बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

विधीलिखीत


विषय - विधिलिखित           13/7/2020


सामान्यतः असे  वदती जन
जे होते ते असते विधी लिखीत
मग कशाला करायचे प्रयत्न 
व्हायचे ते होणार हे...  खचित

कधी कोणास मिळते चिमूटभर 
तर कोणास मिळते ओंजळभर
ते तर असते विधीलिखीत फळ
तयासाठी लागते सत्कर्माचे बळ

म्हणती वृषभ रास असे भाग्यवान
चुकले का तयांना दुःखाचे पहाड
देवत्व पावूनी पण, कृष्ण अन् रामाला
सुटली नाही  दुःखाच्या नशिबाची पाठ

नैसर्गिक  आपत्तीत दगावतात माणसे
देवाच्या कृपेने तरली जाती लहान अर्भके
तिथे म्हणावे खेळ  विधी लिखीताचा
न करिता सायास जीव वाचविण्याचा

घडायचे ते घडणार ते नाही चुकणार
विश्वास हवा बाहुवर नको हस्त रेखांवर
अन् ठेवावी सदा दृढ श्रध्दा देवावर
मग विधी लिखीताची होते कृपा दृष्टी  आपणावर



वैशाली वर्तक
नोंदणी क्रमांक 189
अहमदाबाद 
गुजरात  स्टेट
8141427330

संयम. गुण स्वभावाचा

कमलविश्व राज्यस्तरिय स्पर्धा साहित्य समूह
आयोजित
मासिक भव्य राज्यस्तरिय काव्य स्पर्धा
विषय     संयम
      *गुण स्वभावाचा*

  संयम  हवा जीवनी
वागण्यात बोलण्यात
आणावा तो अंमलात
सुखी होतो जीवनात

रोजच्या जीवनाला
लावा वळण संयमाचे
म्हणजे जगण होते 
सदोदित नियोजनाचे 


नदीला असतो काठ
सागरास  असे किनारा
त्यामुळे वसतात नगर
  अन  मानवास निवारा

मर्यादा दिसे निसर्गात 
म्हणूनच चाले ऋतुचक्र
जरा होता असमतोल
होते निसर्गाची  दृष्टी वक्र


 ताबा हवा मनावर
 त्यालाच  संयम म्हणती
असे  तोची महत्वाचा 
सुखी होण्या जगती
  

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

असाच यावा पहाट वारा \उनाड वारा

कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित
दशपदी काव्य
विषय - असाच यावा पहाट वारा

सोनसळी किरणांची उषा
देते मनास नवीन आशा

थंड वा-याची मंद झुळुक
करी सदैव मना उत्सुक


पक्षी करीती किलबिलाट
करी प्रसन्नतेची पहाट

मंद स्वरात ऐकू भुपाळी
मंगलमय मन सकाळी

असाच यावा पहाट वारा
मरगळीस नसेची थारा

अनुभवावी अशी पहाट
पहावा तिचा अनोखा थाट


वैशाली वर्तक

शेतकरी साहित्य मंच
आयोजित उपक्रम क्रमांक ६८
४\१\२३
चारोळी आठोळी लेखन
विषय ..उनाड वारा
  
फिरत होते रानमाळी
करी उल्हासित थंड वारा
देई स्फुर्ती तना मनाला
आनंददायी  निसर्ग सारा 

डुलत होती रोपे ,तरु
 वा-याच्या लयीत तालात
भासे पर्णे वाजवी टाळ्या
मन गुंतले  रम्य निसर्गात

क्षणात आला उनाड वारा 
पहाता पहाता सुसाट झाला
खट्याळ दावी खट्याळपणा
कशी सावरू मी पदराला

मन पडले विचारात
थंड मंद झुळूक कशी
वाटे सदा हवी हवीशी
कानी कुजबुजते जशी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...