मागते मी 17/8/18
सहज आला विचार मनीं
काय मागावे तुज कडूनी
कितीही दिधले मजलागी
अंतच नसे त्या हव्यासाशी
तरी मागणे मागते तुजपाशी
शक्तीच दे तू सदा मजला
येता कधी प्रसंग बाका
हाका येती मदत करण्या
मातृभुमीची लज्जा राखण्या
शक्ती मागते मी तुजला
जग रहाटे आहे सदा विकट
भरलेले मोह मायाचे दृष्ट साप
क्षणा क्षणाला ग्रासती मनास
न गुंतण्या त्या मोह पाशात
सुबुद्धी मागते मी तुजपाशी
तूच असशी करिता करविता
तू आहे पाठीशी सदा-सर्वदा
तुझ्यावरील ह्या विश्वासाला
कधी न डगमळू दे माझ्या मना
दृढविश्वास मागते मी तुजला
न मागता सर्व दिधले मजलागी
न उरते आता काही मागण्यासी
तरीही मागणे उरतेच बाकी
न पडो तुझा विसर कधी काळी
मागणे मागते मी तुजपाशी
वैशाली वर्तक
सहज आला विचार मनीं
काय मागावे तुज कडूनी
कितीही दिधले मजलागी
अंतच नसे त्या हव्यासाशी
तरी मागणे मागते तुजपाशी
शक्तीच दे तू सदा मजला
येता कधी प्रसंग बाका
हाका येती मदत करण्या
मातृभुमीची लज्जा राखण्या
शक्ती मागते मी तुजला
जग रहाटे आहे सदा विकट
भरलेले मोह मायाचे दृष्ट साप
क्षणा क्षणाला ग्रासती मनास
न गुंतण्या त्या मोह पाशात
सुबुद्धी मागते मी तुजपाशी
तूच असशी करिता करविता
तू आहे पाठीशी सदा-सर्वदा
तुझ्यावरील ह्या विश्वासाला
कधी न डगमळू दे माझ्या मना
दृढविश्वास मागते मी तुजला
न मागता सर्व दिधले मजलागी
न उरते आता काही मागण्यासी
तरीही मागणे उरतेच बाकी
न पडो तुझा विसर कधी काळी
मागणे मागते मी तुजपाशी
वैशाली वर्तक
Borderless panther समूह
एक दिवस कवितेच्या सदरात
28/6/25
*दे हेची वरदान*
सहज आला, विचार मनीं
काय मागावे, मी तुजपाशी
कितीही दिधले, मजलागी
अंतच नसे , त्या हव्यासाशी
तरी मागतेच , तुजपाशी. 1
शक्तीच दे तू ,सदा मजला
येताची कधी, प्रसंग बाका
मातृभुमीची, लज्जा राखण्या,
मदतीच्या कानी ,येता हाका
शक्तीच ,मागते तुजपाशी 2
जग रहाटे , आहे विकट
षडरिंपू , भासे जणू साप
क्षणा क्षणाला, मना ग्रासती
सोडवावा , तूची भवताप
सुबुद्धी , मागते तुजपाशी. 3
तूची असे , कर्ता करविता
तुझ्यावरील , ह्या विश्वासाला,
मन देतसे , सदा दुजारा
. ढळु न द्यावे ,मनोबलाला
निष्ठाची ,मागते तुजपाशी 4
न मागता , दिले मजलागी
न उरतेची, मागण्या आता
तरीही मागणे, आहे बाकी
नको विस्मरण , काळ जाता
हे दान , मागते तुजपाशी. 5
वैशाली वर्तक
.अहमदाबाद