: अ भा म सा प मध्य मुंबई समूह 1
आजचा उपक्रम
विषय - हरतालिका 1
व्रत हे हरतालिका
स्रिया मुली करतात
ठेवोनिया सखी पार्वती
महादेवास पुजतात
सोळा पत्री वाहताती
दुर्वा आगाढा नाना सुमने
मनोभावे अर्पताती
पोथी वाचती सु - मने
कथा वाचन करती
दिनभर उपोषण
यथा शक्ती देती वाण
रात्री करती जागरण
लाभो सदैव सौभाग्य
हीच मनो कामना मनी
आराधना शिव शंकराची
स्त्रिया करतात याचक्षणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
[09/09, 5:58 pm] Vaishali Vartak: कल्याण डोंबिंवली महानगर 2
उपक्रमासाठी
2 काव्य - अष्टाक्षरी ओळ काव्य
ओळ - तुझे रुप चित्ती राहो
गणराया गजानना
मुखी राहो तव नाम
महिम्यात नावाच्याच
दिसे सर्व तीर्थ धाम
शुभंकर तू सर्वांचा
बाप्पा वाटे तू आपुला
येता कठीण समय
स्मरताती जन तुला
तुझ्या नामात आनंद
गुण गातो आवडीने
*तुझे रुप चित्ती राहो*
सदा पाहतो भक्तीने
कार्यारंभी तुला बाप्पा
पूजताती भक्तीभावे
तुझे नाम ओठी येता
यश मिळे सर्वा ठावे
होता आगमन तुझे
घर भासते मंदीर
पूजा पाठ भक्ती भावे
दर्शनास मन अधीर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गणेशोत्सव महोत्सव महास्पर्धा
*स्पर्धेसाठी*
भव्य राज्य स्तरिय अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा
3 विषय -- विराजले अधिपती
ओळ काव्य
*आनंद सोहळा*
वेध लागे गणेशाचे
येता भाद्रपद मास
कशी करुया आरास
मनी विचार ते खास 1
स्वागताला खास दारी
रेखाटली ही रांगोळी
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी 2
ढोल ताशे वाजवित
केले स्वागत आनंदे
*विराजले आधिपती*
मन भरले स्वानंदे 3
रुप तुझे पाहुनिया
मन माझे झाले शांत
तूची आहे सुखकर्ता
कसलीच नसे भ्रांत 4
विराजले अधीपती
पाहताच चित्ती ठसे
ऐटदार ते बसणे
मना मनातूनी वसे 5
अधिपती आले घरी
भक्त येती दर्शनाला
वाटे अपूर्व सोहळा
येतो हुरुप मनाला 6
वैशाली वर्तक
शब्दशिल्प कलाविष्कार मंच
आयोजित गणेशोत्सवानिमीत्य दहा दिवसीय
राज्य स्तरिय काव्यलेखन स्पर्धा
4 विषय -- आल्या सोन पावलांनी
*गौराईचे स्वागत*
उसाहाने चैतन्याने
आज भरली सदने
येता गौराई घरात
झाली प्रसन्न वदने
सोनेमोती पावलांनी
गौरी झाल्या घरोघरी
दृष्ट काढण्याची घाई
माय उभी आधी दारी
होता आनंदे स्वागत
बसविले मखरात
दिला मानाचा तो विडा
सुख लाभते मनात
लावुनिया धूप दीप
केली आरती भक्तीने
रूचकर पक्वांनाचे
ताट भरु नैवद्याने
देऊ सौभाग्याची लेणी
सवाष्णीचा मानपान
ओटी खणा नारळाची
करु तियेचा सन्मान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
.
[12/09, 5:12 pm] Vaishali Vartak: *स्पर्धेसाठी*
सावली प्रकाशन समूह आयोजित
राज्यस्तरिय अभंग लेखन स्पर्धा
5 विषय -- *तूच सुखकर्ता*
तूची असे कर्ता । तूची करविता ।
तूची सुखकर्ता । श्रीगणेशा ।। 1
कार्यारंभी तुज ! प्रथम पुजितो l
तुलाच स्मरतो ll विध्नेश्वरा l 2
सर्व व्यापी तूची l तूची लंबोदर l
ज्ञानाचा सागर l तू ओंकारा ll 3
राहो आम्हावरी l तव कृपा दृष्टी l
नको करु कष्टी l सुखकर्ता ।। 4
*तूची सुखकर्ता* । तारी अवदसा
दावी कवडसा । तूचीआता 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद ( गुजरात)
शब्दशिल्प कलाविष्कार संघ आयोजित
गणेशोत्सवानिमित्त दहा दिवसीय राज्यस्तरिय
काव्य लेखन स्पर्धा क्रमांक 16
विषय - देवा तुझ्याच चरणी
6 अष्टाक्षरी देवा तुझ्याच चरणी
श्रीगणेशा मिळे मज
सुखानंद अविरत
*देवा तुझ्याच चरणी*
अनुभवे मी खचित
दूर होती सा-या चिंता
जाते शंकेचे मळभ
मिळे मना सुख शांती
कामे होतात सुलभ
येता प्रसंग कठीण
तूच असता तारक
धाव घेती तुझे पायी
तूची विश्वाचा पालक
घेता तव नाम ओठी
दुःखे होती दूर सारी
देवा तुझ्याच चरणी
भासे मज जादू न्यारी
देवा तूची विध्नहर्ता
आले मी तव चरणी
मज दे तव आशीष
हीच करिते मागणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अष्टविनायक अभंग समूह
*स्पर्धेसाठी*
गणेशोत्सव महोत्सव महास्पर्धा
शब्दरजनी साहित्य समूह ,
आयोजित भव्य राज्यस्तरिय
अभंग लेखन स्पर्धा
विषय - अष्टविनायक
शीर्षक -
अष्टविनायक । जागृत ठिकाण।
देशभर मान । असे त्याचा ।। 1
वाम बाजू सोंड । मोरेश्वर मूर्ती ।
देशातून किर्ती । प्रथमेशा ।। 2
दुजा गणपती । प्राप्त करी सिध्दी ।
मांडीवर रिध्दी । गणेशाच्या ।। 3
बल्लाळ भक्ताने । केली भक्ती भावे ।
थांबविला गावे । विध्नेशाला ।। 4
महाडचा चौथा । अष्ट विनायक ।
समृद्धी दायक । वरद तो ।। 5
गिरीजा आत्मक । आला चतुर्थीला ।
बटु प्रगटला । गजानन ।। 6
अष्ट विनायक । रुपे गणेशाची ।
स्वयंभू रूपाची । मानीताती ।। 7
वैशाली वर्तक
स्वराज्य लेखणी मंच
गणपती महोत्सव महा उपक्रम
विषय ..पूजा करू मनोभावे
कार्यारंभी तुला बाप्पा
पूजताती भक्तीभावे
तुझे नाम ओठी येता
यश मिळे सर्वा ठावे
होता आगमन तुझे
घर भासते मंदीर
पूजा पाठ नित्य चाले
मन दर्शना अधीर
विराजले अधीपती
पाहताच चित्ती ठसे
ऐटदार ते बसणे
मना मनातूनी वसे
अधिपती आले घरी
भक्त येती दर्शनाला
वाटे अपूर्व सोहळा
येतो हुरुप मनाला
*करु पूजा मनोभावे*
दिन रंगे भजनात
आता एकची मागणे
खंड नको स्मरणात
तव नामाचा महिमा
आहे जगती अपार
सुखदाता दुःख हर्ता
तूची विश्वाचा आधार
वैशाली वर्तक