शनिवार, २२ मे, २०२१

गुरु

 अ भा मसा परिषद समूह 02

विषय -- गुरु 

गुरु


जीवनात जन्मता आई

 प्रत्येकाचा पहिला गुरु

बोट धरुनी जग दावीते

गुरु पदाची सुरुवात सुरु


माय संगे बाबाही  गुरु

घडवी जीवन कर्तृत्वान

जीवनात बाबांचे महत्त्वाचे 

असतचे  खूप योगदान


शाळेत जाता शिक्षक 

हे तर खरेचची देव

देऊन ज्ञानाचा प्रकाश 

दिली सर्वात मोठी ठेव


तसा निसर्ग पण गुरु

भरलेला ज्ञानाचा घडा

जीवन आहे खडतर 

रोजच्या रोज शिकवी धडा


नदी पहा देते शिकवण

सदा पुढे रहाणे चालत

येवो कितीही संकटे

तिच्या सम रहा वाहत


जन्मा पासून सुरु नाते

गुरु शिष्य परंपरेचे

लहान असो मोठेपणी पण

घ्यावे पाठ शिकण्याचे



वैशाली वर्तक


मायबाप माझे  गुरु

सावली प्रकाशन समूह आयोजित 

गुरु पौर्णिमा  निमित्य काव्य लेखन

उपक्रमासाठी

विषय -- मायबाप माझे गुरु


          *अनंत उपकार*


जीवनात  जन्मता आईप्र

   प्रत्येकाचा

  पहिला गुरु

बोट धरुनी जग दावीते

गुरु पदाची सुरुवात सुरु


माय संगे बाबाही  गुरु

घडवितो जीवनी कर्तृत्वान

जीवनी बाबांचे महत्त्वाचे 

आहे  खूप  मोठे योगदान 

 

 दिले आईने धडे संस्काराचे

 बाबा उभे पाठी  खंबीर

लावली जीवनी शिस्तता

वाटे व्यक्तीमत्व गंभीर


होता चुका मायबापांनी

घेतले पदरात पाडसाला

कधी रागावून समजावून

घडवीले  आपुल्या बालकाला


आहे संगे मायबाप

म्हणूनच खरे भाग्यवान 

गेल्या जन्माची पुण्याई

झालीय मी पुण्यवान


कितीही मोठे  झालो तरी

मायबापांना वाटे लहान

अनुभवाचे त्यांचे बोल

जीवनी असती महान

वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

"



माझी लेखणी - काव्य सम्राट विषय -- गुरु माहिमा किती वर्णावा महिमा गुरू जनांचा जगती ज्ञान देऊनी करिती सुज्ञ ज्ञानी बनवती करु तयांना वंदन गुरु देवाच्या समान केले यशस्वी जीवनी त्यांचे कार्यची महान वेळ प्रसंग पाहूनी देती मनास उभारी यश मिळवण्या साठी मेहनत त्याची भारी व्हावी प्रगती शिष्याची हीच असे मनी आस तयासाठी दिनरात लागे जीवास तो ध्यास देती गुरु पौर्णिमेला गुरु दक्षिणा तयास ऋण तयांचे स्मरण्या दिन असे हा खास वैशाली वर्तक अहमदाबाद

चहा जागतिक दिना निमित्त


सुचत नाही वाटले तरी

हवा तो  विचार सुचण्यास


येते आठवण चहाची

 जमता ढग आकाशी

चहा आल्याचा आठवे

 वाटे मिळावा चुटकी सरशी


हाती असता चहा

गप्पा येतात रंगात

आठवणीं येतात जुळून

जुन्या काळच्या मनात



रस्त्याच्या  चहाच्या  टपरीवर

चहाची मजा येते  खरी

फक्कड चहाचा घोट

जोडीला देतो अनेक खबरी



उगाच नाही  म्हणत

चहास पृथ्वीवरील  अमृत

येता जाता प्यावा चहा

प्राशन करावे जठरामृत


वैशाली वर्तक

अहमदाबाद





मंगळवार, १८ मे, २०२१

अष्टाक्षरी शब्द शिल्पकार


शब्दसेतू साहित्य  मंच आयोजित  प्रथम वर्धापन दिनानिमित्त
*एक कविता एक चारोळी काव्य लेखन स्पर्धा*
 विषय - *शब्दशिल्पकार*
काव्य प्रकार --  अष्टाक्षरी 

   *साहित्यिक*

जसा घडवितो मूर्ती 
 शिल्पकार मनोहर
 भाव  दावी शिल्पकृती
 जणू भासे खरोखर  

जुळवूनी शब्द शब्द
होते तयार लिखाण
असो मग गद्य पद्य
शब्दांचीच असे खाण

   
मुल्य सर्वदा शब्दांचे
जाणे *शब्द शिल्पकार*
 शब्द ओवितो उचित 
 करी   तो शब्दाविष्कार

शब्द शिल्पकार सदा
देतो मनास उभारी
जपणूक संस्कृतीची
काम त्याचे सदा भारी

शब्द शिल्पकारांपैकी
वाल्मिकींचे रामायण
 जन  ज्याचे  करितात
 सदासाठी पारायण

मला जडलाची छंद
शब्द गुंफण्याचा मनी
मिळे स्फूती मम  मना
होते काव्य त्याच क्षणी


वैशाली वर्तक.
अहमदाबाद 



चारोळी

शब्दशिल्पकार


नीट नेटक्या शब्दांची
पहा सुरेख बांधणी
शब्दशिल्पकारे केली
चार ओळींची मांडणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
शब्द करतात जादू
     दावी तयांची कमाल
     शब्द गुंफता तयार 
 पहा सुंदरशी माळ 

 मनातील भाव झरे 
 उतरती साहित्यात 
 शोभे गद्य पद्य रुपे 
 शब्द येती संवादात 

 करा मोजून मापून 
शब्द सदैव वापर 
 नको फापट पसारा 
उगा नकोच खापर 

 शब्द करीतात जादु 
 असे विचार सोबत 
 पहा होतेची तयार
  छान असे मनोगत 

 जशा कल्पना सुचता 
मनी शब्द उमलता
  शब्द फुले पहा फुले
  दिसे कशी बहरता

          शब्द करुनीया जादु
  हास्य करुण भावना
 भाव अद्भुत दाखवी
 पूर्ण होती मनो मना 

 वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

मंत्र जगण्याचे

 यारिया साहित्य  समूह  आयोजित 

उपक्रमासाठी

  विषय -- *मंत्र  जगण्याचे*


जन्म मानव  लाभला

करु सोने सर्स्वस्वाने

जगूया जीवन आनंदाने

दिधले सुंदर  आयुष्य  देवाने



सदा राहू समाधानाने

भासे सुखची सुख सदा 

मंत्र  पहिला हा मनी राखता

दुःख कधीच वाटेना कदा


ठेवा सकारात्मक भाव

चाले सुखदुःखाचा खेळ

सुख उद्या येईल दारी

आनंदाचा जमेल मेळ


नको मैत्री दुर्जनांची

असावी जीवनी सुसंगती

व्यसनाधीन नसावे कधी

जीवन -हास होतो जगती


अती लोभ नाशास कारण

हव्यास नकोची मनात

देवावर दृढ ठेव देवावर

देव वसे आपुल्या अंतरात



सर्वतोपरि नसे कुणी सुखी

आठव शिकवण ती संताची

नको ठेवू भेद  भाव मनी

भावना ठेव  जन कल्याणाची 


वैशाली वर्तक


अहमदाबाद

सहाक्षरी / पहिली नजरा ./..भेट तुझी माझी/ जीवन वाट

 उपक्रम

षडाक्षरी काव्य

विषय- पहिली नजर

शिर्षक- तुला पाहताच


दृष्टीस पडली
मनात भरली
माझी तू व्हावी
आसच धरली

पहीली नजर
काय जादुभरी
काही समजेना
मला क्षणभरी

लागले जीवास
वेडच मजला
शोधणे बहाणा
भेटण्या तुजला

योगायोग झाली
भेट अवचित
उमजेना शब्द
मला कदाचित

साधिला संवाद
कटाक्षे क्षणिक
नकळत मीही
झालो भावनिक

अजुन स्मरतो
पहिला तो स्पर्श
झालेलो बेधुंद
मनातला हर्ष

पहिलीच भेट
स्मरते मनात
तुझ्यात गुंतलो
कळले क्षणात

वैशाली वर्तक
20/4/2020


विषय  ---   दोन घडीचा डाव

जन्म आणि मृत्यू 
यांना जोडण्याचा         
दोनच घडीचा
 डाव जीवनाचा       1
बालपण काळ
 सदा रम्य  असे
कसलीही चिंता
त्याकाळात नसे   2

मायबाप हेच
 देती सदा सुख
सोसुनिया कष्ट
दूर करी दुःख    3

येतो काळ  पुढे
मग   प्रौढत्वाचा
ऊन सावलीचा
दावी  कर्तृत्वाचा  4
 सत्कर्मा करिता
  वसे खरा देव
 आयुष्यात मोठी
 असे तीच ठेव    5

 करा तडजोड
 संसारात थोडी
वाढवी जीवनी 
सदासाठी गोडी    6
 
जीवनाचे  हेची
ध्यानी ठेवा सार
जगण्या आनंदी
करावा विचार     7

.....वैशाली वर्तक  




कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित उपक्रम
२९\७\२३
विषय प्रीत मैत्रीतली 


प्रीत मैत्रीतली 
दोनही जीवात
वाहे प्रेम झरा
सदैव मनात 

नसे दुजाभाव
 मदतीस साथ
 प्रेमळची भावे
घेत हाती हात

प्रीत मैत्रीतली
दावीती महती
कृष्ण सुदाम्याची
सारेची जाणती

नातेच  मैत्रीचे 
असतेच गोड
कदा दोन मनी
 दिसेनाची खोड

सर्वां  मिळो सखा
द्रौपदीचा  हरी
प्रीत मैत्रीतली
मोद जग भरी

वैशाली वर्तक
अहमदाबाद


तुज विना कसे जगु. /तुझ्या विना .... तू तेथे मी

नाम तुझे सदा ओठी
तव स्वप्नात जगते
तुजविना जगणे हे
मज निरस भासते


गंध तुझ्या  प्रीतीचा
दरवळे अंतरात
रोज वसंत फुलता
अनुराग   हृदयात

कशी साहु मी विरह
कैसे कंठु दिन एक
जगु कशी तुझ्या  विना
दिन उदास प्रत्येक 

दिसे तव मूर्ती  सदा
तर कळे हा अभास
वाटे तू आहे समीप
ध्यानी मनी तुझा ध्यास

भासे वैरीण ही रात
जग निद्रेच्या कवेत
राहे मी तळमळत
आठवांच्या  समवेत

जगु कशी तुझ्या विना
कसा करू   मी निग्रह 
 सांग सखया मजला
कसा साहू मी विरह

वैशाली वर्तक


अभामपसा कोप्र समूह 
आयोजित 
उपक्रम 
विषय - तुझ्या  विना

 देवा तुची कर्ता, तूची करविता
तुझ्या  विना नसे,  आम्हाला आधार
सारी सृष्टी  विसंबित तुजवरी
तूची संभाळीतो जगताचा भार         १

तूची दिधलेस सुंदर  आकाश
तयात निर्मीले सूर्य चंद्र तारे
तव कृपा प्रसादे घडती ऋतु
तुझ्या  विना कुठले आनंद वारे           २


 जल असे जीवन जलचरास
 नदी जलाशय सुंदर  विश्वात
तुझ्या  विना कशी बहरेल सृष्टी 
कशी डौलतील पिके शिवारात           ३

आहे तुझी कृपा दृष्टी जगावरी
 होते सारेची नित्य जीवन शक्य
 आम्ही बालके तुझीच लेकरे
तुझ्या  विना हा विचारचीअशक्य

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



विषय - तू तिथे मी   २८/१/२२
    *आस मनीची*

सुमनांचा गंध कधीच
 दूर, न होई खचित
तैसे *तू तिथे मी*
रहाणार सदोदित

आहे तसेच आपले 
दोन तने एक मन
विसर  पडे  ,  न कदा
 जीवा एकही क्षण

रहावे तू मम संगती
असेच वाटते मनात
साथ हवी  निरंतर
 हीच आस अंतरात     3

येते नभी चांदणी
वाट पहाते चंद्राची
तैसे *तू तिथे मी*
असणार सदाची   4

  कशी जगेल मासोळी
  जला विना पळभर
 तुझ्या अस्तित्वाने
   दिसे  दिशा खरोखर   5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

नशा तुझ्या प्रेमाची

यारिया साहित्य  कला समूह
विषय - नशा तुझ्या  प्रेमाची

नशा तुझ्या  प्रेमाची
*निसर्गा*  वसे मनात
होताची सकाळ मी
येते तुझ्या  सानिध्यात

किती आनंद मिळतो
नभी पाहूनी आदित्य
आनंदाने पुलकित
होते माझे मन नित्य

हळुवार पसरे पसारा
रवी सोनसळी किरणांचा
होई लाजत  प्रभात
क्षण प्रफुल्लित होण्याचा

नशा सृष्टीच्या प्रेमाची
चढे वसंत ऋतु येता
पहा कशी धरा सजली
नशा चढते  प्रेमाची आता

हरएक ऋतु  असे 
आगळाची अवर्णनीय
किती करावे गुणगान
नशा तव प्रेमाची रमणीय

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...