराला उडवत खट्याळ पणे
वहात होता. सर्वत्र निसर्ग फुललेला नटलेला.
      मी निवांत एका बाकावर बसले... तर रंगी बेरंगी फुल पाखरे. या फुलावरून त्या फुलांवर स्वच्छंदे भिरभिरत होते.हे सारे पाहून मला त्या विश्वेश्वराची मनोमनी सय झाली व सहज ओळी ओठी आल्यात

तुझ्या अस्तित्वाचा खेळ
आहे या जगती न्यारा
तूची घडवीशी तोडीशी
जगातील पसारा सारा

   खरय तुझे असणे हेच या सा-या गोष्टी घडवित आहे. तुझे असणे ....तुझ्या अस्तित्वाची जाण मानावीच लागते सर्वदा. कारण तूच  हे नभीचे चंद्र ,सूर्य. तारे .निर्मित केलेस . तुझ्या निर्मित सूर्याने दिन चक्र अविरत चालत  असते. ऋतू चक्र चालते न थांबता ...सृष्टी उजळते प्रकाशित होते.व नवनित बदल होतात.
    तुझ्या असण्यानेच व तुझ्याच कडून मिळणाऱ्या सहज शिकवणीने.  मानव प्रगत होत आहे.  आणि हे देखील तितकेच खरे की तुझ्या संमती शिवाय हा निसर्गाचा खेळ चालणार नाही,व मानवाच्या अस्तित्वाचा मेळ जमणे अशक्य.  किती ही प्रगती केली तरी तुझ्या असण्याची जाणीव सर्वांना आहेच.
     अथांग सागर व त्याच्या उचंबळून येणाऱ्या लाटा... तर.कुठे द-या खो-या ,तर कुठे उत्तुंग शिखरे, तर कुठे वालुकामय जमिनी, सारे सारे तुझ्या असण्याची जाण करविते.
उगा का म्हणतात.   तुच कर्ता आहेस.
वैशाली वर्तक 
अहमदाबाद

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...