रान
निसर्ग किमयेने,
मेघांच्या वर्षावाने,
धरणी अंकुरली,
सृष्टी हिरवळली . .
हिरव्या सृष्टी त
फोफावली राने, राने तर असती,
निसर्ग संपदेची वने.
कधी कडे कपारीत
कधी दरी खो-यात ,
कधी नदी तटावर
कधी पर्वत पठारात
रानात उमलती
मोहक रान फुले
तयातच दडती ,
मधुर रान फळे .
फुलांचा या, गंध ,
अन फळांचा आस्वाद , घेण्या मनमुराद ,
हिंडावे रानमाळ .
पिकलेल्या फळांचा,
सडा विखुरलेला भासे , प्रभूची ही किमया ,
मनास मोहविते.
रानातच दडला,
आजीचा बटवा
वनौषधी मुळ्या
जीवन देती आपणा
पण खंत मनी दाटे
-हास होतसे रानाचा,
नका रे ! राने नासू ,
येतील डोळ्यात आसू
होतील फुलांचे आसू .