मानव करी विचार
गुंतता मन तयात.
उद्भवती आशा अपार
वाढत जाती आशा
मनी दाटतो आनंद
होता सफळ ईच्छा
लागे मना आशेचा छंद
होता आशेची पूर्तता
मनी माळ अपेक्षांची
तयार मनात सदोदित
असा खेळ चाले सदाची
आहे कार्यरत मेंदू
चाले जन्म भर खेळ
आशा अपेक्षांचा सदा
मानव जमवितो
मेळ