शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

अहंकार अभंग रचना


साहित्य  स्पर्धा समूह  आयोजित
अभंग लेखन स्पर्धा 
विषय -- अहंकार 
स्पर्धे साठी

अभंग रचना
विषय - अहंकार


नको आणू कदा. । 
मनी अहंकार       । 
वाईट विकार       । 
असे तोची        ।।          1

राहो मनी भाव  । 
इदम  न मम      । 
नकोची अहम    । 
कदा काळ   ।।           2

नसावे  मनात  । 
स्वतःचे  मी पण । 
हेच निरुपण  । 
जीवनाचे  ।।              3

  स्वभावात रीपू  ।  
असती ते सहा   । 
सारुनिया पहा ।  
अहंकार   ।।      4

असता संतोष । 
मी पण ते  दूर!। 
भरुनिया ऊर
येत  असे    ।।    5


रहा समाधानी  । 
अहम   नको मनी  ।  
मोद सदा क्षणी  ।। 
मिळतसे ।।            6

सशाचा तो गर्व । 
सदा ठेवा ध्यानी । 
राहू द्यावा मनी । 
जगताना  ।।      7


वैशाली वर्तक

सांजवेळी( दशपदी काव्य ) दिलेल्या चित्रावर /. सांजवात

जाता जाता रवीराजाने घातले केशराचे सडे  
आसमंत खुलला सुंदर  वाटे पाहू कुणीकडे

सांजवेळी भेटता सखया उर भरे आनंदाने
ओढ जिवाला लागलेली तृप्त जाहली भेटण्याने

सांजवेळ असतेच अशी ओढ लावते  जीवाला
भेटताच जीवलग, मिळे सदा आनंद मनाला

घेउनी हात हाती  आळवीती दोघे प्रेम  गीतांना
राहू सदा जवळी असे साथ देत  एकमेकांना

रवी राजा स्वतः पाही प्रतिबिंब  ते जलाशयात 
पाहूनीया  ते हरखले दोघे  क्षणभरी मनात

वैशाली वर्तक


सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित आठोळी लेखन 
विषय. सांजवात

दाही दिशा  हळदीच्या
संधी प्रकाशे धुंदल्या
मंद थंड पवनाने
तप्त झळा निवळल्या.

अर्ध्यदान देती जन 
दोन्ही करांना जोडूनी 
*सांजवात* वृंदावनी
मंद प्रकाश उजळूनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गीत आई म्हणते ...बालकाव्य


काव्या स्पंदन 02 राज्य स्तर
उपक्रम
बालगीत काव्य
विषय- आई म्हणते

आई म्हणते  (  बाल काव्य)
वर्ण 14 यति 7

आई म्हणते तूची, भासे  नभीचा तारा    
तुज वीण भासतो, मज बाकी  पसारा
     म्हणे  मजला सदा ,माझा गोड गोडुला
      सदा मज साठी तो, असे माझा सानुला  
     भरलास तूची या , जीवनी मोद  सारा  
      आई म्हणते  तूची , भासे नभीचा तारा           1
  
घेउनी जाते सदा ,  मैदानात खेळाया
देते मस्त मस्त ची, खाऊ सदा  खावया     
सोनुला माझा आहे , मला सदाची प्यारा
आई म्हणते तूची ,भासे  नभीचा तारा                  2

    सहज पुरविते, ती लाड सोनुल्याचे
    सदाची तिला वेड ,माझे पापे घेण्याचे
     मज होता तो बाऊ , घालतेसे ती वारा
     आई म्हणते तूची, भासे  नभीचा तारा                3


वैशाली वर्तक

चित्र काव्य. गजरे विकणारा

शब्दरजनी साहित्य  समूह  आयोजित 
स्पर्धेसाठी चित्र  काव्य


रोज निघे पहाटेला
 फुलवाया शिवाराला
घाम गाळता मातीत
कष्ट येती ते फळाला

केले जीवापाड  कष्ट
फुलविले ते शिवार
आली  कारभारीण ती
घेऊनिया कांदा  भाकर

प्रेमे भरवी धनीला
सदा प्रेमाचा तो घास
मिळे मनी आनंद
वाटे धनी माझा श्वास

रमले दोघे बांधावर
एकमेका देता भाकर
गुण्या गोविंदाने खाती
 वाटे नाही कुणाचे चाकर

वैशाली वर्तक

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

भाऊराया ( गीत रचना )

भावगीत 
विषय- भाऊराया
स्पर्धे साठी
अक्षर संख्या 16  .यति 8

सय येता माहेराची, आठवतो बंधुराया
सदा दावी प्रेमभाव, बहिणीची वेडी माया ....  धृव पद

राखी बांधता भावास , जरी असे तो लहान      
उभा रहातो पाठीशी,   बंधु प्रेम  हे महान         
बालपणी दंगा मस्ती, करी हाच भाऊराया
सय येता माहेराची ,  आठवे तो बंधुराया             1


येता भाऊबीज सण,  धाव घेई भावापाशी
त्याच्या प्रेमळ मायेची , नाही तुलना कोणाशी
तया सम बहिणीची , सदा भावावरी माया
सय येता माहेराची, आठवे तो बंधुराया     2


कृष्ण भाऊ द्रौपदीचा, पहा कसा तिच्या साठी
येता प्रसंग कठीण, राही उभा  सदा पाठी     
बहिणीच्या प्रेमापायी,  पहा तो झिजवी काया
सय येता माहेराची , आठवे तो बंधुराया           3




कोड नं 
RML 227

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

उगवला रविवार

काव्य स्पंदन 02 राज्य स्तर

  **उगवला रविवार**

वाट पहाती लोचने
कधी येणार  सुखाचा
मस्त  लोळत पडावे
दिन वाटे आनंदाचा

नसे आज धावपळ
उठा आज आरामात
नको पहाणे घड्याळ
सारे कसे  निवांतात

 असे रजेचे रंजन
भोजनात काही खास
आवडीने बनविता
दरवळे तो सुवास


जणु हक्काची मानती
वामकुक्षी वाटे हवी
सात दिन धावण्यास
स्फूर्ती  मनी देण्या नवी

 सूर एकूण रजेचा
शिणलेल्या त्या मनाला
मिळे जरा विरंगुळा
देई  मोद  तो जीवाला


वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...