अत्तर
अंतरीच तुझ्या ,
वसे परिमलाची गंगा ,
वाहे प्रफुलता ,
चोहीकडे .
अनेक गंधित,
पुष्प परिमल ,
असती तव हृदयी
विराजमान .
तव सुगंध देई
प्रसन्नता जनास ,
जैसे सूर देती
आनंद कष्टी मनास.
असोनि पत्र फुल,
विना तव गंधित धूप ,
पूर्तता न भासे
देव पुजे
परि, पर्जन्य धारा,
बरसती धरा ,
अत्तरा तव गंध ,
भासे फिका .
मातीचाच गंध ,
करी दाही दिशा धुंद ,
धरतीच्या हृदयी
असे गंध अत्तराचा .
अंतरीच तुझ्या ,
वसे परिमलाची गंगा ,
वाहे प्रफुलता ,
चोहीकडे .
अनेक गंधित,
पुष्प परिमल ,
असती तव हृदयी
विराजमान .
तव सुगंध देई
प्रसन्नता जनास ,
जैसे सूर देती
आनंद कष्टी मनास.
असोनि पत्र फुल,
विना तव गंधित धूप ,
पूर्तता न भासे
देव पुजे
परि, पर्जन्य धारा,
बरसती धरा ,
अत्तरा तव गंध ,
भासे फिका .
मातीचाच गंध ,
करी दाही दिशा धुंद ,
धरतीच्या हृदयी
असे गंध अत्तराचा .