उपक्रम
ओळ काव्य
विषय - श्वास माझ्या अंतरीचा
मनी सदा एक ध्यास
तुझ्या नाम स्मरणाचा
सदाकाळ विठुराया
श्वास माझ्या अंतरीचा
ध्यानी मनी स्वप्नी मज
तूच दिसे सदाकाळ
कधी नाही चुकविली
वारीतील ती सकाळ
तूच असे पांडुरंगा
श्वास भक्त मंडळींचा
सांग आता तू उपाय
पंढरीच्या दर्शनाचा
स्मरु तुज चिंतनात
नाचू गाऊ भजनात
श्वास माझ्या अंतरीचा
पूजू तुजला मनात
वैशाली वर्तक 13/6/20
कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम
विषय..हसले मनी चांदणे
मना जोगते होता काम
आनंदले माझे मन
चकाकत्या उन्हात पण
भासे फुलले नंदनवन
भाव मम अंतरीचे
तू सदैव जाणिले
सहज देत हात हाती
सप्त रंगी रंगविले
सहवास तुझा माझा
प्रीत गंध पसरला
एकमेका देत साथ
संसार ही फुलवला
झाले मनाने संतृप्त
काही न उरे मागणे
हसले मनी चांदणे
हेची देवास सांगणे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
हृदयाच्या स्पंदनी तू
सिध्द साहित्यिक समूह
उपक्रम ओळ काव्य लेखन
ओळ..हृदयाच्या स्पंदनी तू
शीर्षक... श्वास तू अंतरीचा
मनी सदा एक ध्यास
तुझ्या नाम स्मरणाचा
सदाकाळ विठुराया
श्वास माझ्या अंतरीचा
हृदयाच्या स्पंदनी तू
तूच दिसे सदाकाळ
ध्यानी मनी स्वप्नी वसे
करी आनंदी सकाळ
तूच असे पांडुरंगा
श्वास तू भक्त जनांचा
तुझ्या दर्शनाने मिळे
स्वर्ग सुख आनंदाचा
स्मरु तुज चिंतनात
नाचू गाऊ भजनात
हृदयाच्या स्पंदनी तू
पूजू तुज हृदयात
वैशाली वर्तक
अहमदाबाद